Sherlyn Chopra | शर्लिन चोप्रा हिची ‘राखी सावंत’वर खालच्या पातळीवर टीका…
साजिद खान याला बिग बाॅसच्या घरात पाहून शर्लिन चोप्रा हिचा तिळपापड झाल्याचे दिसत आहे.
मुंबई : बिग बॉस 16 च्या घराबाहेर सध्या मोठा वाद सुरू आहे. हा वाद शर्लिन चोप्राने सुरू केला असून आता या वादामध्ये अनेकांनी उडी घेतलीये. साजिद खान याला बिग बाॅसच्या घरात पाहून शर्लिन चोप्रा हिचा तिळपापड झाल्याचे दिसत आहे. काहीही करून शर्लिन हिला साजिद खानला बिग बाॅसच्या घराबाहेर काढायचे आहे. यासाठी पोलिस स्टेशनला चकरा मारणे असो किंवा सोशल मीडियावर साजिद खान विरोधात पोस्ट टाकणे असो…हे सर्व शर्लिन चोप्रा करत आहे.
साजिद खान विरोधात एक खराब वातावरण बाहेर तयार करण्याचा प्रयत्न शर्लिन करत आहे. शर्लिनने अगोदर बिग बाॅसच्या निर्मात्यांवर टीका केली. त्यानंतर साजिद खानच्या डोक्यावर सलमान खानचा आर्शीवाद असल्याने त्याचे कोणीच काही वाकडे करू शकत नसल्याचे तिने म्हटले होते.
View this post on Instagram
शर्लिन चोप्राला जोरदार प्रतिउत्तर काही दिवसांपूर्वी देत साजिद खान निर्दोष असल्याचे राखी सावंत म्हटले. इतकेच नाही तर राखीने साजिदची पाठराखण देखील केली. हे पाहून शर्लिनने आपला मोर्चा आता राखी सावंतकडे वळवला आहे. राखी आणि शर्लिन दोघीही खालच्या पातळीवर जाणून टीका करत आहेत.
शर्लिन चोप्राने आता तर खालच्या पातळीवर जाऊन राखी सावंत हिच्यावर टीका केली. शर्लिन म्हणाली की, राखी सावंत ही घाणेरड्या नालीतील झुरळ आहे. पुढे शर्लिन म्हणाली की, माझी लढाई हिच्यासोबत कधीच नव्हती, माझी लढाई ही लैंगिक शोषण करणाऱ्यांशी आहे. आता राखी शर्लिनच्या या टीकेवर काय उत्तर देते हे बघण्यासारखे ठरणार आहे.