‘इतकं कठीण असतं का 25-26 वर्षांचा सुखाचा संसार विसरणं?’; मिलिंद गवळी यांची पोस्ट चर्चेत

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेत प्रेक्षकांना ज्या क्षणाची आतुरता होती, अखेर तो क्षण आला आहे. देशमुख कुटुंबीयांसमोर अखेर आशुतोष अरुंधतीवरील (Arundhati) त्याच्या प्रेमाची जाहीर कबुली देणार आहे.

'इतकं कठीण असतं का 25-26 वर्षांचा सुखाचा संसार विसरणं?'; मिलिंद गवळी यांची पोस्ट चर्चेत
Milind GawliImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 06, 2022 | 12:23 PM

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेत प्रेक्षकांना ज्या क्षणाची आतुरता होती, अखेर तो क्षण आला आहे. देशमुख कुटुंबीयांसमोर अखेर आशुतोष अरुंधतीवरील (Arundhati) त्याच्या प्रेमाची जाहीर कबुली देणार आहे. अनिरुद्धच आशुतोषला ही कबुली देण्यास भाग पाडणार आहे. मालिकेचा हा नवीन प्रोमो नुकताच सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. हाच प्रोमो शेअर करत मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारणारे अभिनेते मिलिंद गवळी (Milind Gawali) यांनी विशेष पोस्ट लिहिली आहे. त्यांची हीच पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. मिलिंद गवळी हे नेहमीच मालिकेतील घडामोडींविषयी सोशल मीडियावर आपली मतं मांडत असतात. ते साकारत असलेली अनिरुद्धची भूमिका जरी नकारात्मक असली तरी त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे.

मिलिंद गवळी यांची पोस्ट-

‘अरे करतोच ना अरुंधतीवर प्रेम, मग बोल ना. अनिरुद्धने बोलायला भाग पाडलं आशुतोष केळकरला, भाग पाडलं अरुंधतीविषयीचे त्याचं प्रेम व्यक्त करायला. आता नात्यांची गुंतागुंत वाढत चालली आहे. अनिरुद्ध देशमुखची घालमेल वाढत चालली आहे. अरुंधतीच्या आयुष्यात दुसरी व्यक्ती अनिरुद्ध सहन करू शकत नाही. आशुतोष केळकरचं अरुंधतीवर प्रेम आहे याचा त्याला आधीपासूनच संशय होता आता त्याची खात्री पटली. अनिरुद्ध देशमुख अरुंधतीचं आयुष्य, तिच्या जीवनाचा प्रवास अजूनच कठीण करून ठेवतो आहे. स्वतःही सुखात राहत नाही आणि दुसऱ्याला ही सुखात राहू देत नाही आहे तो. का असं वागतो तो? काय हवं आहे त्याला नेमकं? इतकं कठीण असतं का पंचवीस-सव्वीस वर्षांचा सुखाचा संसार विसरणं?,’ असा प्रश्न त्यांनी या पोस्टद्वारे उपस्थित केला आहे.

आशुतोष देणार अरुंधतीवरील प्रेमाची कबुली

मालिकेच्या पुढील भागांत आशुतोष हा अखेर अरुंधतीवरील प्रेमाची कबुली चक्क देशमुख कुटुंबीयांसमोर देणार आहे. आता त्यावर देशमुख कुटुंबीय, विशेषकरून अनिरुद्ध आणि कांचन यांची प्रतिक्रिया काय असेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. इतकंच नव्हे तर अरुंधतीला समजल्यानंतर ती काय बोलणार, याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागून असेल. अरुंधती आशुतोषच्या प्रेमाचा स्वीकार करणार की त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करणार, हे प्रेक्षकांना मालिकेच्या आगामी भागांत पहायला मिळेल.

हेही वाचा: 

‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेतून प्रसिद्ध अभिनेत्रीची एग्झिट; सोशल मीडियावर लिहिली भावनिक पोस्ट

नागराजमुळे त्या पठ्ठ्याचं आयुष्यच बदललं; 20 वर्षीय मुलाचं स्वप्न साकार

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.