Tamannaah Bhatia : ‘या’ पाकिस्तानी क्रिकेटरशी तमन्ना भाटियाचं झालं होतं लग्न? अभिनेत्रीचा खुलासा

केवळ पाकिस्तानी क्रिकेटरच नव्हे तर तमन्नाचं नाव भारतीय क्रिकेटर विराट कोहलीशीही जोडलं गेलं होतं. 2012 मध्ये तमन्ना आणि विराट कोहली हे एका जाहिरातीसाठी एकत्र आले. एका मोबाइल फोनच्या ब्रँडसाठी दोघांनी एकत्र जाहिरात केली होती.

Tamannaah Bhatia : 'या' पाकिस्तानी क्रिकेटरशी तमन्ना भाटियाचं झालं होतं लग्न? अभिनेत्रीचा खुलासा
Tamannaah BhatiaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 05, 2023 | 2:42 PM

मुंबई : अभिनेत्री तमन्ना भाटिया गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत तिने अभिनेता विजय वर्माबद्दलच्या प्रेमाची जाहीर कबुली दिली होती. त्यानंतर आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तमन्नाने तिच्या लग्नाविषयीच्या चर्चांवर उत्तर दिलं. पाकिस्तानी क्रिकेटर अब्दुल रझाक याच्याशी तिचं लग्न झाल्याची चर्चा होती. या चर्चा खऱ्या होत्या का, असा प्रश्न तिला विचारण्यात आला. त्यावर तमन्नाने दिलेलं उत्तर ऐकून तुम्हालाही हसू अनावर होईल.

तमन्नाचा ‘लस्ट स्टोरीज 2’ हा अँथॉलॉजी चित्रपट नुकताच नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. यामध्ये तिने पहिल्यांदाच बॉयफ्रेंड विजय वर्मासोबत स्क्रीन शेअर केला आहे. ‘लस्ट स्टोरीज 2’साठी तमन्नाने तिचा 18 वर्षांपासूनचा ‘नो किसिंग’ नियम मोडला आहे. यामध्ये तमन्ना आणि विजय वर्माचे बरेच इंटिमेट सीन्स आहेत. नवीन वर्षाच्या सुरुवातीला तमन्ना आणि विजयला गोव्यातील एका पार्टीदरम्यान एकमेकांना किस करताना पाहिलं गेलं. तेव्हापासून या दोघांच्या अफेअरच्या चर्चांना सुरुवात झाली होती. त्यानंतर तमन्ना आणि विजयनेही मुलाखतींमध्ये जाहीरपणे एकमेकांविषयीचं प्रेम व्यक्त केलं. आता पाकिस्तानी क्रिकेटर अब्दुल रझाकसोबतच्या लग्नाविषयी तमन्ना मोकळेपणे व्यक्त झाली.

हे सुद्धा वाचा

“या चर्चा ऐकून मला असंच म्हणावं लागेल की, मजाक मजाक में अब्दुल रझाक हो गया”, असं ती म्हणाली. असं म्हणतानाच तिने लग्नाच्या चर्चांमध्ये काहीही तथ्य नसल्याचं स्पष्ट केलं. केवळ पाकिस्तानी क्रिकेटरच नव्हे तर तमन्नाचं नाव भारतीय क्रिकेटर विराट कोहलीशीही जोडलं गेलं होतं. 2012 मध्ये तमन्ना आणि विराट कोहली हे एका जाहिरातीसाठी एकत्र आले. एका मोबाइल फोनच्या ब्रँडसाठी दोघांनी एकत्र जाहिरात केली होती. त्यावेळी विराटसुद्धा क्रिकेटविश्वात जलदगतीने नाव कमावत होता. तर तमन्ना दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री ठरली होती. जाहिरातीत एकत्र काम केल्यानंतर दोघांच्या अफेअरच्या चर्चा सुरु झाल्या होत्या.

View this post on Instagram

A post shared by Netflix India (@netflix_in)

विराटसोबतच्या अफेअरच्या चर्चांवरही तमन्नाने या मुलाखतीत उत्तर दिलं. “प्रमोशनदरम्यान मी त्याच्याशी फक्त चार शब्द बोलले आणि त्यानंतर आम्ही कधीच एकमेकांशी बोललो नाही किंवा भेटलो नाही”, असं ती म्हणाली. त्याचसोबत विराटसोबत जाहिरातीत काम करण्याचा अनुभव खूप चांगला होता असं तिने सांगितलं.

'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.