हायवेवर रेसचा थरार, अभिनेत्रीकडून हे काय घडलं? लेम्बोर्गिनी – फेरारीच्या भयानक अपघाताचा व्हिडीओ समोर

ओव्हरटेक करण्याच्या नादात बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीकडून हे काय झालं, लेम्बोर्गिनी आणि फेरारी गाड्यांच्या शर्यतीत नको तेच झालं... व्हिडीओ पाहून व्हाल हैराण... सोशल मीडियावर सर्वत्र अपघाताच्या व्हिडीओची चर्चा... व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीही व्हाल हैराण...

हायवेवर रेसचा थरार, अभिनेत्रीकडून हे काय घडलं? लेम्बोर्गिनी - फेरारीच्या भयानक अपघाताचा व्हिडीओ समोर
Follow us
| Updated on: Oct 04, 2023 | 8:28 AM

मुंबई | 04 ऑक्टोबर 2023 : महागडी कार आपल्याकडे असावी, आपण त्या कारमधून फिरायला जावं असं प्रत्येकाला वाटतं आणि यामध्ये काही हरकत नाही. पण जवळ महागडी कार आहे, म्हणून आपल्या समोर धावणाऱ्या कारला ओव्हरटेक करणं योग्य नाही. यामध्ये नुकसान तुमचं होवू शकतं.. असंच काही झालं आहे बॉलिवूड अभिनेत्री आणि तिच्या पतीसोबत… दुर्दैवी अपघातात अभिनेत्री आणि तिच्या पतीचे प्राण वाचले, पण दुसऱ्या कारमध्ये असणाऱ्या दाम्पत्याचा मृत्यू झाला आहे. लेम्बोर्गिनी कारने फेरारीला जोरदार धडक दिल्यामुळे हा दुर्दैवी अपघात झाला आहे. अपघाताचा भयानक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ज्या अभिनेत्रीच्या कारला अपघात झाला आहे ती दुसरी तिसरी कोणी नसून ‘स्वदेस’ सिनेमातील अभिनेत्री गायत्री जोशी आहे. अपघातात अभिनेत्री आणि पती विकास ओबेरॉय दोघेही बचावले आहेत. पण स्विस दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सध्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलीस कसून चौकशी करत आहेत.

अपघाताचा व्हिडीओ भयानक व्हिडीओ समोर..

भयानक अपघाताचा व्हिडीओ आता समोर आला आहे. व्हिडीओ अनेक महागड्या गाड्या एकामागून एक येताना दिसत आहे. अनेक कार एकमेकांना ओव्हरटेक करताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये काही क्षणानंतर पुढे जात असलेली ट्रक पलटी होतानाही दिसत आहे. अपघाताच्या व्हिडीओ पाहून तुम्हाला देखील धक्का बसेल…

मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्री आणि तिचा पती विकास हे दोघेही लग्झरी गाड्यांसोबत रेस करत होते. त्यामुळे अपघात झाला आहे. एका न्यूज वेबसाईटला गायत्री हिने प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेत्री म्हणाली, ‘मी आणि विकास इटली याठिकाणी आहोत. आम्ही एका दुर्घटनेचे शिकार झालो आहोत. पण आता आमची प्रकृती स्थिर असल्याची माहिती अभिनेत्रीने दिली आहे…’

स्विस दाम्पत्याची ओळख

मेलिसा क्रोटली (६३) आणि मार्कस क्रौटली (६७) असं दोघांचं नाव आहे. दोघेही स्वित्झर्लंडचे रहिवाशी आहेत. स्विस दाम्पत्याला हायवेवर रेस करणं महागात पडलं आहे. ज्यामुळे दोघांना प्राण गमवावे लागले आहेत. सध्या सर्वत्र भयानक अपघाताची चर्चा सुरु आहे. शिवाय व्हायरल होत असलेल्या व्हिडीओवर कमेंट करत नेटकरी प्रतिक्रिया देत आहेत.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.