किरण माने पुन्हा मैदानात, उद्या पत्रकार परिषद घेणार, अनेकांची गुपितं उघड करण्याचा इशारा

किरण माने उद्या दुपारी साडे तीन वाजता ते मुंबई प्रेस क्लबमध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत. कुठलीही स्त्री असो वा पुरुष... खोटे आरोप करताना हजारवेळा विचार करेल असं संविधानिक मार्गानं काहीतरी करून दाखवण्याच निर्धार त्यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून केला आहे.

किरण माने पुन्हा मैदानात, उद्या पत्रकार परिषद घेणार, अनेकांची गुपितं उघड करण्याचा इशारा
किरण माने
Follow us
| Updated on: Feb 03, 2022 | 3:56 PM

मुंबई : अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांना स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील मुलगी झाली हो (Mulgi Zali Ho) या मालिकेतून काढून टाकल्यानंतर प्रोडक्शन हाऊस, मालिकेतील कलाकार, ट्रोलर, नेतेमंडळी यांच्यात जवळपास एक आठवडा खडाजंगी रंगली होती. मालिकेतील काही कलाकारांनी त्यांच्यावर गैरवर्तनाचा ठपका ठेवला होता. त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा मानस किरण माने यांनी बोलून दाखवला होता. आता आज एक फेसबुक पोस्ट करुन नव्या लढ्याची घोषणाच किरण माने यांनी केली आहे. उद्या मुंबईत पत्रकार परिषद घेऊन खूप गुपितं उघडी करायची आहेत, असं सांगत कुठलीही स्त्री असो वा पुरुष… खोटे आरोप करताना हजारवेळा विचार करेल असं संविधानिक मार्गानं काहीतरी करून दाखवण्याच निर्धार त्यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून केला आहे. उद्या दुपारी साडे तीन वाजता ते मुंबई प्रेस क्लबमध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत.

‘प्रेस कॉन्फरन्स घेतोय उद्या. मुंबईत. …लै खुलासे करायचेत. लै गुपितं उलगडायची हायेत. हा आता माझा एकट्याचा लढा नाय र्‍हायला. तुम्हा सगळ्यांचा झालाय. तुम्ही कुठल्याबी क्षेत्रात असा, तुम्हाला न सांगता-गुपचूप कटकारस्थान करून तुम्हाला कामावरुन काढायची हिम्मत नाही झाली पाहिजे कुणाची. कुठलीही स्त्री असो वा पुरुष, तुमच्यावर खोटे आरोप करताना हजारवेळा विचार करेल असं काहीतरी संविधानिक मार्गाने करुन दाखवतो’, असं किरण माने यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

किरण माने यांनी फेसबुक पोस्टमध्ये काय म्हटलंय?

‘किरण माने पॅटर्न इथून पुढे तुमच्यावर कोणताही अन्याय होऊ देणार नाही. अहो, पैशाचा, सत्तेचा, वर्चस्ववादाचा माज एकच गोष्ट उतरवू शकते ते म्हणजे ‘संविधान’ ! मला वाटलं होतं की ह्या अत्यंत क्रूर, निर्दयीपणे केलेल्या अन्यायाबद्दल या यंत्रणेचा ‘अंतरात्मा’ जागा होईल. कुठल्यातरी राजकीय नेत्याला आपला स्वत:चा संघर्ष आठवेल. पण नाही.. 99% राजकीय नेते भांडलवलदारांचे गुलाम आहेत. माझ्यावर अन्याय करणारी यंत्रणा पैशांच्या धुंदीत आहे.”

“आपण राजकिय नेते खिशात घेऊन फिरतो.. काहीही कारस्थान करु.. हा कोण क्षुल्लक सामान्य माणूस आपल्याशी लढू पहातोय? अस्सा खड्यासारखा बाजूला करु त्याला.” अशा मग्रूरीत आहेत ही धेंडं …पण भावांनो, ही मुजोरी-बेबंदशाही मोडून काढण्याचा शेवटचा मार्ग डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या हातात ठेवलाय की. आता सुट्टी नाही. जीवाचं रान करीन.. रक्ताचं पाणी करीन…होत्याचं नव्हतं करीन… पन न्याय मिळवूनच राहीन… जिंकेन नायतर मरेन. जिंकलो, तर तुम्हा सगळ्यांचा विजय असेल… मेलो…तर मात्र तुम्हा सगळ्यांना मुडद्यासारखं जगत, खाली मान घालून, घाबरत काम करावं लागंल… मान वर केली, आवाज उठवला, बंड केलं तर “एS तुझा किरण माने करेन… असं सुनावलं जाईल.”

“पण काय पण म्हणा.. या लोकांनी अन्याय करायला लै चुकीचा माणूस निवडला भावांनो.. नाय नाय नाय नाय… लै हार्ड माणसाला हात घातलाय ह्या बेट्यांनी! नाय ह्यांची पळता भुई थोडी केली तर किरण माने नाव लावनार नाय.”

“उद्या ४ फेब्रुवारी.. दुपारी ३.३० वाजता, मी आणि माझे वकिल असिम सरोदे-रमा सरोदे प्रेस कॉन्फरन्स घेतोय. मुंबई प्रेस क्लब.. आझाद मैदान पोलीस स्टेशनसमोर, मुंबई. जमलं तर या. जय जिजाऊ…जय शिवराय… जयभिम… तुकाराम महाराज की जय !”, असं सरतेशेवटी किरण माने यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

संबंधित बातम्या

Kiran Mane Post : ‘कट रचला जातोय; पण माझ्याकडेही पुरावे आहेत, वेळ आली की बाहेर काढेन’

किरण मानेंच्या विरोधात मनसे मैदानात, ‘इतर कलाकारांना त्यांनी त्रास दिला, योग्य वेळेस उत्तर देऊ!’

Kiran Mane | मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा अभिनेता किरण मानेंना पाठिंबा, दिला महाराष्ट्राच्या वारशाचा दाखला, म्हणाले…

Actor Kiran Mane | साहेबांसमोर खरा माणूसच बसू शकतो…पवार भेटीनंतर काय म्हणतायत अभिनेते माने?

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.