‘मूल दत्तक घ्यायचं असतं तर…’, लग्नासाठीच नाही तर मातृत्वाला देखील तब्बूचा नकार; कारण ऐकून व्हाल थक्क

बॉलिवूडच्या ३ प्रसिद्ध सेलिब्रिटींसोबत होते तब्बूचे 'प्रेमसंबंध', पण लग्नापर्यंत नाही पोहोचलं नातं, आज एकटीच राहत असूनही मुल का घेतलं नाही दत्तक? कारण ऐकून व्हाल थक्क

'मूल दत्तक घ्यायचं असतं तर...', लग्नासाठीच नाही तर मातृत्वाला देखील तब्बूचा नकार; कारण ऐकून व्हाल थक्क
Follow us
| Updated on: Jul 10, 2023 | 3:28 PM

मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री तब्बू हिला प्रोफेशनल आयुष्यात यश मिळालं. पण अभिनेत्रीच्या खासगी आयुष्यात मात्र अनेक चढ – उतार आले. वयाच्या ५१ व्या वर्षी देखील तब्बू एकटीच आहे. बॉलिवूडच्या ३ प्रसिद्ध सेलिब्रिटींसोबत तब्बूचे प्रेमसंबंध होते. पण कोणासोबतही अभिनेत्रीचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. अखेर अभिनेत्रीने विवाह न करण्याचा निर्णय घेतला. झगमगत्या विश्वात अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी लग्न केलं नाही, पण मुल दत्तक घेवून मातृत्वाचा आनंद घेतला. पण तब्बूचा फक्त लग्नासाठीच नाही तर मातृत्वाला देखील नकार होता. यामागचं कारण खुद्द तब्बूने एका मुलाखतीत सांगितलं आहे. तब्बू आज बॉलिवूडमध्ये अधिक सक्रिय नसली तरी तिच्या खासगी आयुष्याबद्दल चर्चा मात्र कायम रंगलेल्या असतात.

दत्तक मुलाबाबत अभिनेत्रीला विचारण्यात आलं. तेव्हा अभिनेत्रीने दत्तक मुलांबद्दल स्पष्ट मत व्यक्त केलं. अभिनेत्री म्हणाली, ‘मूल दत्तक घ्यायचं असतं तर कधीच घेतलं असतं. पण त्याला आई – वडील दोघांचं प्रेम मिळणार नसेल तर काय फायदा…’ अभिनेत्रीच्या उत्तराने चाहते हैराण झाले.

तब्बू कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. दरम्यान, बॉलिवूडमध्ये यशाच्या शिखरावर चढत असताना अभिनेत्रीचं तीन प्रसिद्ध सेलिब्रिटींसोबत नाव जोडण्यात आलं. बॉलिवूडमध्ये पाय ठेवल्यानंतर तब्बूचं नाव अभिनेता संजय कपूर आणि साजिद नाडियाडवाला यांच्यासोबत जोडण्यात आलं. पण दोघांसोबत देखील अभिनेत्रीचं नाव अधिक काळ टिकलं नाही.

हे सुद्धा वाचा

साजिद नाडियाडवाला यांच्यासोबत असलेल्या नात्यावर कधीही तब्बूने स्पष्टीकरण दिलं नाही. रिपोर्टनुसार, पत्नी दिव्या भारती हिच्या निधनानंतर साजिद याने तब्बूला डेट करण्यास सुरुवात केली. पत्नीच्या निधनानंतर स्वतःला सावरण्यासाठी तब्बूने साजिद याची मदत केली. पण दोघांच्या नात्याचा अंत फार वाईट झाला.

एवढंच नाही तर, अभिनेत्रीचं नाव दाक्षिणात्य सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेता नागार्जुन याच्यासोबत देखील जोडण्यात आलं. दोघांनी एकमेकांना तब्बल १० वर्ष डेट केलं. पण तेव्हा नागार्जुन विवाहित असल्यामुळे तब्बूसोबत अभिनेत्याचं नातं लग्नापर्यंत पोहचू शकलं नाही. अखेर १० वर्ष डेट केल्यानंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

अक्किनेनी नागार्जुन आणि तब्बू यांची ओळख अभिनेत्री १६ आणि अभिनेता २२ वर्षांचा असताना झाली होती. आज अक्किनेनी नागार्जुन त्याच्या आयुष्यात फार पुढे गेला आहे. तब्बू मात्र आजही एकटं आयुष्य जगते. आज तब्बू आणि अक्किनेनी नागार्जुन यांच्या नात्याला अनेक वर्ष झाली पण त्यांच्या नात्याची चर्चा कायम रंगलेली असते.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.