लोणचे-पापड विकणाऱ्या ‘माधवी भाभी’चं रॉयल आयुष्य, पतीपासून बिझनेसपर्यंत, जाणून घ्या सर्वकाही

Madhvi Bhabhi TMKOC Bhabhi Photos : 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेत कायम साडीत दिसणाऱ्या 'माधवी भाभी'चं रॉयल आयुष्य... अभिनेत्रीच्या पतीबद्दल फार कमी लोकांना आहे माहिती, फोटो पाहून म्हणाल..., जाणून घ्या माधवी भाभी म्हणजे अभिनेत्री सोनालिका जोशी हिच्याबद्दल

लोणचे-पापड विकणाऱ्या 'माधवी भाभी'चं रॉयल आयुष्य, पतीपासून बिझनेसपर्यंत, जाणून घ्या सर्वकाही
Follow us
| Updated on: Apr 20, 2024 | 1:53 PM

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ गेल्या 15 वर्षांपासून चाहत्यांचं मनोरंजन करत आहे. मालिकेतील कलाकार देखील आता चाहत्यांच्या फार जवळचे झाले आहे. गोकूळ धाम सोसायटी मधील सर्वांची एकता आणि टप्पू सेनेच्या मस्तीमुळे मालिकेला लहान मुलांपासून ते वृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वांचं प्रेम मिळालं. मालिकेतील प्रत्येक भूमिकेने चाहत्यांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. सध्या अशाच एका भूमिकेची चर्चा रंगली आहे. मालिकेत ‘माधवी भाभी’ भूमिका साकारणारी अभिनेत्री सोनालिका जोशी हिला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं.

मालिकेत कायम साडीत आणि मराठमोळ्या लूकने सर्वांना घायाळ करणारी सोनालिका जोशी खऱ्या आयुष्यात मात्र प्रचंड ग्लॅमरस आहे. मालिकेत पापड – लोणचे विकणारी सोनालिका जोशी हिच्या खासगी आयुष्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सोनालिका जोशी हिच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे.

सोनालिका जोशी हिचा जन्म 5 जून 1976 मध्ये झाली आहे. सोनालिका जोशी हिने तिच्या करियरची सुरुवात थिएटरपासून केली. सोनालिका जोशी हिने तिच्या अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. अभिनेत्रीने काही जाहिरातींसाठी काम केलं. पण सोनालिका जोशी हिला ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतून लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळाली.

सोनालिका जोशी हिने ‘तारक मेहता उल्टा चष्मा’ मालिकेत गोकूळ धाम सोसायटीचे सेक्रेटरी भीडे यांची पत्नी आणि सोनू हिच्या आईच्या भूमिकेला न्याय दिला. सोनालिका जोशी हिच्या खऱ्या आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीच्या पतीचं नाव समीर जोशी आहे. त्यांचा एक फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सोनालिका जोशी आणि समीर जोशी यांचं लग्न 2001 मध्ये झालं होतं. दोघांना एक मुलगी आहे. त्यांच्या मुलीचं नाव आर्या जोशी असं आहे. सोनालिका जोशी सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

सोशल मीडियावर सोनालिका जोशी हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

सांगायचं झालं तर, मालिकेत लोणचे – पापड विकणारी सोनालिका जोशी अभिनयाशिवाय स्वतःचा व्यवसाय देखील करते. मीडिया रिपोर्टनुसार, सोनालिका जोशी हिचं फॅशन डिझायनिंगचा व्यवसाय आहे. मालिकेत साधी दिसणारी माधवी भाभी खऱ्या आयुष्यात रॉयल आयुष्य जगते.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.