‘आपण बरं अन् आपलं काम बरं’ अशी मंडळी घातक ठरतात? अनघामुळे देशमुखांचं घर पुन्हा फुटीच्या उंबरठ्यावर?

(Aai kuthe kay karte) अनघा आणि अभिषेकमध्ये का झाला वाद? जाणून घ्या, मालिकेच्या आजच्या भागातील ट्विस्ट

'आपण बरं अन् आपलं काम बरं' अशी मंडळी घातक ठरतात? अनघामुळे देशमुखांचं घर पुन्हा फुटीच्या उंबरठ्यावर?
Aai Kuthe Kay Karte
Follow us
| Updated on: Feb 24, 2022 | 5:22 PM

अनेक वर्षं गृहिणी म्हणून आपल्या कुटुंबीयांसाठी, पतीसाठी झटत राहिलेली स्त्री जेव्हा स्वत:चं महत्त्व समजते आणि स्वत:च्या अस्तित्वासाठी लढत असते, तेव्हा तिच्यासमोरचा मार्ग हा आणखी खडतर झालेला असतो. अशाच एका स्त्रीची कथा दाखवत आपल्या प्रत्येक एपिसोडमधून ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेने असंख्य स्त्रियांना बळ देण्याचं काम केलं आहे. मालिकेत नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये अरुंधती (Arundhati) देशमुखांचं घर कायमस्वरुपी सोडून जाते. अरुंधतीची सून अनघा हिने नेहमीच तिची बाजू घेतली आहे. आई घरातून गेल्यानंतरही अभिषेकला काहीच फरक पडत नसल्याचं पाहून अनघाला मात्र राग अनावर होतो. कशाचीही पर्वा न करता अभिषेकसोबत हनिमूनला जाण्याचा पर्याय अनघासमोर असतो. मात्र ती अरुंधतीची बाजू खंबीरपणे मांडत नवऱ्याची कानउघडणी करते. (Marathi Serial Updates)

‘आपण बरं अन् आपलं काम बरं’

आई घर सोडून गेल्यानंतर अभिषेक त्याच्या हनिमूनचं प्लॅनिंग करत असतो. गोव्याची तिकिटंसुद्धा त्याने काढली असतात. मात्र आईसोबत घडलेल्या घटनेचा काडीमात्रही परिणाम मुलावर न झाल्याचं पाहून अनघा आश्चर्यचकित होते. “घरात काय परिस्थिती ते बघ. कोणाचाही मूड नाही आणि त्यात आपण कसं जाणार”, असा सवाल ती अभिषेकला करते. यावर अभिषेक तिला नेहमीसारखीच उत्तरं देतो. “यांची भांडणं चालू राहणार. त्यात आपण तरी काय करणार”, असं तो म्हणतो. हे ऐकून अनघा त्याची चांगलीच कानउघडणी करते. “आईच्या चारित्र्यावर संशय घेत असताना यश निदान कुणाची तरी बाजू घेत होता, त्याला जे वाटतं ते बोलत तरी होता. तू किमान गरज आहे तिथे तरी बोल. अशा स्वभावाला कातडीबचावपणा म्हणतात”, अशा शब्दांत ती अभिषेकला सुनावते. ‘आपण बरं अन् आपलं काम बरं, इतर लोकांमध्ये मला नाक खुपसायला नाही आवडत’, अशी उडवाउडवीची उत्तर अभिषेक तिला देतो.

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

एकीकडे अरुंधती घर सोडून गेल्यानंतर आता अनघा आणि अभिषेकमधील वादामुळे देशमुखांचं घर पुन्हा फुटीच्या उंबरठ्यावर आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अनघाने नेहमीच तिची बाजू स्पष्टपणे मांडली आहे. अभिषेकचा स्वभाव मात्र तिच्याविरुद्ध आहे. अशात ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत पुढे काय घडणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.