‘तारक मेहता..’मध्ये दयाबेन नव्हे तर ‘या’ व्यक्तीची एण्ट्री; पोपटलालच्या घरी वाजणार सनईचौघडे?

'तारक मेहका का उल्टा चष्मा' या मालिकेत नव्या कलाकाराची एण्ट्री झाली आहे. अभिनेत्री पूजा शर्मा या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. पूजाच्या एण्ट्रीने 'पोपटलाल'च्या आयुष्यात महत्त्वपूर्ण घडामोडी घडणार आहेत. ऑडिशननंतर एका तासात पूजाची भूमिकेसाठी निवड झाली.

'तारक मेहता..'मध्ये दयाबेन नव्हे तर 'या' व्यक्तीची एण्ट्री; पोपटलालच्या घरी वाजणार सनईचौघडे?
Popatlal of TMKOCImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 22, 2024 | 12:01 PM

मुंबई : 22 जानेवारी 2024 | ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय मालिका गेल्या 15 वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. गेल्या काही महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांनी या मालिकेचा निरोप घेतला. या मालिकेत दयाबेन कधी परतणार, हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे. ‘तारक मेहता..’मध्ये आता एका अशा अभिनेत्रीची एण्ट्री झाली आहे, जिच्या प्रेमात पत्रकार पोपटलाल वेडा होणार आहे. या अभिनेत्रीचं नाव पूजा शर्मा असं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत पूजाने तिच्या निवडीचा किस्सा सांगितला. मालिकेत तिची भूमिका मोजक्या दिवसांसाठीच असेल. मात्र त्यादरम्यान पोपटलालच्या आयुष्यात बऱ्याच घडामोडी घडताना दिसणार आहेत.

“मला तारक मेहता.. मालिकेच्या निर्मात्यांचा फोन आला होता. त्यांनी मला सांगितलं होतं की मालिकेत माझी भूमिका खूप छोटी असेल. अशा भूमिकांना मी सहसा नकार देते. मात्र ही टीव्हीवरील खूप लोकप्रिय मालिका आहे म्हणून मी लगेचच या भूमिकेला होकार दिला. या मालिकेत मी फक्त सहा एपिसोड्ससाठी काम करणार आहे”, असं पूजाने सांगितलं. ऑडिशन दिल्यानंतर लगेचच एक तासात निर्मात्यांचा फोन आल्याचं पूजाने स्पष्ट केलं.

हे सुद्धा वाचा

मालिकेत पोपटलालची भूमिका साकारणारा अभिनेता श्याम पाठकबद्दल बोलताना पूजा पुढे म्हणाली, “मी जेव्हा त्यांना पहिल्यांदा भेटली तेव्हा त्यांना सांगितलं की अशा प्रकारची कॉमेडी मालिका मी पहिल्यांदा करतेय. त्यामुळे मला तुमच्या मदतीची गरज लागेल. त्यांनी प्रत्येक सीनमध्ये माझी मदत केली. त्यांच्यामुळेच मी ही भूमिका आणखी चांगल्याप्रकारे साकारू शकतेय.” श्याम पाठक यांच्यासोबत जुळून आलेल्या एका योगायोगविषयी तिने पुढे सांगितलं, “आम्ही दोघांनी एकाच क्षेत्रात काम केलंय. आम्ही सीएची तयारी केली आणि दोघंही सीएच्या परीक्षेत इंटरलेव्हलपर्यंत क्लालिफाइड आहोत.”

‘तारक मेहता..’ या मालिकेत अनेकदा पोपटलालच्या लग्नाचा सीक्वेन्स पहायला मिळाला. आता निर्माते पुन्हा एकदा त्याच्या लग्नाचा सीक्वेन्स प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहेत. यावेळी पोपटलालचं लग्न होणार की नाही, हे लवकरच मालिकेत पहायला मिळेल.

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.