AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘बरेली ते मुंबईकर’ तर,आंदोलनातील लव्हस्टोरी;

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर केलेल्या तिसऱ्या उमेदवारांच्या यादीत स्वरा भास्करचे पती फहाद अहमद यांच्या नावाचा समावेश झाल्याने एक खळबळ उडाली आहे. अणुशक्तीनगर मतदारसंघातून ते राष्ट्रवादीचे उमेदवार असणार आहेत. पूर्वी समाजवादी पक्षाशी निगडीत असलेले फहाद हे विद्यार्थी नेते म्हणून ओळखले जातात आणि विविध सामाजिक आंदोलनांमध्ये सक्रिय राहिले आहेत. त्यांच्या उमेदवारीमुळे येथील निवडणूक अधिक रंजक होणार आहे.

'बरेली ते मुंबईकर' तर,आंदोलनातील लव्हस्टोरी;
Fahad Ahmad
| Updated on: Oct 27, 2024 | 5:53 PM
Share

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी गटाची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या तिसऱ्या यादीमध्ये ९ जणांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. पण या ९ जणांच्या यादीमध्ये असलेले एक नाव पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटलं. ते नाव आहे फहाद अहमद. फहाद अभिनेत्री स्वरा भास्करचे पती आहे. त्यांना शरद पवार यांच्या गटाकडून गटाकडून त्यांना अणुशक्तीनगर येथून तिकीट देण्यात आलं आहे.

मागील काही दिवसांपासून फहाद यांच्या नावाची चर्चा होती. समाजवादी पक्षाने काही दिवसांपूर्वी विधानसभेसाठी मुंबईतील अणुशक्तीनगरची जागा लढवण्यासाठी इच्छुक असल्याचं म्हटलं होतं. समाजवादी पक्षाकडून फहाद अहमद हे अणुशक्तीनगरची जागा लढण्यासाठी इच्छुक होते.फहाद हे समाजवादी पक्षाचा पदाधिकारी होते. मात्र आता त्यांनी समाजवादी पक्षाला रामराम करत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. पक्षप्रवेशानंतर अखेर अणुशक्तीनगरसाठी तिकीट देण्यात आलं आहे. तर, अशा पद्धतीने स्वराचे पती फहाद अहमद विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.दरम्यान अनुशक्ती नगरचा सामना हा राष्ट्रवादी विरूद्ध राष्ट्रवादी असा होणार आहे. त्यात नवाब मलिक यांची मुलगी सना मलिक विरूद्ध फहाद अहमद अशी रंजक लढत होणार आहे.

Fahad Ahmad

Fahad Ahmad

फहाद अहमद आहेत तरी कोण?

सध्या महाराष्ट्रातील राजकारणात सक्रीय असलेला आणि राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात आलेला फहाद मूळचा उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातील आहे. फहादचा जन्म 1992 सालच्या फेब्रुवारीत झाला. यूपीतील अलिगढ विद्यापीठातून (AMU) फहादनं आपलं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर पदव्युत्तर शिक्षणासाठी फहाद मुंबईत दाखल झाला. फहाद हे समाजवादी पक्षाचा पदाधिकारी होते. 2022 साली जुलै महिन्यात त्यांनी आमदार अबू आझमी आणि आमदार रईस शेख यांच्या उपस्थित समाजवादी पार्टीत प्रवेश केला होता .

फहाद अहमद हे सामाजिक कार्यात खूप सक्रीय आहेत आणि विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी लढा दिलेला आहे. ते समाजवादी पक्षाच्या महाराष्ट्र युथ विंगचे अध्यक्ष होते. फहाद यांची ओळख एक सक्षम नेतृत्व असणार नेता म्हणून आहे., ज्यांनी अनेक सामाजिक प्रश्नांवर आपली भूमिका स्पष्टपणे मांडली. आता येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांच्याकडे सर्वांच्या नजरा आहेत.

Fahad Ahmad

Fahad Ahmad

विद्यार्थीनेता म्हणून ओळख

मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स अर्थात TISS मधून फहादनं MPhil चं शिक्षण घेतलं. TISS मध्ये असतानाच फहादनं विद्यार्थी आंदोलनात सहभाग घेण्यास सुरुवात केली. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना फी माफीच्या मुद्द्यासाठी आंदोलन केलं होतं. फहादनं TISS च्या गव्हर्निंग बॉडीचे चेअरपर्सन एस. रामादोराई यांच्या हातून दीक्षांत समारंभात एमफीलची पदवी घेण्यास नकारही दिला होता. त्यानंतर TISS ने फहादला पीएचडीच्या नोंदणीपासून वंचित ठेवलं होतं. फहादनं TISS चा अवमान केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणानंतर फहाद अहदम सर्वत्र चर्चेत आला होता.

शिक्षण क्षेत्रातील समस्या फहादच्या आंदोलनांचा सुरुवातीच्या काळात मुद्दा राहिला. 2018 ला त्याच दरम्यान देशभरात CAA विरोधी आंदोलनंही सुरू झालं आणि फहाद TISS च्या बाहेर पडत, या आंदोलनातही सहभागी होऊ लागला. याच दरम्यान फहादची स्वराशी भेट झाली होती

Fahad Ahmad

Fahad Ahmad

आंदोलनाचा वारसा वडिलांकडून

फहादला संघर्ष आणि आंदोलनांचा वारसा त्याच्या घरातूनच मिळाल्याचं त्याने अनेकदा सांगितले आहे. फहादचे वडील जिरार अहमद यांनी अलिगडमधील समाजवादी पार्टीचे स्थानिक नेते म्हणून काम केले. शिक्षणासाठी मुंबईत येताना फहाद ठरवून आला होता की, मुंबईत फार काळ राहायचं नाही. मात्र, समाजवादी पार्टीच्या युवक संघटनेचा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर तो मुंबईतून परतला नाहीच पण मुंबईतल्या सिनेसृष्टीत नावाजलेल्या अभिनेत्रीशी स्वरा भास्करशी विवाहबद्धही झाला. फहाद हा स्वरा भास्करपेक्षा दोन वर्षांनी लहान आहे.

Fahad Ahmad

Fahad Ahmad

आंदोलनादरम्यानच स्वरा आणि फहादची भेट

2019-2020 मध्ये जेव्हा देशभरात सीएए विरोधी आंदोलनं होत होती. त्यावेळी स्वरा भास्करनं स्पष्ट भूमिका घेतली होती तसेच सीएए विरोधी आंदोलनांमध्ये सहभागी झाली होती .याच आंदोलनात आणि तेथील व्यासपीठावर विद्यार्थी नेता म्हणून फहाद अहमद उपस्थित होता. याच आंदोलनादरम्यान दोघांनी एक सेल्फीही घेतला होता. या आंदोलनांमधील भेटीनंतर दोघांमधील मैत्री वाढत गेली आणि मैत्रीच रुपांतर प्रेमात झालं.16 फेब्रुवारीला स्वरा भास्करनं सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हीडिओ, फोटो शेअर करत, फहाद अहमदसोबत लग्न झाल्याचं जाहीर केलं. विशेष विवाह नोंदणी कायद्याअंतर्गत स्वरा आणि फहाद मुंबईत विवाहबद्ध झाले.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.