Suriya | रस्ते अपघातात निधन झालेल्या चाहत्याच्या घरी पोहोचला साऊथ सुपरस्टार सूर्या

तमिळ चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता सूर्याच्या एका चाहत्याचं रस्ते अपघातात निधन झालं होतं. चाहत्याच्या निधनानंतर स्वत: सूर्याने त्याच्या घरी जाऊन कुटुंबीयांचं सांत्वन केलं. या भेटीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अरविंद हा सूर्याच्या फॅनक्लबचा एक सदस्य होता.

Suriya | रस्ते अपघातात निधन झालेल्या चाहत्याच्या घरी पोहोचला साऊथ सुपरस्टार सूर्या
SuriyaImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Sep 29, 2023 | 11:48 AM

चेन्नई | 29 सप्टेंबर 2023 : दक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील कलाकार त्यांच्या दमदार चित्रपटांसोबतच उदार स्वभावासाठी ओळखले जातात. आजवर अनेक दक्षिणात्य कलाकारांना त्यांच्या चाहत्यांच्या घरी जाऊन कुटुंबीयांची भेट घेताना पाहिलं गेलं आहे. नुकतंच साऊथ सुपरस्टार सूर्याने त्याच्या एका चाहत्याच्या घरी जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली. सूर्याच्या या चाहत्याचं एका रस्ते अपघातात निधन झालं होतं. त्यानंतर स्वतः सूर्याने त्याच्या घरी जाऊन श्रद्धांजली वाहिली. या भेटीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सूर्याच्या फॅन क्लबद्वारे हे फोटो ट्विटरवर शेअर करण्यात आले आहेत.

चेन्नईमधल्या एन्नोर इथल्या चाहत्याच्या घरी जाऊन सूर्याने त्याच्या कुटुंबीयांची भेट घेतली. संबंधित चाहत्याच्या कुटुंबीयांचं सांत्वन सूर्याने यावेळी केलं. सोशल मीडियावरील या फोटोमध्ये सूर्या त्याच्या चाहत्याच्या फोटोसमोर हात जोडून उभा असल्याचं पाहायला मिळतंय. या फोटोमध्ये त्या चाहत्याचे कुटुंबीयसुद्धा दिसत आहेत. आणखी एका फोटोमध्ये सूर्या त्याच्या कुटुंबीयांशी बोलताना पाहायला मिळत आहेत. आपल्या चाहत्याच्या कुटुंबीयांची भेट घेणारा सूर्या हा पहिलाच दक्षिणात्य कलाकार नाही. याआधीही अनेक कलाकारांनी त्यांच्या चाहत्यांची घरी जाऊन भेट घेतली आहे. दक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील कलाकारांना त्यांच्या चाहत्यांकडून सर्वाधिक प्रेम आणि साथ मिळण्यामागचं कारण त्यांचा हा विनम्र स्वभाव असल्याचं म्हटलं जातं.

हे सुद्धा वाचा

सूर्याच्या या चाहत्याचं नाव अरविंद असं होतं. अरविंद हा एन्नोर इथल्या सूर्याच्या फॅन क्लबमधील एक सदस्य होता. त्याच्या निधनाबद्दलची माहिती मिळताच सूर्याने त्याच्या घरी जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यांचं सांत्वन केलं. सूर्या हा तमिळ सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. मात्र त्याचा चाहतावर्ग केवळ तामिळनाडूपुरता मर्यादित नाही. तर तो जगभरात लोकप्रिय आहे.

सूर्या लवकरच ‘कंगुवा’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वाढदिवसानिमित्त सूर्याने त्याच्या आगामी ‘कंगुवा’ या चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांना दाखवली होती. या चित्रपटाच्या निमित्ताने सूर्या आणि दिग्दर्शक शिवा पुन्हा एकदा एकत्र काम करत आहेत. यामध्ये सूर्यासोबतच योगी बाबू, रेडिन किंग्सले, कोवई सरला आणि आनंदराज यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे
शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे.
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद.
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी.
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस.
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे.
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य.
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.