अवघ्या 17व्या वर्षी गमावला पाय, एका अपघाताने बदललं सुधा चंद्रन यांचं आयुष्य, कामातून मिळवली ओळख!

अभिनेत्री सुधा चंद्रन (Sudha Chandran) हे हिंदी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध नाव आहे. सुधा चंद्रन त्यांच्या नकारात्मक व्यक्तिरेखांसाठी ओळखल्या जातात. त्यांनी 'कहानी किस गुलाब' या मालिकेत रामोला सिकंद, 'नागिन' या मालिकेत यामिनी या भूमिकेने प्रेक्षकांमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

अवघ्या 17व्या वर्षी गमावला पाय, एका अपघाताने बदललं सुधा चंद्रन यांचं आयुष्य, कामातून मिळवली ओळख!
Sudha Chandran
Follow us
| Updated on: Oct 24, 2021 | 7:53 AM

मुंबई : अभिनेत्री सुधा चंद्रन (Sudha Chandran) हे हिंदी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध नाव आहे. सुधा चंद्रन त्यांच्या नकारात्मक व्यक्तिरेखांसाठी ओळखल्या जातात. त्यांनी ‘कहानी किस गुलाब’ या मालिकेत रामोला सिकंद, ‘नागिन’ या मालिकेत यामिनी या भूमिकेने प्रेक्षकांमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सुधा चंद्रन यांनी टीव्हीशिवाय अनेक चित्रपटांमध्येही काम केले आहे. सुधा एक उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच एक उत्कृष्ट शास्त्रीय नृत्यांगना देखील आहेत.

अलिकडेच, विमानतळावरून सुधा यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये त्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना विमानतळावर होणाऱ्या गैरसोयीबद्दल आवाहन करताना दिसल्या. पंतप्रधान मोदींना आवाहन करताना त्या म्हणाल्या होत्या की, दरवेळी विमानतळावरील सुरक्षा तपासणी दरम्यान त्यांना प्रोस्थेटिक्स पाय काढून टाकण्यास सांगितले जात होते, यामुळे त्यांना खूप त्रास सहन करावा लागतो. सुधा चंद्रन यांचा एक पाय कृत्रिम आहे.

वयाच्या 17 व्या वर्षी सुधा यांच्यासोबत घडला अपघात

तुम्हाला माहीत नसेल पण खऱ्या आयुष्यात सुधा यांना एक पाय नाहीय. जेव्हा त्या 17 वर्षांच्या होत्या, तेव्हा त्यांचा एक अपघात झाला, ज्यामध्ये त्यांना त्यांचा उजवा पाय गमवावा लागला. यानंतर सुधा यांच्या आयुष्यातील सर्वात कठीण टप्पा सुरू झाला. कारण, सुधा एक उत्तम नृत्यांगना होत्या आणि त्यांचा पाय कापल्यामुळे ती पुन्हा कधीही नृत्य करू शकल्या नसत्या.

वयाच्या अवघ्या साडेतीन वर्षांपासून सुधा यांनी नृत्य शिकायला सुरुवात केली होती. सुधा म्हणतात की, त्या नृत्याशिवाय जगूच शकत नाही. जेव्हा त्यांचा अपघात झाला, तेव्हा त्यांना वाटले की, आता आपण आयुष्यभर नृत्य करू शकणार नाही. पण, नंतर त्याला एक कृत्रिम पाय मिळाला आणि फिजिओथेरपीच्या मदतीने त्या त्यांच्या कृत्रिम पायावर चालणे शिकू लागल्या.

मनोरंजन विश्वात कमावले नाव

या कृत्रिम पायासोबतच सुधा यांनी सिनेमा आणि नृत्याच्या दुनियेत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. सुधा 90च्या दशकापासून टीव्ही इंडस्ट्रीत सक्रिय आहे. सुधा यांनी आत्तापर्यंत  ‘बहुरानियां’, ‘चंद्रकांता’, ‘कभी इधर कभी उधर’, ‘चश्मे बद्दूर’, ‘अंतराल’, ‘कैसे कहूं’, ‘कहीं किसी रोज’, ‘क्योंकि सास भी कभी बहू थी, ‘कस्तूरी’, ‘अदालत’  सारख्या अनेक टीव्ही शोमध्ये काम केले आहे. याशिवाय त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्येही काम केले आहे.

सुधा चंद्रन यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सीआयएसएफने दिलगिरी व्यक्त केली, सीआयएसएफने ट्विट करून सुधा चंद्रन यांची माफी मागितली होती. सीआयएसएफने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, ‘आमच्यामुळे सुधा चंद्रन यांना झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. हे प्रोटोकॉल अंतर्गत केले जाते, परंतु विशेष परिस्थितीत ते माफ केले जाऊ शकते.’

हेही वाचा :

‘देवयानी’ फेम शिवानी सुर्वे लवकर प्रेक्षकांच्या भेटीला, नव्या चित्रपटातून करणार दमदार एण्ट्री!

Radhe Shyam : प्रभासच्या वाढदिवशी चाहत्यांना निर्मात्यांकडून खास भेट, शेअर केला ‘विक्रमादित्य’चा खास लूक टीझर!

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.