अभिनेत्याचा रिक्षात मृतदेह, चित्रपटसृष्टीत सलग दोन दशकं संघर्ष करणाऱ्या दिग्गजाची काळीज चिरणारी एक्झिट !

तामिळ अभिनेता Virutchagakanth याचा चेन्नईच्या एका ऑटो रिक्षात मृत्यू झाला (Tamil actor Virutchagakanth death in Auto Rikshaw in Chennai)

अभिनेत्याचा रिक्षात मृतदेह, चित्रपटसृष्टीत सलग दोन दशकं संघर्ष करणाऱ्या दिग्गजाची काळीज चिरणारी एक्झिट !
अभिनेत्याचा रिक्षात मृतदेह, दोन दशकं संघर्ष, मुख्य भूमिका साकारण्याचं स्वप्न अधूरं सोडत निघून गेला
Follow us
| Updated on: Mar 24, 2021 | 10:26 PM

चेन्नई : तामिळ अभिनेता Virutchagakanth याचा चेन्नईच्या एका ऑटो रिक्षात मृत्यू झाला. Virutchagakanth गेल्या कित्येक वर्षांपासून तामिळ चित्रपटसृष्टीत स्वत:ला सिद्ध करण्यासाठी संघर्ष करत होता. मात्र, त्याचं हिरो बनण्याचं स्वप्न अपूर्णच राहिलं. त्याने चेन्नईत एका रिक्षात अखेरचा श्वास घेतला. तो रिक्षात झोपला असताना त्याची प्राणज्योत मालवली, अशी माहिती समोर येत आहे. त्याच्या मृत्यूची आणि संघर्षाची माहिती समोर आल्यानंतर तामिळ सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. अनेक दिग्गजांनी त्याला श्रद्धांजली अर्पण केली आहे (Tamil actor Virutchagakanth death in Auto Rikshaw in Chennai).

कमाईचं काहीच साधन नसल्याने रिक्षात झोपायचा

Virutchagakanth गेल्या काही दिवसांपासून आर्थिक अडचणीतून जात होता. त्याने चित्रपटसृष्टीत काम शोधण्याचा प्रचंड प्रयत्न केला. मात्र, त्याला काम मिळत नव्हतं. Virutchagakanth त्याच्या आई-वडिलांच्या मृत्यूनंतर एकटा पडला होता. त्यामुळे तो जास्त नैराश्यात गेला होता. याशिवाय काही दिवसांपूर्वी त्याला चित्रपटांमध्ये काम मिळणं बंद झालं होतं. त्यामुळे त्याची आर्थिक परिस्थिती जास्त खालावली होती. कमाईचं काहीच साधन नसल्याने त्याला रिक्षात झोपावं लागायचं. बऱ्याचदा तो मंदिरातही झोपायचा. त्यामुळे तो शारीरिक आणि मानसिकरित्या जास्त कमजोर होत चालला होता. त्याने काम मिळावं यासाठी खूप प्रयत्न केले. मात्र, त्याला अपयश आलं.

Virutchagakanth च्या मदतीसाठी मोठ्या दिग्दर्शकाची विनंती 

काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध दिग्दर्शक साई धीना यांनी त्याची मदत करण्याचा प्रयत्न केला होता. ते त्याला मंदिरातच भेटले होते. त्यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत Virutchagakanth या अभिनेत्याला सिनेसृष्टीत काम दिलं जावं, अशी विनंती अनेक चित्रपट निर्मात्यांना केली होती. मात्र, तरीही कोणत्याच दिग्दर्शकाने त्याला आपल्या चित्रपटात काम दिलं नाही.

Virutchagakanth चा शंघर्षमय प्रवास

Virutchagakanth ने 2004 मध्ये Kaadhal या चित्रपटातून तामिळ चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. या चित्रपटात त्याने संघर्ष करणाऱ्या अभिनेत्याची भूमिका साकारली होती. त्याची भूमिका छोटी होती. मात्र, त्या चित्रपटातील एका डायलॉग खूप गाजला होता. ‘जर मी अभिनय करणार तर फक्त हिरोची भूमिका साकरणार’, असा तो डायलॉग होता. मात्र, त्या चित्रपटानंतर त्याच्या करिअरला ब्रेक लागला. तेव्हापासून तो संघर्ष करतोय. आता त्याच्या मृत्यूनंतर सगळे सेलेब्रिटि त्याच्याप्रती श्रद्धांजली अर्पण करत आहेत (Tamil actor Virutchagakanth death in Auto Rikshaw in Chennai).

हेही वाचा : Maharashtra Corona Update : 2021 मधील सर्वाधिक रुग्ण, महाराष्ट्रात दिवसभरात 31 हजार 855 जण पॉझिटिव्ह! 

Non Stop LIVE Update
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.