Sushmita Sen | हार्ट अटॅकनंतर पहिल्यांदाच रॅम्पवर उतरली सुष्मिता सेन; चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव

लॅक्मे फॅशन वीकच्या पडद्यामागील काही व्हिडीओसुद्धा समोर आले आहेत. यातील एका व्हिडीओमध्ये सुष्मितासोबत तिचा एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉल पहायला मिळतोय.

Sushmita Sen | हार्ट अटॅकनंतर पहिल्यांदाच रॅम्पवर उतरली सुष्मिता सेन; चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव
Sushmita SenImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 12, 2023 | 12:00 PM

मुंबई : वयाच्या 47 व्या वर्षी अत्यंत फिट दिसणारी अभिनेत्री सुष्मिता सेन हिने काही दिवसांपूर्वीच चाहत्यांना धक्कादायक बातमी दिली. इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहित तिने काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती दिली. यावेळी तिने चाहत्यांचे, शुभचिंतकांचे आणि कुटुंबीयांचेही आभार मानले. हार्ट सर्जरीनंतर तिच्या प्रकृतीत सकारात्मक सुधारणा होत असल्याचंही सुष्मिताने सांगितलं होतं. त्यानंतर आता पहिल्यांदाच ती रॅम्पवर उतरली आहे. लॅक्मे फॅशन वीकमध्ये सुष्मिता सेनचा स्टायलिश अंदाज पहायला मिळाला. फॅशन डिझायनर अनुश्री रेड्डीसाठी ती शॉ-स्टॉपर होती. यावेळी तिने पिवळ्या रंगाचा भरजरी लेहंगा आणि त्यावर साजेसे दागिने परिधान केले होते. सुष्मिताच्या रॅम्प वॉकचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.

लॅक्मे फॅशन वीकच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. ‘आयुष्य साजरं करणारी अभिनेत्री’ असे कमेंट्स करत चाहत्यांनी तिचं कौतुक केलं आहे. ‘ती खरंच शक्ती आहे.. तिच्यासाठी शब्द अपुरे पडतात’, असंही काहींनी लिहिलंय. सुष्मिता कायम तिच्या चाहत्यांसाठी एक प्रेरणा आहे, अशीही स्तुती युजर्सनी केली आहे.

हे सुद्धा वाचा

लॅक्मे फॅशन वीकच्या पडद्यामागील काही व्हिडीओसुद्धा समोर आले आहेत. यातील एका व्हिडीओमध्ये सुष्मितासोबत तिचा एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉल पहायला मिळतोय. चांगल्या आणि वाईट परिस्थितीतसुद्धा रोहमन तिच्या बाजूने खंबीर उभा असल्याची कमेंट काही नेटकऱ्यांनी केली. ब्रेकअपनंतरही सुष्मिताची साथ सोडली नसल्याची बाब चाहत्यांनी अधोरेखित केली.

पहा व्हिडीओ

हार्ट अटॅकनंतर काय म्हणाली सुष्मिता?

“मी खूप मोठ्या हार्ट अटॅकनंतर वाचले आहे. माझ्या आर्टरीमध्ये 95 टक्के ब्लॉकेज होतं. हा माझ्या आयुष्यातील एक टप्पा होता आणि तो मी पार केला. माझ्या हृदयात आता कोणत्याच गोष्टीची भीती नाही”, असं ती इन्स्टाग्रामवर लाइव्ह येत म्हणाली होती. “माझ्या मनात आता कोणतीच भीती नाही. उलट मी असा विचार करते मला स्वत:शीच एक प्रॉमिस केलं पाहिजे आणि गोष्टींकडे वेगळ्या दृष्टीकोनातून पाहिलं पाहिजे. तुम्ही पाठवलेल्या पुष्पगुच्छांनी माझं घर भरलंय. माझं घर सध्या ‘गार्डन ऑफ ईडन’सारखं दिसू लागलंय”, असंही ती गमतीने म्हणाली होती.

भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.