Tamannaah Bhatia: ‘पती विकत घ्यायला…’, जेव्हा रंगणाऱ्या अफेअरच्या चर्चांवर तमन्नाने सोडलं मौन

जेव्हा रंगणाऱ्या अफेअरच्या चर्चांवर तमन्ना भाटिया हिने व्यक्त केला संताप... अभिनेत्रीच्या वक्तव्यानं सर्वत्र खळबळ.... सध्या सर्वत्र तमन्नाच्या खासगी आयुष्याची चर्चा...

Tamannaah Bhatia: 'पती विकत घ्यायला...', जेव्हा रंगणाऱ्या अफेअरच्या चर्चांवर तमन्नाने सोडलं मौन
Follow us
| Updated on: Jun 21, 2023 | 12:49 PM

मुंबई | अभिनेत्री तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia) सध्या अभिनेता विजय शर्मा याला डेट करत आहे. अनेक ठिकाणी दोघांना एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं. एवढंच नाही नवं वर्षाचं स्वागत देखील दोघांनी मिळून केलं. पण तेव्हा विजय आणि तमन्ना यांनी त्यांचं नातं गुपित ठेवलं होतं. पण काही दिवसांपूर्वी सर्वांसमोर अभिनेत्रीने विजय याच्यासोबत असलेल्या नात्यावरुन मौन सोडलं. पण विजय याला डेट करण्यापूर्वी देखील अभिनेत्रीचं अनेकांसोबत नाव जोडण्यात आलं. काही वर्षांपूर्वी अभिनेत्रीचं नाव अमेरिकेत राहणाऱ्या एका डॉक्टरसोबत जोडण्यात आलं होतं. तमन्ना परदेशातील डॉक्टरसोबत लग्न करणार असल्याच्या चर्चांनी देखील जोर धरला होता.

डॉक्टरसोबत रंगणाऱ्या चर्चांना खुद्द अभिनेत्रीने पूर्ण विराम दिला होता. हे प्रकरण आहे २०१८ मधील… रंगणाऱ्या चर्चांवर संताप व्यक्त करत अभिनेत्रीने धक्कादायक वक्तव्य केलं होतं. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली होती.. अभिनेत्री म्हणाली की, ‘कधी अभिनेता तर कधी क्रिकेटर आता तर डॉक्टर…. पती विकत घेण्यासाठी निघाली आहे… असं मला आता वाटत आहे..’

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘खासगी आयुष्याबद्दल रंगणाऱ्या खोट्या चर्चा मी खपवून घेणार नाही….’ असं देखील अभिनेत्री म्हणाली होती. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली होती. अनेक सेलिब्रिटींसोबत रिलेशनशिपच्या चर्चा रंगल्यानंतर अभिनेत्री आता प्रसिद्ध अभिनेता विजय वर्मा याला डेट करत आहे.

हे सुद्धा वाचा

तमन्ना हिच्या आयुष्यातील रिपलेशनशिपबद्दल सांगायचं झालं तर, २०११ साली अभिनेत्रीचं नाव ‘पोन्नियिन सेलवन’ फेम अभिनेता कार्ती याच्यासोबत जोडण्यात आलं होतं. काही सिनेमांमध्ये देखील दोघांनी एकत्र काम केलं. सिनेमांमधील दोघांची केमिस्ट्री देखील चाहत्यांना प्रचंड आवडली.

‘पोन्नियिन सेलवन’ फेम अभिनेता कार्ती याच्यानंतर अभिनेत्रीचं नाव भारतीय क्रिकेट संघाचा क्रिकेटर विराट कोहली याच्यासोबत देखील जोडण्यात आलं. दोघांनी एका जाहिरातीत एकत्र काम केलं होतं. फक्त विराटच नाही तर, पाकिस्तानी क्रिकेटर अब्दुल रज्जाक याच्यासोबत देखील अभिनेत्रीच्या नावाची चर्चा रंगली होती.

अनेक सेलिब्रिटींसोबत रिलेशनशिपच्या चर्चा रंगल्यानंतर अभिनेत्रीने विजय वर्मा याच्यासोबत असलेल्या नात्याची कबुली दिली आहे. सध्या सर्वत्र विजय आणि तमन्ना यांच्या नात्याची चर्चा रंगत आहे. सोशल मीडियावर देखील दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.

अभिनेत्री तमन्ना देखील सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.