Sushmita Sen | ‘जिमला जाऊनही हार्ट अटॅक कसा आला?’, नेटकऱ्यांच्या प्रश्नावर सुष्मिता सेनचं उत्तर

“मी खूप मोठ्या हार्ट अटॅकनंतर वाचले आहे. माझ्या आर्टरीमध्ये 95 टक्के ब्लॉकेज होतं. हा माझ्या आयुष्यातील एक टप्पा होता आणि तो मी पार केला. माझ्या हृदयात आता कोणत्याच गोष्टीची भीती नाही”, असं ती म्हणाली होती.

Sushmita Sen | 'जिमला जाऊनही हार्ट अटॅक कसा आला?', नेटकऱ्यांच्या प्रश्नावर सुष्मिता सेनचं उत्तर
Sushmita SenImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 14, 2023 | 2:56 PM

मुंबई : अभिनेत्री सुष्मिता सेनने काही दिवसांपूर्वीच तिला हार्ट अटॅक आल्याची माहिती सोशल मीडियाद्वारे दिली होती. सुष्मिताच्या आर्टरीमध्ये 95 टक्के ब्लॉकेजेस होते. यातून बरं होताच तिने पुन्हा एकदा वर्कआऊट सुरू केलं आहे. इतकंच नव्हे तर हार्ट अटॅकनंतर दोन आठवड्यांच्या आत तिने लॅक्मे फॅशन वीकमध्ये रॅम्प वॉकसुद्धा केला. आता इन्स्टाग्राम लाइव्ह येत तिने पुन्हा एकदा त्यावर मोकळेपणे संवाद साधला. 28 फेब्रुवारी रोजी तिला हार्ट अटॅक आला होता आणि त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सुष्मिता इतकं वर्कआऊट करून सुद्धा, इतकी फिट दिसत असूनसुद्धा तिला हार्ट अटॅक कसा आला, असा प्रश्न अनेकांच्या मनात घोंघावत होता. त्याचप्रमाणे जिममध्ये जाऊनसुद्धा तिला हार्ट अटॅक आला, असंही काहींनी म्हटलं. या सर्व गोष्टींवर सुष्मिताने प्रतिक्रिया दिली आहे.

या लाइव्ह सेशनमध्ये सुष्मिता म्हणाली, “मला माहितीये की तुमच्यापैकी बरेच जण जिमला जाणं सोडून देतील. जिमला जाऊनसुद्धा तिला काहीच फायदा झाला नाही, असंही तुम्ही म्हणाल. पण हे योग्य नाही. उलट व्यायाम करणं, जिमला जाणं यांमुळे मला बरीच मदत झाली. मोठ्या हार्ट अटॅकमधून मी वाचले. ॲक्टिव्ह लाइफस्टाइलमुळेच हे शक्य झालं.”

हे सुद्धा वाचा

कार्डिओलॉजिस्टकडून परवानगी मिळाल्यानंतर सुष्मिताने सौम्य वर्कआऊटला सुरुवात केली. ‘कार्डिओलॉजिस्टने हिरवा कंदिल दाखवला.. स्ट्रेचिंगने सुरुवात करतेय’, असं कॅप्शन देत तिने काही फोटो पोस्ट केले होते. याआधीही सुष्मिताने इन्स्टाग्रामवर लाइव्ह येत चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली. “मी खूप मोठ्या हार्ट अटॅकनंतर वाचले आहे. माझ्या आर्टरीमध्ये 95 टक्के ब्लॉकेज होतं. हा माझ्या आयुष्यातील एक टप्पा होता आणि तो मी पार केला. माझ्या हृदयात आता कोणत्याच गोष्टीची भीती नाही”, असं ती म्हणाली होती.

हार्ट अटॅकविषयी सुष्मिता सेनची पोस्ट-

‘तुमच्या हृदयाला आनंदी आणि धैर्यवान ठेवा, तुम्हाला जेव्हा सर्वाधिक त्याची गरज असेल तेव्हा ते तुमच्यासोबत असेल (माझ्या वडिलांचे मोलाचे शब्द). काही दिवसांपूर्वी मला हृदयविकाराचा झटका आला, अँजियोप्लास्टी झाली, स्टेंट लागले आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे माझ्या कार्डिओलॉजिस्टने मला सांगितलं की माझं हृदय खूप मोठं आहे. अनेक जणांचे मला आभार मानायचे आहेत. त्यासाठी मी दुसरी पोस्ट लिहीन. ही पोस्ट मी माझ्या शुभचिंतकांना आणि जवळच्या व्यक्तींना हे सांगण्यासाठी लिहितेय की आता सर्वकाही ठीक आहे, माझी प्रकृतीही ठीक आहे,’ अशी पोस्ट तिने लिहिली होती.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.