sushant singh rajput | सुशांतचा ‘दिल बेचारा’ चित्रपट अव्वल, ट्विटर इंडियाची यादी जाहिर

सुशांत सिंह राजपूतचा चित्रपट दिल बेचारा हा ट्विटरवरील सर्वाधिक लोकप्रिय चित्रपट ठरला आहे. ट्विटर इंडियाने आज हे जाहीर केली आहे.

sushant singh rajput | सुशांतचा 'दिल बेचारा' चित्रपट अव्वल, ट्विटर इंडियाची यादी जाहिर
Follow us
| Updated on: Dec 09, 2020 | 5:55 PM

मुंबई : सुशांत सिंह राजपूतचा चित्रपट दिल बेचारा हा ट्विटरवरील सर्वाधिक लोकप्रिय चित्रपट ठरला आहे. ट्विटर इंडियाने आज हे जाहीर केली आहे. ट्विटर इंडियाने सन 2020 मध्ये सर्वांधिक चर्चेत असलेल्या चित्रपटांची यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीनुसार दिल बेचारा हा 2020 मधील सर्वाधिक लोकप्रिय चित्रपट ठरला आहे. (Sushant’s ‘Dil Bechara’ tops Twitter India list)

या यादीतील दुसर्‍या क्रमांकावर दीपिका पादुकोणचा छपाक, तिसर्‍या क्रमांकावर अजय देवगणचा तान्हाजी, चौथ्या क्रमांकावर तापसी पन्नूचा थप्पड़ आणि पाचव्या क्रमांकावर जान्हवी कपूरची गुंजन सक्सेना आहे. दिल बेचारा हा सुशांत सिंह राजपूतचा शेवटचा चित्रपट ठरला जो त्याच्या निधनानंतर प्रदर्शित झाला होता. यामुळे या चित्रपटाविषयी बरीच चर्चा झाली आणि त्यावर बरेच ट्विट केले गेले होते.

दीपिका पादुकोणच्या चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर तिचा चित्रपट अ‍ॅसिड अ‍ॅटॅकवर आधारित आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी दीपिकाने जेएनयूला भेट दिली होती आणि तेथील विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शविला होता, त्यानंतर ट्विटरवर या चित्रपटाविरोधात मोहीम सुरू करण्यात आली होती.

यावर्षी अजय देवगनच्या तान्हाजी या चित्रपटाविषयी बरीच चर्चा झाली होती. 2020 च्या हिट चित्रपटांपैकी हा एक चित्रपट आहे, या चित्रपटामुळे देखील सुरूवातीला वाद निर्माण झाले होते. ट्विटरवर बरीच चर्चा होती. तापसी पन्नूचा थप्पड़ चित्रपट देखील बराच चर्चेत होता त्याचे कारण म्हणजे त्या चित्रपटामध्ये घरेसू हिसाचार दाखवण्यात आले होते. जान्हवी कपूरचा चित्रपट गुंजन सक्सेना हा भारतीय हवाई दलाची अधिकारी गुंजन सक्सेना यांच्या बायोपिकबद्दल होता. या चित्रपटात पंकज त्रिपाठी यांनी गुंजनच्या वडिलांची भूमिका साकारली होती. हा चित्रपट काही दिवसांपासून चर्चेत होता.

सुशांतचा प्रवास

स्टार प्लसवर ‘किस देश मे है मेरा दिल’ मालिकेतून 2008 मध्ये टीव्ही क्षेत्रात पदार्पण केलं होतं. त्यानंतर झी टीव्हीवर ‘पवित्र रिश्ता’ मालिका प्रचंड गाजली होती.

पवित्र रिश्ता मालिकेतील सहअभिनेत्री अंकिता लोखंडे सोबत सुशांतची जोडी अत्यंत लोकप्रिय ठरली होती. सुशांत आणि अंकिता काही वर्ष लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. मात्र दोन वर्षांपूर्वी दोघं विभक्त झाले होते.

2013 मध्ये ‘काय पो छे’ चित्रपटातून सुशांतने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं. त्यानंतर शुद्ध देसी रोमान्स, डिटेक्टीव्ह ब्योमकेश बक्षी, पीके असे सिनेमे गाजले.

एम एस धोनी चित्रपटात त्याने धोनीची भूमिका केली होती. या भूमिकेने तो यशोशिखरावर पोहोचला. नुकतेच त्याचे केदारनाथ, छिछोरे हे चित्रपट लोकप्रिय ठरले

संबंधित बातम्या : 

वेब सीरीज AK vs AK अडकली वादात, भारतीय वायुसेनाने दिग्दर्शकांना पाठवले पत्र!

Husnn Hai Suhana Song Out : ‘कुली नंबर 1’ चे आणखीन एक गाणे रिलीज वरुण आणि साराची जबरदस्त केमिस्ट्री!

(Sushant’s ‘Dil Bechara’ tops Twitter India list)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.