TMKOC: शूटिंगच्या पहिल्याच दिवशी रिटा रिपोर्टरवर जडलं प्रेम; ‘तारक मेहता..’च्या दिग्दर्शकाची लव्ह-स्टोरी

'तारक मेहता..'च्या कलाकारांची प्रेमकहाणी; सेटवर तिला पाहताचक्षणी पडला प्रेमात

TMKOC: शूटिंगच्या पहिल्याच दिवशी रिटा रिपोर्टरवर जडलं प्रेम; 'तारक मेहता..'च्या दिग्दर्शकाची लव्ह-स्टोरी
TMKOC: शूटिंगच्या पहिल्याच दिवशी रिटा रिपोर्टरवर जडलं प्रेम; 'तारक मेहता..'च्या दिग्दर्शकाची लव्ह-स्टोरीImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 04, 2023 | 9:15 AM

मुंबई: ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेचा आजवर अनेक कलाकारांनी निरोप घेतला. त्या यादीत नुकतंच आणखी एक नाव समाविष्ट झालं. मालिकेचे दिग्दर्शक मालव राजदा यांनी ‘तारक मेहता..’ला रामराम केला आहे. मालव गेल्या 14 वर्षांपासून मालिकेचं दिग्दर्शन करत होते. त्यांनी अचानक मालिका सोडण्याचा निर्णय घेतल्यामुळे सर्वांनाच धक्का बसला. या मालिकेला मालव राजदा यांनी एका उंचावर नेऊन पोहोचवलं. आता त्यांच्या एग्झिटनंतर मालिकेच्या टीआरपीवर किती परिणाम होईल, हे येत्या काळातच समजू शकेल. ‘तारक मेहता..’च्या दिग्दर्शकांची लव्ह-स्टोरी खूपच रंजक आहे.

अनेकदा मालिकेत एकत्र काम करताना सहकलाकार एकमेकांच्या प्रेमात पडतात. मात्र मालव यांची प्रेमकहाणी जरा हटके आहे. मालव हे मालिकेचे कलाकार नव्हते. मात्र आपल्या प्रतिभेने ते मालिकेचं उत्तम दिग्दर्शन करत होते. एकेदिवशी या मालिकेत अभिनेत्री प्रिया अहुजाची एण्ट्री झाली.

हे सुद्धा वाचा

या मालिकेत प्रिया ही रिटा रिपोर्टरची भूमिका साकारणार होती. शूटचा पहिलाच दिवस होता आणि मालव तिला पाहताचक्षणी प्रेमात पडले होते. शूटिंगदरम्यान या दोघांमध्ये चांगली मैत्री झाली आणि हळूहळू या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.

एका मुलाखतीत मालव यांनी सांगितलं होतं की दिवाळीनिमित्त प्रियाने त्यांना खास शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर दोघांमधील जवळीक वाढली होती. दोन वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर मालवने प्रियाला लग्नासाठी प्रपोज केलं. 2011 मध्ये या दोघांनी लग्नगाठ बांधली. या दोघांना एक मुलगा आहे.

त्या मुलाखतीत मालव यांनी हेसुद्धा सांगितलं होतं की प्रियासोबत ते घरी असताना कामाविषयी चर्चा करत नाहीत. इतकंच नव्हे तर प्रियाचं नाव त्यांनी दुसऱ्या कोणत्या शोसाठी सुचवलं नाही. प्रोफेशनल आणि पर्सनल आयुष्य वेगवेगळं ठेवण्यावर दोघांची भर दिला. सोशल मीडियावर अनेकदा दोघं एकमेकांसोबतचे फोटो पोस्ट करताना दिसतात. या फोटोंमध्ये दोघांमधील प्रेम सहज पहायला मिळतं.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.