AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shahid Kapoor | जेव्हा सावत्र आईशी झाली 6 वर्षांच्या शाहिद कपूरची पहिली भेट; खुद्द सुप्रिया यांनी सांगितला प्रसंद

दीना पाठक त्यांच्या मुलीला म्हणायच्या की, "तू चूक केलीस. पंकज तुला सोडून जाईल." त्याकडे सुप्रिया पाठक नेहमी दुर्लक्ष करायच्या. या मुलाखतीत सुप्रिया यांनी शाहिदच्या पहिल्या भेटीविषयी सांगितलं. त्यावेळी तो फक्त सहा वर्षांचा होता.

Shahid Kapoor | जेव्हा सावत्र आईशी झाली 6 वर्षांच्या शाहिद कपूरची पहिली भेट; खुद्द सुप्रिया यांनी सांगितला प्रसंद
Shahid Kapoor, Supriya Pathak and Pankaj KapurImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jun 25, 2023 | 4:28 PM

मुंबई : प्रसिद्ध अभिनेत्री सुप्रिया पाठक आणि अभिनेते पंकज कपूर यांनी 1988 मध्ये लग्नगाठ बांधली. सुप्रिया या पंकज कपूर यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सुप्रिया त्यांच्या लग्नाबद्दल मोकळेपणे व्यक्त झाल्या. यावेळी त्यांनी सांगितलं की पंकज कपूर यांच्याशी लग्नाबद्दलची गोष्ट जेव्हा घरात सांगितली तेव्हा त्यांची आई आणि दिग्गज अभिनेत्री दीना पाठक या लग्नाविरोधात होत्या. दीना पाठक यांना नेहमी असा संशय असायचा की पंकज कपूर हे एके दिवशी सुप्रिया यांना सोडून जातील. आईच्या या भीतीबद्दल सुप्रिया पाठक यांनी सांगितलं. त्याचसोबत शाहिद कपूरशी पहिली भेट कशी झाली, याविषयीही त्या व्यक्त झाल्या.

ज्यावेळी सुप्रिया पाठक आणि पंकज कपूर यांनी लग्न केलं, तेव्हा शाहिद फक्त सहा वर्षांचा होता. या मुलाखतीत अभिनेत्री ट्विंकल खन्नाने सुप्रिया पाठक यांना विचारलं की त्यांनी बहीण रत्ना पाठक शाह यांच्याकडून लग्नाबद्दल कोणता सल्ला घेतला होता? त्यावर सुप्रिया यांनी सांगितलं की, “प्रत्येक व्यक्तीने मला लग्नाबद्दल सल्ला दिला होता. मात्र मी कोणाचंच ऐकलं नाही. कारण माझा निर्णय अंतिम होता.”

हे सुद्धा वाचा

“आई गेल्या काही वर्षांपर्यंत लग्नाबद्दल माझे विचार बदलण्याचा प्रयत्न करायची. तोपर्यंत मी दोन मुलांची आईसुद्धा झाली होती. मात्र तरीसुद्धा तिला संशय होता की पंकज कपूर मला एकेदिवशी सोडून जातील. त्यावर मी त्यांना म्हणायचे, ठीक आहे. जे होईल ते मी सांभाळून घेईन”, असं त्यांनी पुढे सांगितलं.

दीना पाठक त्यांच्या मुलीला म्हणायच्या की, “तू चूक केलीस. पंकज तुला सोडून जाईल.” त्याकडे सुप्रिया पाठक नेहमी दुर्लक्ष करायच्या. या मुलाखतीत सुप्रिया यांनी शाहिदच्या पहिल्या भेटीविषयी सांगितलं. त्यावेळी तो फक्त सहा वर्षांचा होता. “तू खूप निरागस आणि प्रेमळ मुलगा होता. माझी त्याच्याशी पहिली भेट झाली, तेव्हा त्याची निश्चित अशी कोणती प्रतिक्रिया नव्हती. मात्र पहिल्याच भेटीत आमची बाँडींग चांगली झाली होती”, असं त्या म्हणाल्या. शाहिद कपूर हा पंकज कपूर आणि त्यांची पहिली पत्नी नीलिमा अजीम यांचा मुलगा आहे.

लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण
लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण.
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली.
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना.
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग.
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!.
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ.
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती.
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?.
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार.
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर.