किडनी फेल्युअरशी झुंज देतेय प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री, आर्थिक अडचणींमुळे उपचार घेणे अवघड!

छोट्या पडद्याची प्रसिद्ध अभिनेत्री अनाया सोनी (Anaya Soni) सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यातील त्रासांमुळे चर्चेत आली आहे. सध्या अभिनेत्री तिच्या आयुष्यात बर्‍याच समस्यांना सामोरी जात आहे.

किडनी फेल्युअरशी झुंज देतेय प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री, आर्थिक अडचणींमुळे उपचार घेणे अवघड!
अनाया सोनी
Follow us
| Updated on: Jul 12, 2021 | 2:18 PM

मुंबई : छोट्या पडद्याची प्रसिद्ध अभिनेत्री अनाया सोनी (Anaya Soni) सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यातील त्रासांमुळे चर्चेत आली आहे. सध्या अभिनेत्री तिच्या आयुष्यात बर्‍याच समस्यांना सामोरी जात आहे. टीव्ही जगतातली ही प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल आहे. अनायाची अवस्था इतकी बिकट आहे की, तिच्याकडे उपचारासाठी पैसेही देखील नाहीत.

पैशांच्या अभावामुळे तिने लोकांना आणि त्याच्या जवळच्या नातेवाईकांना मदतीसाठी आवाहन केले आहे. चाहत्यांनी अनाया सोनीला प्रसिद्ध टीव्ही सीरियल ‘नामकरण’ मध्ये काम करताना पाहिले आहे. अनायाने स्वत: चाहत्यांना तिच्या आरोग्याविषयी माहिती दिली आहे.

अनायाने सांगितली सत्य परिस्थिती

View this post on Instagram

A post shared by ANAYA T SONI (@theanayasoni)

अलीकडेच अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, या व्हिडीओमध्ये स्वत: अनाया दिसली आहे. व्हिडीओमध्ये ती गेल्या 6 वर्षांपासून एका किडनीवर कशी राहत आहे, हे सांगताना दिसत आहे. तिला उपचारांसाठी पैशांची गरज असल्याचे देखील अभिनेत्रीने सांगितले आहे. त्याचबरोबर तिने हे देखील सांगितले की, तिच्या बिकट आर्थिक स्थितीमुळे तिचे उपचार योग्य प्रकारे होऊ शकले नाहीत.

‘या’ रुग्णालयात घेतेय उपचार

अनाया सोनी सध्या मुंबईतील होली स्पिरीट हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत. टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना अभिनेत्री म्हणाली की, मी 2015 पासून एका किडनीवर जगात आहे. काही वर्षांपूर्वी माझी दोन्ही मूत्रपिंड निकामी झाली होती. तरीही त्यावेळी माझ्या वडिलांनी मला एक किडनी दान केली होती. पण, आता ती किडनीही खालावली आहे, म्हणून आता पुन्हा किडनी प्रत्यारोपणाची गरज आहे.

अनाया सांगते की, मला आयुष्यात अशा परिस्थितीला सामोरे जावे लागेल असे कधी वाटले नव्हते. आता तिच्याकडे कोणतीही बचत शिल्लक नसल्यामुळे, ती अधिक नाराज असल्याचे अभिनेत्रीने म्हटले आहे. अभिनेत्रीने सांगितले की, तिचा भाऊ देखील एक चांगले काम करत होता, आईचा स्वतःचा व्यवसाय देखील होता, परंतु जेव्हा माझ्या घराला आग लागली तेव्हा सर्व काही बेचिराख झाले.

अनाया ‘नामकरण’, ‘इश्क में मरजावन’, ‘क्राइम पेट्रोल’ आणि ‘अदालत’ या मालिकांमध्ये झळकली आहे. या अभिनेत्रीने ‘टेक इट इझी’ आणि ‘है अपना दिल तो अवारा’ यासारख्या चित्रपटांमध्येही काम केले आहे.

(Actress Anaya Soni admitted in to hospital due to kidney failure)

हेही वाचा :

Sara Ali Khan | मंदिरात दर्शनासाठी पोहोचली सारा अली खान, नेटकऱ्यांनी धर्माची आठवण करून देत केले ट्रोल!

Bhuj The Pride Of India : ‘मराठा सिर्फ दो ही बात जानता है, मारना या मरना!’, ‘भुज’चा जबरदस्त ट्रेलर पाहून तुम्हीही म्हणाल व्वा!

'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.