TMKOC | ‘दयाबेन’ला कॅन्सर? चर्चांमुळे चाहत्यांना बसला धक्का! ‘जेठालाल’ने दिली प्रतिक्रिया

दिशाने 2017 मध्ये ही मालिका सोडली होती. बाळंतपणाच्या रजेवर गेलेली दिशा पुन्हा मालिकेत परतलीच नाही. तिला मालिकेत परत आणण्यासाठी दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी बरेच प्रयत्न केले.

TMKOC | 'दयाबेन'ला कॅन्सर? चर्चांमुळे चाहत्यांना बसला धक्का! 'जेठालाल'ने दिली प्रतिक्रिया
Dilip Joshi and Disha VakaniImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 16, 2023 | 11:45 AM

मुंबई : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी ‘मेहता साहब’ची भूमिका साकारणारे अभिनेते शैलेश लोढा यांनी मालिकेला रामराम केला. त्यानंतर मिसेस रोशन सोढीची भूमिका साकारणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्रीने निर्माते असितकुमार मोदी आणि प्रॉडक्शन टीममधील काही लोकांवर लैंगिक शोषणाचा आरोप केला. आता या मालिकेत दयाबेनची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वकानीबद्दल नवीन चर्चा सुरू झाली आहे. दिशाला घशाचा कॅन्सर झाल्याने ती मालिकेत परत येऊ शकत नसल्याचं म्हटलं जात आहे. या चर्चेमुळे चाहत्यांना मोठा धक्काच बसला आहे.

दिशा वकानीला कॅन्सर?

दिशाने बाळंतपणाच्या सुट्टीसाठी मालिकेतून काही काळ ब्रेक घेतला होता. मूल झाल्यानंतर ती दयाबेनच्या भूमिकेसाठी परतणार असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र आता बऱ्याच वर्षांनंतरही दिशा मालिकेत परतली नाही. दयाबेनच्या भूमिकेत दिशा पुन्हा कधी येणार, असा प्रश्न निर्मात्यांना वारंवार विचारला गेला होता. मात्र त्यावर ठोस असं उत्तर त्यांनी कधी दिलं नाही. नुकतंच सोशल मीडियावर दिशाच्या कॅन्सरची चर्चा होत आहे. दिशाला घशाचा कॅन्सर झाल्याचं वाचून चाहते चिंतेत आहेत. या चर्चांवर आता जेठालालची भूमिका साकारणारे अभिनेते दिलीप जोशी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हे सुद्धा वाचा

काय म्हणाले दिलीप जोशी?

“मला सकाळपासून सतत फोनकॉल्स येत आहेत. मात्र यावर अद्याप दिशा वकानीने काही उत्तर दिलं नाही. जेव्हा तिच्यापर्यंत या चर्चा पोहोचतील, तेव्हा ती स्वत: चाहत्यांना खरं काय ते सांगेल, अशी मला खात्री आहे”, असं दिलीप जोशी म्हणाले. याशिवाय निर्माते असितकुमार मोदी यांनीसुद्धा याविषयी काहीच माहित नसल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळे दिशा या चर्चांवर काय उत्तर देणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दिशाने 2017 मध्ये ही मालिका सोडली होती. बाळंतपणाच्या रजेवर गेलेली दिशा पुन्हा मालिकेत परतलीच नाही. तिला मालिकेत परत आणण्यासाठी दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी बरेच प्रयत्न केले. मात्र दिशा सध्या तिच्या खासगी आयुष्यावर लक्ष केंद्रीत करत असल्याचं म्हटलं गेलं. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका गेल्या 15 वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. मात्र गेल्या काही दिवसांपासून या मालिकेत झालेल्या काही बदलांमुळे त्याची लोकप्रियता कमी होत असल्याचं पहायला मिळतंय. आतापर्यंत यातील बऱ्याच कलाकारांनी मालिकेचा निरोप घेतला. यात दयाबेनची भूमिका साकारणारी दिशा वकानी, टप्पूची भूमिका साकारणारा भव्य गांधी आणि राज अनाडकत, तारक मेहताची भूमिका साकारणारे शैलेश लोढा यांचा समावेश होता.

'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.