Sushmita Sen : ‘तो अंत होता…’, धक्कादायक घटनेनंतर सुष्मिता सेन हिने परदेशातून पळ काढला आणि…
Sushmita Sen : परदेशात असताना सुष्मिता सेन हिच्यासोबत असं काय झालं, ज्यामुळे अभिनेत्रीला वाटलं 'तो' क्षण स्वतःचा अंत होता... तेव्हा सुष्मिताने तेथून पळ तर काढला पण...
मुंबई | 2 7 ऑगस्ट 2023 : ‘मिस यूनिव्हर्स’ आणि अभिनेत्री सुष्मिता सेन बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीत अव्वल स्थानी आहे. बॉलिवूडमध्ये असलेलं स्थान निर्माण करण्यासाठी सुष्मिता हिला अनेक संकटांचा सामना करावा लागला. पण अभिनेत्रीने कधीही हार मानली नाही. कुटुंब फिल्म इंडस्ट्रीमधील नसताना देखील स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर सुष्मिता हिने स्वतःची ओळख निर्माण केली. पण अभिनेत्रीच्या आयुष्यात अशी एक वेळ आली जेव्हा अभिनेत्रीला सर्व काही संपलंय असं वाटू लागलं.. नुकताच झालेल्या मुलाखतीत सुष्मिता सेन हिने आयुष्यात आलेल्या एका धक्कादायक घटनेचा खुलासा केला आहे. सध्या सर्वत्र सुष्मिता सेन हिने केलेल्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.
जेव्हा सुष्मिता अभिनेता अक्षय कुमार याच्यासोबत सिनेमाचं शुटिंग करत होती. तेव्हा अभिनेत्रीवर एक धक्कादायक प्रसंग ओढावला होता. सुष्मिता हिची मोठी मुलगी रेने सेन हिने प्रकृती खालावली होती. कमी वयात आई होण्याच्या घेतलेल्या निर्णयाची मोठी किंमत मोजावी लागणार की काय… असा प्रश्न अभिनेत्रीसमोर होता.
अक्षय कुमार आणि करीना कपूर खानसोबत एका लोकप्रिय सिनेमात सुष्मिता मुख्य भूमिका झळकणार होती. पण सिनेमाच्या शुटिंग दरम्यान रेने हिची प्रकृती गंभीर असल्यामुळे तिला रुग्णालयात दाखल कारण्यात आलं होतं. अशात अभिनेत्रीला शुटिंग सोडून रुग्णालयात यावं लागलं.
अभिनेत्री म्हणाली, ‘तेव्हा रेनेला माझी प्रचंड गरज होती. जेव्हा रेने माझ्या आयुष्यात आली, तेव्हा तिची प्रकृती स्थिर नव्हती. तिची प्रकृती चिंताजनक होती. मी, अक्षय आणि करिना तेव्हा कॅनडा याठिकाणी शुटिंग करत होतो. मल्टी स्टारर सिनेमा होता म्हणून माझ्यावर देखील दबाव होता. सिनेमा पूर्ण करण्याची जबाबदारी देखील माझ्यावर होती…’
अभिनेत्री पुढे म्हणाली, ‘लोक म्हणू लागले होते की ती वयाच्या 24 व्या वर्षी आई झाली आहे. आता ती तिच्या करिअरला गांभीर्याने घेणार नाही. मला देखील अंत आहे असं वाटलं. पण लोकांची समज मला चुकीची सिद्ध करायची होती. त्यामुळे मला रुग्णालयात वेळेत पोहोचायचं होतं. त्यानंतर कोणतीही तक्रार न करता सिनेमाचं शुटिंग देखील पूर्ण करायचं होतं..
सिनेमाचं शुटिंग सुरु असताना अभिनेत्रीला आला कॉल
‘सिनेमाचं शुटिंग सुरु असताना मुंबईतील कॉल आहे. माझे वडील लेकीची काळजी घेत होते. त्यांनी मला सांगितलं रेने रुग्णालयात आहे. तिची प्रकृती गंभीर आहे. मी तात्काळ मुंबईत आली. मला कळत होतं माझ्या करियरचा अंत आहे. ज्याचं दुःख मला होतं.. मी सर्व काही मागे सोडून माझ्या मुलीकडे परत आली आणि आठवडाभर मुंबईत राहिली. त्यानंतर जेव्हा मी नोकरीसाठी तयार होती तेव्हा सर्व काही संपलं होतं. खूप मोठं नुकसान झालं होतं. सिनेमातून मला काढून टाकण्यात आलं होतं…’ असं म्हणत अभिनेत्री आयुष्यातील कठीण प्रसंग सांगितला.