AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tejaswini Pandit: “घरभाड्याच्या बदल्यात नगरसेवकाने केली घाणेरडी मागणी”; तेजस्विनी पंडितचा धक्कादायक खुलासा

तेजस्विनी पंडितने सांगितला 'तो' वाईट अनुभव; "घराचं भाडं द्यायला गेली असताना नगरसेवकाने.."

Tejaswini Pandit: घरभाड्याच्या बदल्यात नगरसेवकाने केली घाणेरडी मागणी; तेजस्विनी पंडितचा धक्कादायक खुलासा
तेजस्विनी पंडितImage Credit source: Instagram
| Updated on: Dec 20, 2022 | 11:05 AM
Share

मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विनी पंडितने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत धक्कादायक खुलासा केला. करिअरच्या सुरुवातीला एका घरमालकाने घरभाड्याच्या बदल्यात शरीरसुखाची मागणी केली, असं तिने सांगितलं. इतकंच नव्हे तर हा घरमालक पुण्यातील एक नगरसेवक होता, असंही तिने म्हटलंय. शरीरसुखाची मागणी करणाऱ्या घरमालकाला त्यावेळी तेजस्विनीनेही चांगलाच धडा शिकवला.

“2009-2010 मध्ये मी पुण्यातील सिंहगट रोडवरील एका अपार्टमेंटमध्ये मी भाड्याने राहत होते. ते घर एका नगरसेवकाच्या मालकीचं होतं. एके दिवशी मी घराचं भाडं देण्यासाठी नगरसेवकाच्या ऑफिसमध्ये गेले, तेव्हा त्याने माझ्याकडे घरभाड्याच्या बदल्यात घाणेरडी मागणी केली”, असा खुलासा तेजस्विनीने एका पॉडकास्ट मुलाखतीत केला.

या घटनेबद्दल सांगताना ती पुढे म्हणाली, “त्या नगरसेवकाच्या टेबलावर असलेला पाण्याचा ग्लास उचलला आणि त्याच्या चेहऱ्यावर मी ते पाणी फेकलं. अशा मार्गाचा अवलंब करायचा असता तर भाड्याच्या घरात राहिले नसते. माझ्याकडे माझं स्वत:चं घर असतं, दारात गाड्या असत्या, असं मी त्याला सुनावलं.”

“असं दोन गोष्टींमुळे घडलं होतं. त्याने माझ्या कामावरून माझ्याबद्दल मत बनवलं आणि दुसरी गोष्टी म्हणजे आर्थिकदृष्ट्या मी कमकुवत होते. मात्र अशा घटनांमधून मलाही शिकता आलं”, असंही तिने सांगितलं.

तेजस्विनीने 2004 मध्ये ‘अगंबाई अरेच्चा’ या चित्रपटातून मराठी कलाविश्वात पाऊल ठेवलं. त्यानंतर तिने ‘मी सिंधुताई सपकाळ’, ‘तू ही रे’, ‘देवा’ अशा चित्रपटांमध्ये काम केलं. तिने काही मालिकांमध्येही महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या. वेब विश्वातही तेजस्विनीने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली. इन्स्टाग्रामवरही तेजस्विनीचा मोठा चाहतावर्ग आहे.

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.