‘तारक मेहता..’च्या रिटा रिपोर्टरने शेअर केले बेडरुम फोटोज; पतीला टॅग करणाऱ्या ट्रोलर्सना म्हणाली..

बेडरूम फोटो शेअर केल्याने 'तारक मेहता..'च्या रिटा रिपोर्टरला ट्रोलर्सचा सल्ला; भडकलेली अभिनेत्रीने दिलं सडेतोड उत्तर

'तारक मेहता..'च्या रिटा रिपोर्टरने शेअर केले बेडरुम फोटोज; पतीला टॅग करणाऱ्या ट्रोलर्सना म्हणाली..
अभिनेत्री प्रिया अहुजाImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 04, 2022 | 11:47 AM

मुंबई: ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेतील प्रत्येक भूमिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. यातील रिटा रिपोर्टरची भूमिकाही प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झाली. अभिनेत्री प्रिया अहुजाने रिटा रिपोर्टरची भूमिका साकारत आपली विशेष ओळख बनवली. प्रियाचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. मात्र अनेकदा तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. नुकतेच प्रियाने काही बोल्ड फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. या फोटोंवरून ट्रोल करणाऱ्यांना तिने सडेतोड उत्तर दिलं आहे.

‘तारक मेहता..’च्या प्रिया अहुजाने इन्स्टाग्रामवर भलीमोठी पोस्ट लिहित ट्रोलर्सना सुनावलं आहे. ‘ज्या लोकांनी मला माझ्या फोटोंवरून ट्रोल केलंय, त्या सर्वांना मी बोलू इच्छिते की मला त्याने काहीच फरक पडत नाही. तुम्ही माझ्याबद्दल काय विचार करता, याने मला अजिबात फरक पडत नाही. तुमच्यापैकी अनेकांनी माझ्या पतीला टॅग करत म्हटलं की मी कशी पत्नी आहे आणि ते मला अशा प्रकारचे कपडे परिधान करायला परवानही कशी देऊ शकतात?’

हे सुद्धा वाचा

प्रियाने पुढे लिहिलं, ‘तुमच्यापैकी अनेकांनी अरदासबद्दल लिहिलं की तो त्याच्या आईबद्दल काय विचार करेल आणि एक आई म्हणून मी त्याला काय शिकवेन? कृपया मालव आणि अरदास यांनाच हे ठरवू द्या की मी कशा प्रकारची आई आणि पत्नी आहे.’

‘मी हेसुद्धा सांगू इच्छिते की मला विशिष्ट प्रकारचे कपडे परिधान करण्यासाठी तुमच्या परवानगीची गरज नाही. मला काय घालायचं आहे, हे फक्त मी ठरवेन आणि मला कसं जगायचं आहे, याचा निर्णयसुद्धा मीच घेईन. तुमच्या सल्ल्याची मला गरज नाही’, अशा शब्दांत तिने ट्रोलर्सना सुनावलं.

काही दिवसांपूर्वी प्रियाने बेडरुम फोटोशूटचे काही फोटो पोस्ट केले होते. काळ्या रंगाचा सॅटिन कपडा स्वत:भोवती गुंडाळून तिने हे फोटोशूट केलं होतं. एका मासिकाच्या कव्हर फोटोसाठी तिने अशा प्रकारचं फोटोशूट केलं होतं. मात्र त्यावरून तिला प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.