इटलीतील भीषण कार अपघातानंतर ‘स्वदेस’ फेम गायत्री जोशी पतीसह पहिल्यांदाच कॅमेरासमोर

इटलीतील सार्डिनिया इथं पार पडलेली सुपरकार टूर प्राणघातक ठरली होती. या अपघातात दोन ते तीन महागड्या गाड्या एकमेकांवर आदळल्या आणि त्यात दोन लोकांनी आपले प्राण गमावले होते. या आपघातात गायत्री जोशी आणि तिचा पती विकास ओबेरॉय यांच्याही लँबोर्गिनीचा समावेश होता.

इटलीतील भीषण कार अपघातानंतर 'स्वदेस' फेम गायत्री जोशी पतीसह पहिल्यांदाच कॅमेरासमोर
Gayatri Joshi Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Nov 01, 2023 | 12:21 PM

मुंबई | 1 नोव्हेंबर 2023 : गेल्या महिन्यात इटलीत भीषण कार अपघातानंतर ‘स्वदेस’ फेम अभिनेत्री गायत्री जोशी पहिल्यांदाच कॅमेरासमोर आली. मुंबईत पार पडलेल्या जियो वर्ल्ड प्लाझाच्या ग्रँड लाँच कार्यक्रमात गायत्री तिचा पती विकास ओबेरॉयसोबत पोहोचली होती. यावेळी रेड कार्पेटवर दोघांनी एकत्र फोटोसाठी पोझ दिले. गायत्रीचा पती विकास ओबेरॉय हे ओबेरॉय रियाल्टीचे एमडी आहेत. इटलीतील भीषण कार अपघाताच्या घटनेनंतर दोघं पहिल्यांदाच पापाराझी आणि कॅमेरासमोर आले आहेत. पापाराझींनी सोशल मीडियावर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

इटलीतील सार्डिनिया इथं कार अपघात झाल्यानंतर ऑक्टोबर महिन्यात गायत्री आणि विकास मुंबईतला परतले. इटलीतल्या सार्डिनिया याठिकाणी दोन-तीन सुपरकार्सनी एका कॅम्परवॅनला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी ती कॅम्परवॅनच उलटली. या अपघातात मागे असलेल्या फरारी कारला आग लागली आणि त्यात वृद्ध स्विस दाम्पत्याचा मृत्यू झाला होता. ज्या दोन-तीन गाड्यांची टक्कर झाली, त्यापैकी लँबॉर्गिनी या सुपरकारमध्ये गायत्री आणि विकास होते. या अपघाताचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या अपघातप्रकरणी विकास आणि गायत्रीचीही चौकशी करण्यात आली होती.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ

कोण आहे गायत्रीचा पती विकास ओबेरॉय?

गायत्री जोशीचा पती विकास ओबेरॉय हे ओबेरॉय रियॅल्टी लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. ओबेरॉय रियॅल्टी लिमिटेडची स्थापना रणवीर ओबेरॉय यांनी तीन दशकांपूर्वी केली होती. प्रॉपर्टी व्यतिरिक्त विकास हे हाऊसिंग, कॉर्पोरेट, हॉस्पिटल आणि रिटेलमध्येही गुंतवणूक करतात. विकास ओबेरॉय हे मुंबईतील प्रसिद्ध वेस्टीन हॉटेलचे मालकसुद्धा आहेत. 2005 मध्ये त्यांनी अभिनेत्री गायत्री जोशी लग्न केलं. या दोघांना दोन मुलं आहेत. विकास ओबेरॉय यांना स्पोर्ट्स कारची फार आवड आहे. याशिवाय त्यांच्याकडे पायलटचाही परवाना आहे. ते त्यांचं Cirrus SR22 Tango हे विमान स्वतः उडवतात. याशिवाय त्यांना वाचन, प्रवास आणि स्कीईंगचीही आवड आहे.

Non Stop LIVE Update
राणांच्या सभेत राडा; शिवीगाळ, खुर्च्या फेकून मारल्या, अल्लाहच्या घोषणा
राणांच्या सभेत राडा; शिवीगाळ, खुर्च्या फेकून मारल्या, अल्लाहच्या घोषणा.
भाजपच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध अन् महायुतीत अजित पवारांची कोंडी
भाजपच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध अन् महायुतीत अजित पवारांची कोंडी.
..तेव्हा गमंत केली आता नको, अजितदादांचा बारामतीकरांना विनंती वजा इशारा
..तेव्हा गमंत केली आता नको, अजितदादांचा बारामतीकरांना विनंती वजा इशारा.
दापोलीत दादागिरीवरून हल्लाबोल, बर्फावर झोपवण्याचं आव्हान; कोणात जुंपली
दापोलीत दादागिरीवरून हल्लाबोल, बर्फावर झोपवण्याचं आव्हान; कोणात जुंपली.
प्रचार तापला, 'व्होट जिहाद'ला 'धर्मयुद्धा'नं उत्तर, फडणवीसांचा पलटवार
प्रचार तापला, 'व्होट जिहाद'ला 'धर्मयुद्धा'नं उत्तर, फडणवीसांचा पलटवार.
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.