Sushmita Sen | दोन मुली दत्तक घेतल्यानंतर सुष्मिता सेन हिने का नाही केलं लग्न? अखेर कारण समोर

Sushmita Sen | सुष्मिता सेन हिने आयुष्यभर अविवाहित राहण्याचा का घेतला निर्णय? अखेर अभिनेत्रीने कारण सांगितलं... सध्या सर्वत्र सुष्मिता सेन हिच्या खासगी आयुच्याची चर्चा...

Sushmita Sen | दोन मुली दत्तक घेतल्यानंतर सुष्मिता सेन हिने का नाही केलं लग्न? अखेर कारण समोर
Follow us
| Updated on: Aug 22, 2023 | 10:24 AM

मुंबई | 22 ऑगस्ट 2023 : अभिनेत्री सुष्मिता सेन गेल्या काही दिवसांपासून ‘ताली’ या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. सीरिजमधील तिच्या अभिनयाचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. सीरिजमध्ये सुष्मिता एका ट्रान्सजेंडरच्या आयुष्यात येणारे चढ – उतार ओटीटी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. याआधी देखील अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारत सुष्मिता हिने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. पण सुष्मिता कायम तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. आता देखील अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याबद्दल चर्चा रंगत आहेत. सुष्मिता अशा अभिनेत्रींपैकी एक आहे ज्यांनी पैसा प्रसिद्धी असून देखील लग्न केलं नाही आणि आयुष्यभट एकटं राहण्याचा निर्णय घेतला.

सुष्मिता हिने लग्न का केल नाही. असा प्रश्न अनेकांनी अभिनेत्रीला विचारला. पण दोन मुलींना दत्तक घेतल्यानंतर सुष्मिता हिने ‘सिंगल मदर’ म्हणून मुलींचा सांभाळ केला. दरम्यान, खुद्द अभिनेत्री लग्न न करण्यावर मोठं वक्तव्य केलं आहे. सुष्मिता हिच्या मनात लग्न करण्याचा विचार आला तेव्हा त्यांच्या मुलींची प्रतिक्रिया कशी होती हे देखील अभिनेत्रीने सांगितलं.

अभिनेत्रीबद्दल सांगायचं झालं तर, सुष्मिता हिन स्वतःचं वैयक्तिक आयुष्य कधीही कोणापासून लपवून ठेवले नाही. एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉलसोबतच्या तिच्या नात्याबद्दल सर्वांनाच माहिती आहे. अशा परिस्थितीत अभिनेत्रीने खुलासा केला की, तिला लग्न करायचं आहे, परंतु आईने लग्न करावं असं अभिनेत्रीच्या मुलींची इच्छा नाही…

एका मुलाखतीत अभिनेत्रीला, ‘मुलींना कधी वडिलांची कमतरता भासली नाही…’ असं विचारलं,  यावर सुष्मिता म्हणाली, ‘बिलकून नाही… माझ्या मुलींना वडिलांची गरज नाही… जी गोष्ट त्यांच्याकडे नव्हतीच त्याची कमतरता त्यांना कधी भासलीच नाही. आता मी त्यांना सांगते मला लग्न करायचं आहे. तेव्हा मुली म्हणतात.. कशाला, काय गरज आहे… आम्हाला वडील नको आहे…’

सुष्मिता पुढे म्हणाली, ‘त्यांच्याकडे माझे वडील आणि त्यांचे आजोबा आहेत… त्यांच्यासाठी माझे वडील सर्वकाही आहेत. जेव्हा त्यांना वडिलांची कमी भासते.. तेव्हा मुली आजोबांसोबत प्रत्येक गोष्ट शेअर करतात.’ सुष्मिता सिंगल मदर आहे. अभिनेत्रीने २००० मध्ये रेने हिला दत्तक घेतलं होतं. त्यानंतर २०१० मध्ये अलीशा हिला दत्तक घेतलं. सध्या सर्वत्र सुष्मिता हिच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे.

सुष्मिता सेन आता अविवाहित असली तरी, तिचं नाव अनेकांसोबत जोडण्यात आलं आहे. सुष्मिता हिने नाव उद्योजक ललित मोदी याच्यासोबत देखील जोडण्यात आलं आहे. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.