Aai Kuthe Kay Karte | अरुंधती आजारी तरी संजनाला लागलीय लग्नाची घाई, आता कोणाची साथ देईल अनिरुद्ध?

अरुंधतीला पुन्हा समृद्धी बंगल्यात आणणार हे ऐकून संजना प्रचंड संतापली आहे. या दरम्यान तिने अनिरुद्धचा भाऊ अविनाश याच्यावर देखील घर हडपण्यासाठी आलायस असे आरोप केले. तर दुसरीकडे तिचा देखील घटस्फोट झाल्याने आता संजना लग्नासाठी अनिरुद्धच्या मागे लागली आहे.

Aai Kuthe Kay Karte | अरुंधती आजारी तरी संजनाला लागलीय लग्नाची घाई, आता कोणाची साथ देईल अनिरुद्ध?
आई कुठे काय करते
Follow us
| Updated on: Aug 20, 2021 | 12:11 PM

मुंबई : छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) आता एका वेगळ्या टप्प्यावर पोहोचली आहे. मालिकेत आता आई-बाबा अर्थात अनिरुद्ध आणि अरुंधती देशमुख यांचा घटस्फोट झाला आहे. कायदेशीररित्या एकमेकांपासून फारकत घेऊन आता हे दोघे वेगळे झाले आहेत. अनिरुद्धला घटस्फोट देण्याबरोबरच अरुंधतीने आता देशमुखांच्या घराचा देखील निरोप घेतला आहे.

घटस्फोटाच्या दिवशी आपलं सगळं सामान आवरून, 25 वर्षातील संसाराच्या आठवणी मागे सोडून अरुंधती आता पुढील आयुष्यातील तिच्या नव्या प्रवासाला सज्ज झाली आहे. मात्र आता इतक्यातच तिच्या ऑपरेशनची घाई देखील सुरु झाली आहे. पोटातील गाठ वाढत असल्याने आता अरुंधतीचं ऑपरेशन झालं आहे. या दरम्यान आरामासाठी अरुंधतीला पुन्हा समृद्धी बंगल्यात आणावं या निर्णयावर देशमुख कुटुंबातील सर्वांचेच एकमत झाले आहे.

संजनाचा जळफळाट

अरुंधतीला पुन्हा समृद्धी बंगल्यात आणणार हे ऐकून संजना प्रचंड संतापली आहे. या दरम्यान तिने अनिरुद्धचा भाऊ अविनाश याच्यावर देखील घर हडपण्यासाठी आलायस असे आरोप केले. तर दुसरीकडे तिचा देखील घटस्फोट झाल्याने आता संजना लग्नासाठी अनिरुद्धच्या मागे लागली आहे. त्यातच अरुंधती घरी येणार हे कळल्यावर आणि घटस्फोटानंतरही अनिरुद्धचा तिच्याकडे वाढता झुकाव बघता संजनाला खूप असुरक्षित वाटू लागलं आहे. त्यामुळे आजारी अरुंधती घरी आल्यावर संजना लग्नाचा घाट घालणार आहे.

काय असेल अनिरुद्धचा निर्णय?

ऑपरेशन नंतर अरुंधती घरी येताच तिच्या पाठोपाठ संजना देखील देशमुखांच्या बंगल्यात आली आहे. येताच तिने सर्वांना आपण लग्नाची तारीख पक्की करून आल्याचे सांगितले आहे. दोन दिवसांनी माझं आणि अनिरुद्धचं लग्न असून, बरं झालं अरुंधती तू आलीस आता मला लग्नात तुझी मदत होईल, असं संजना तिला म्हणते. एकीकडे आजारी अरुंधती तर दुसरीकडे संजनाची लगीनघाई, यातून आता अनिरुद्ध कोणाची निवड करणार आणि त्याचा निर्णय काय असणार, याकडे सगळ्या प्रेक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे.

पाहा मालिकेचा नवा प्रोमो :

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

‘आई’चा लूक बदलणार?

आता मालिकेत अरुंधतीचा लूक बदलणार असल्याची चर्चा होत आहे. मालिकेत एकीकडे अनिरुद्ध-अरुंधतीचा घटस्फोट दाखवला जात आहे, तर दुसरीकडे ‘अरुंधती’ साकारणाऱ्या मधुराणी प्रभुलकर हिने सोशल मीडियावर नवा लूक शेअर केला आहे. या लूकमध्ये मधुराणी अतिशय शॉर्ट केसांसह नव्या लूकमध्ये दिसत आहे. या फोटोंमुळे सोशल मीडियावर अरुंधतीच्या बदलत्या लूकची चर्चा होत आहे.

हेही वाचा :

‘बाजिंद’ रंगात रंगणार सैराटच्या ‘लंगड्या-सल्या’ची जोडी, मोठ्यापडद्यानंतर आता छोटा पडदा गाजवणार!

सुशांतसोबतच्या ‘काय पो चे’ने मिळवून दिली ओळख, वाचा कसा होता अमृता पुरीचा चित्रपट प्रवास…

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.