‘तारक मेहता..’मधील जेठालालने दयाबेनविषयी अखेर सोडलं मौन; पत्रकार परिषदेत म्हणाले..

अभिनेता नितीश भलूनी याने मालिकेत राज अनाडकतची जागा घेतली आहे. 'तारक मेहता..'मध्ये जेठालालची भूमिका साकारणारे अभिनेते दिलीप जोशी यांनी नितीशसोबत मिळून माध्यमांशी संवाद साधला. यावेळी दिलीप यांनी दयाबेनचीही आठवण काढली.

'तारक मेहता..'मधील जेठालालने दयाबेनविषयी अखेर सोडलं मौन; पत्रकार परिषदेत म्हणाले..
Dilip Joshi and Disha VakaniImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Feb 15, 2023 | 8:09 AM

मुंबई: टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत आहे. आजवर बऱ्याच कलाकारांनी या मालिकेचा निरोप घेतला. नुकतीच यामध्ये नव्या टप्पूची एण्ट्री झाली आहे. अभिनेता नितीश भलूनी याने मालिकेत राज अनाडकतची जागा घेतली आहे. ‘तारक मेहता..’मध्ये जेठालालची भूमिका साकारणारे अभिनेते दिलीप जोशी यांनी नितीशसोबत मिळून माध्यमांशी संवाद साधला. यावेळी दिलीप यांनी दयाबेनचीही आठवण काढली.

दिलीप जोशी यांची पत्रकार परिषद

सोशल मीडियावर दिलीप जोशी आणि नितीश यांच्या पत्रकार परिषदेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये पत्रकारांनी दिलीप यांना दयाबेनविषयी प्रश्न विचारला आहे. मालिकेत दयाबेन परत कधी येणार, असा सवाल जेठालाल यांना करण्यात आला. त्यावर उत्तर देताना दिलीप म्हणाले, “हे तर निर्मात्यांवर अवलंबून आहे. मालिकेत नवीन अभिनेत्री आणायची की नाही, याचा निर्णय तेच घेतील. एक कलाकार म्हणून मला दयाच्या भूमिकेची खूप आठवण येते. बऱ्याच काळापासून प्रेक्षकांनीही दया आणि जेठा यांच्यामधील मजेशीर सीन्सचा आनंद लुटला आहे. जेव्हापासून दिशा या मालिकेतून निघून गेली, तेव्हापासून तो भाग, तो अँगल, ती मजामस्ती गायब आहे. बघुयात, मी तर नेहमीच सकारात्मक विचार करतो. असित भाईसुद्धा नेहमी सकारात्मक असतात. त्यामुळे कधी काय होईल हे सांगता येत नाही.”

मालिकेत नव्या टप्पूची एण्ट्री

या पत्रकार परिषदेत सहभागी झालेल्या नितीशनेही दिलीप जोशी यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक असल्याची प्रतिक्रिया दिली. “दिलीपजी यांना माहीत आहे की भूमिकेत कसं राहायचं आणि भूमिकेत राहून कसं जगायचं. जेव्हा सरांचे सीन सुरू असतात, तेव्हा मी कॅमेराजवळ बसून त्यांचं काम पाहतो”, असं तो म्हणाला.

हे सुद्धा वाचा

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत दयाबेनची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वकानी हिने 2017 मध्ये मालिका सोडली. बाळंतपणासाठी तिने काही दिवस सुट्टी घेतली होती, मात्र नंतर ती मालिकेत परतलीच नाही. दयाबेनला मालिका सोडून पाच वर्षे झाली तरी या मालिकेत नवीन अभिनेत्रीची तिच्या भूमिकेत वर्णी लागली नाही. दिशाला मालिकेत परत आणण्यासाठी निर्माते-दिग्दर्शकांनी अनेक प्रयत्न केले. मात्र त्यात त्यांना यश मिळालं नाही.

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.