Breaking news | अभिनेत्री कल्याणी जाधव हिचा अपघाती मृत्यू

 मध्यरात्री हॉटेल बंद करून घरी परतत असताना डंपरने धडक दिल्याने कल्याणीचा मृत्यू झालाय. 

Breaking news | अभिनेत्री कल्याणी जाधव हिचा अपघाती मृत्यू
Follow us
| Updated on: Nov 13, 2022 | 12:43 PM

मुंबई : मराठी चित्रपट सिनेसृष्टीतून अत्यंत वाईट बातमी पुढे येतंय. प्रसिध्द टिव्ही अभिनेत्री कल्याणी कुरुळे जाधव हिचा अपघाती मृत्यू झालाय. ही बातमी कळताच सिनेसृष्टीत शोककळा पसरलीये. अत्यंत कमी वेळामध्ये कल्याणीने एक वेगळी ओळख निर्माण केली. तिच्या अशाप्रकारे अचानक जाण्याने सर्वांनाच मोठा आर्श्चयाचा धक्का बसलाय. सुरूवातीला अनेकांना ही फक्त अफवा असल्याचे देखील वाटले होते. 

मध्यरात्री कोल्हापूर सांगली रस्त्यावरील हालोंडी फाटा इथे डंपरने धडक दिल्याने कल्याणीचा मृत्यू झाल्याचे कळते आहे. तुझ्यात जीव रंगला, जीव माझा गुंतला यासह अन्य मालिकेत कल्याणी जाधवने जबरदस्त भूमिका केल्या आहेत. आपल्या अभिनयाच्या जोरावर कल्याणीने एक वेगळी ओळख निर्माण केली.

काही दिवसांपूर्वीच कल्याणी जाधव हिने हालोंडी फाटा येथे प्रेमाची भाकरी नावाने एक हाॅटेल सुरू केले होते. मध्यरात्री हॉटेल बंद करून घरी परतत असताना डंपरने धडक दिल्याने कल्याणीचा मृत्यू झाला. कोल्हापूर-सांगली मार्गावर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अपघाताच्या घटना वाढल्या आहेत. त्यामध्येच आता अभिनेत्री कल्याणी हिचाही मृत्यू झाला आहे. 

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.