ऐश्वर्या लैंगिक शोषणाची शिकार, काम मिळत नसल्यामुळे करते ‘असं’ काम

ऐश्वर्या हिला फोनवर कोण पाठवत आहे अश्लील मेसेज आणि फोटो? अभिनेत्रीच्या वक्तव्यानंतर सर्वत्र खळबळ... सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्री आला धक्कादायक अनुभव

ऐश्वर्या लैंगिक शोषणाची शिकार, काम मिळत नसल्यामुळे करते 'असं' काम
Follow us
| Updated on: Apr 22, 2023 | 12:11 PM

मुंबई : अनेक अभिनेत्रींनी झगमगत्या विश्वात काम करत असताना आलेला अनुभव सांगितला आहे. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली. आता देखील एका प्रसिद्ध अभिनेत्रीने सोशल मीडियाच्या माध्यामातून तिला आलेला अनुभव सांगितला आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्री आणि तिने केलेल्या वक्तव्याची चर्चा आहे. अभिनेत्रीकडे गेल्या अनेक दिवसांपासून काम नसल्यामुळे अभिनेत्री इतर मार्गांच्या माध्यामातून स्वतःची आणि कुटुंबाची भूक भागवत आहे. दाक्षिणात्य सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या भास्करन हिने आलेल्या अनुभवाबद्दल सांगितलं आहे. वयाच्या ५१ व्या वर्षी अभिनेत्री लैंगिक शोषणाची शिकार झाली आहे. ऐश्वर्या हिच्याकडे काम नसल्यामुळे अभिनेत्री सध्या साबण विकण्याचं काम करत आहे.

ऐश्वर्या साबण विकण्यासोबतच युट्यूब चॅनलवर देखील कायम सक्रिय असते. अभिनेत्रीच्या युट्यूब चॅनलचं नाव ‘मल्टी मॉम’ असं आहे. दरम्यान अभिनेत्रीने, लैंगिक शोषणाची शिकार झाली असल्याचं वक्तव्य केलं आहे. ऐश्वर्याने २०२२ साली साबण विकण्याचं काम सुरु केलं. अभिनेत्री युट्यूब चॅनलवर कुकिंग क्लास देखील घेते. सोबतच साबण विकण्याचा व्यवसाय देखील करते.

सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यवसाय करत असताना अनेकदा लैंगिक शोषणाची शिकार झाल्याची माहिती अभिनेत्रीने दिली आहे. व्यवसाय करत असल्याने ऐश्वर्याने तिचानंबर सोशल मीडियावर शेअर केला होता. ज्यामुळे ग्राहकांना संपर्क साधणं आणि ऑर्डर्स देणं सोप होईल. पण लोकांनी अभिनेत्रीच्या मोबाईल नंबरचा वापर चुकीच्या पद्धतीने केला.

हे सुद्धा वाचा

सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनी अभिनेत्री अश्लील मेसेज आणि फोटो पाठवले आहेत. ऐश्वर्या म्हणाली की, अनेकांनी अभिनेत्री प्रायव्हेट पार्टचे देखील फोटो पाठवले आहे, तर अनेकांनी अभिनेत्रीला मेसेज केले आहे. आता कोणी मेसेज किंवा फोटो पाठवल्यानंतर पोलिसात तक्रार दाखल करणार… असं अभिनेत्री ऐश्वर्या म्हणाली आहे. सध्या सर्वत्र ऐश्वर्या भास्करन हिची चर्चा रंगत आहे.

ऐश्वर्या हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने अनेक प्रसिद्ध अभनेचत्यांसोबत स्क्रिन शेअर केली आहे. अभिनेत्रीने सुपरस्टार रजनीकांत यांच्यासोबत ‘यमराज’ सिनेमात काम केलं आहे. शिवाय ‘हाऊसफुल’ सिनेमात देखील अभिनेत्रीने काम केलं आहे. पण आता अभिनय क्षेत्रात काम मिळत नसल्यामुळे अभिनेत्री व्यवसाय सुरु केला आहे.

ऐश्वर्या हिने १९९३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गर्दिश’ सिनेमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. सिनेमात अभिनेते जॅकी श्रॉफ, डिंपल कपाडिया, शम्मी कपूर, अमरीश पुरी, फरीदा जलाल, राज बब्बर, सुरेश ओबेरॉय आणि अन्नू कपूर यांनी देखील महत्त्वाची भूमिका साकारली होती.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.