Tunisha Sharma Suicide : शुटिंगस्थळीच अभिनेत्री तुनिशाची आत्महत्या, अभिनेता शीजान खानला अटक; ब्रेकअपमुळे आत्महत्या?

शीजानला आज वसई कोर्टात हजर करण्यात येणार आहे. तुनिशा आणि शीजान दोघेही रिलेशनमध्ये होते. काही दिवसांपूर्वी शीजान आणि तुनिशाचा ब्रेकअप झाला होता.

Tunisha Sharma Suicide : शुटिंगस्थळीच अभिनेत्री तुनिशाची आत्महत्या, अभिनेता शीजान खानला अटक; ब्रेकअपमुळे आत्महत्या?
शुटिंगस्थळीच अभिनेत्री तुनिशाची आत्महत्या, अभिनेता शीजान खानला अटक; ब्रेकअपमुळे आत्महत्या?Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Dec 25, 2022 | 6:46 AM

रमेश शर्मा, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, पालघर: टीव्ही अभिनेत्री तुनिशा शर्मा हिने शुटिंगस्थळी आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी तुनिशाची आई वनिता शर्मा यांनी अभिनेता शीजान खान याच्याविरोधात वालीव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. वनिता शर्मा यांच्या तक्रारीवरून शीजान खानविरोधात भादंवि कलम 306 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी शीजान खानला रात्री उशिरा अटक केली आहे. पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत.

वनिता शर्मा यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी शीजान खानला रात्री उशिरा अटक केली. मध्यरात्री त्याची वैद्यकिय चाचणी करण्यात आली. त्यानंतर त्याला वालीव पोलीस कोठडीत ठेवण्यात आलं आहे. सोनी सब चॅनेरवरील अलिबाबा या मालिकेत तुनिशा ही मुख्य भूमिकेत होती तर शीजान खान मुख्य भूमिकेत होता. या दोघांमध्ये प्रेम संबंध असून त्यानेच तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार तुनिशा हिच्या आईने दिल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

दरम्यान, तुनिशाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात आण्यात आला आहे. आज सकाळी तिच्या मृतदेहाचे पोस्टमार्टम केले जाणार आहे.

तुनिशाने सीरियलच्या सेटवर ज्या मेकअप रुममध्ये फाशी घेऊन आत्महत्या केली. तो रुम शीजानचा आहे. शुटिंग करून परत आलो तेव्हा मेकअप रुमचा दरवाजा आतून बंदच होता. दरवाजा न उघडल्याने तो तोडून आत शिरलो. त्यावेळी तुनिशाने आत्महत्या केल्याच आढळून आल्याचं शीजानने सांगितलं.

दरम्यान, शीजानला आज वसई कोर्टात हजर करण्यात येणार आहे. तुनिशा आणि शीजान दोघेही रिलेशनमध्ये होते. काही दिवसांपूर्वी शीजान आणि तुनिशाचा ब्रेकअप झाला होता. त्यामुळे तुनिशा प्रचंड तणावाखाली होती. त्यातूनच तिने आत्महत्येचं पाऊल उचलल्याचं सांगितलं जातं.

तुनिशाच्या मृतदेहाशेजारी सुसाईड नोट मिळाली नाही. या प्रकरणाचा हत्या आणि आत्महत्या या दोन्ही अँगलने तपास केला जात आहे. नायगाव येथील टीव्ही सीरियलच्या सेटवरील स्टाफ आणि इतरांची चौकशी केली जाणार आहे.

तुनिशा मुंबईत तिच्या आईसोबत राहत होती. शीजान आणि तुनिशाचे प्रेमसंबंध होते. शीजानच्या त्रासामुळेच तुनिशाने आत्महत्या केली आहे, असा आरोप वनिता शर्मा यांनी केला आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.