Tamannaah | 72 वर्षीय रजनीकांत यांच्यासोबत तमन्नाचा ऑनस्क्रीन रोमान्स; म्हणाली “मी तर वयाच्या साठीतही..”

'जेलर' या चित्रपटानंतर तमन्ना 67 वर्षीय चिरंजीवी यांच्यासोबत 'भोला शंकर' चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहे. चित्रपटांसोबतच तमन्ना ओटीटी प्लॅटफॉर्मवरही दमदार कामगिरी करतेय. नुकतेच तिचे 'जी करदा' आणि 'लस्ट स्टोरीज 2' हे दोन शोज ओटीटीवर प्रदर्शित झाले.

Tamannaah | 72 वर्षीय रजनीकांत यांच्यासोबत तमन्नाचा ऑनस्क्रीन रोमान्स; म्हणाली मी तर वयाच्या साठीतही..
Tamannaah Bhatia and RajinikanthImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 03, 2023 | 11:00 AM

मुंबई | 3 ऑगस्ट 2023 : मोठ्या पडद्यावर झळकणारे अभिनेते आणि अभिनेत्री यांच्यातील वयाचा फरक हा अनेकदा चर्चेचा विषय ठरतो. सलमान खान, आमिर खान, शाहरुख खान यांसारख्या कलाकारांसोबत जेव्हा कमी वयाच्या हिरोइन दिसतात, तेव्हा प्रेक्षकांमध्ये त्याची आवर्जून चर्चा होते. सध्या अशीच काहीशी चर्चा साऊथ सुपरस्टार रजनीकांत आणि तमन्ना भाटिया यांच्या जोडीविषयी होत आहे. आगामी ‘जेलर’ या चित्रपटात 72 वर्षीय रजनीकांत आणि 33 वर्षीय तमन्ना एकत्र काम करत आहेत. या दोघांच्या वयात 39 वर्षांचं अंतर आहे. चित्रपटातील ‘तू आ दिलबरा’ हे गाणं नुकतंच लाँच करण्यात आलं. यावेळी पत्रकारांनी तमन्नाला या वयाच्या अंतरावरून प्रश्न विचारला.

वयाबद्दल तमन्ना म्हणाली, “मी फक्त इतकंच म्हणेन की तुम्ही वयातील अंतराकडे का पाहता? तुम्ही स्क्रीनवर साकारल्या जाणाऱ्या भूमिकांकडे पहा.” यावेळी तिने हॉलिवूड अभिनेता टॉम क्रूझचं उदाहरण दिलं. टॉम क्रूझने त्याच्या करिअरमध्ये बऱ्याच ॲक्शन चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत आणि कठीणातील कठीण ॲक्शन सीन्स करतानाही त्याने कधीच स्टंट डबलचा वापर केला नाही.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Sun Pictures (@sunpictures)

तमन्ना पुढे म्हणाली, “जर मला वयाबद्दल बोलायचं असेल तर मी वयाच्या 60 व्या वर्षीही टॉम क्रूझचे स्टंट्स पाहीन आणि त्या वयात मला आयटम साँगमध्येही डान्स करायला आवडेल.” ‘जेलर’ या चित्रपटानंतर तमन्ना 67 वर्षीय चिरंजीवी यांच्यासोबत ‘भोला शंकर’ चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहे. चित्रपटांसोबतच तमन्ना ओटीटी प्लॅटफॉर्मवरही दमदार कामगिरी करतेय. नुकतेच तिचे ‘जी करदा’ आणि ‘लस्ट स्टोरीज 2’ हे दोन शोज ओटीटीवर प्रदर्शित झाले. या दोन्ही शोजमधील तमन्नाच्या बोल्ड सीन्सची सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली.

तमन्ना तिच्या खासगी आयुष्यामुळेही सोशल मीडियावर चर्चेत आहे. अभिनेता विजय वर्माला डेट करत असल्याची कबुली तिने स्वत:च एका मुलाखतीत दिली. त्यानंतर अनेकदा दोघांना डेटवर जाताना पाहिलं गेलं. ‘लस्ट स्टोरीज 2’मध्ये दोघांनी पहिल्यांदा एकत्र काम केलं. 2023 या वर्षाच्या सुरुवातीपासूनच तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांना उधाण आलं. नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या पार्टीत या दोघांना एकमेकांना किस करताना पाहिलं गेलं होतं. गोव्यातील दोघांचा फोटो व्हायरल झाला होता. यानंतरही अनेकदा दोघांना एकत्र पाहिलं गेलं. काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत तमन्नाने तिच्या प्रेमाची जाहीर कबुली दिली. ‘लस्ट स्टोरीज 2’च्या सेटवर दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.