Nave Lakshya: ‘नवे लक्ष्य’ मालिकेत अदिती सारंगधर, श्वेता शिंदे पुन्हा साकरणार गाजलेली भूमिका
स्टार प्रवाहच्या ‘नवे लक्ष्य’ (Nave Lakshya) या मालिकेत अभिनेत्री अदिती सारंगधर (Aditi Sarangdhar) आणि श्वेता शिंदे (Shweta Shinde) यांची धमाकेदार एण्ट्री होणार आहे.
स्टार प्रवाहच्या ‘नवे लक्ष्य’ (Nave Lakshya) या मालिकेत अभिनेत्री अदिती सारंगधर (Aditi Sarangdhar) आणि श्वेता शिंदे (Shweta Shinde) यांची धमाकेदार एण्ट्री होणार आहे. नवे लक्ष्यच्या पहिल्या पर्वात म्हणजेच लक्ष्य मालिकेत रेणुका राठोड आणि सलोनी देशमुख या दोन्ही व्यक्तिरेखा खूप गाजल्या होत्या. त्यामुळे ही गाजलेली पात्र मालिकेत पुन्हा पाहायला मिळतील. यानिमित्ताने युनिट 8 आणि युनिट 9 एकत्र येऊन आठ वर्षांपूर्वींच्या केसचा गुंता सोडवणार आहेत. अभिनेत्री अदिती सारंगधर आणि श्वेता शिंदे जुनी भूमिका नव्याने साकारण्यासाठी सज्ज झाल्या असून नवे लक्ष्यच्या टीमसोबत काम करण्यासाठी प्रचंड उत्सुक आहेत.
नवे लक्ष्यमधल्या या दमदार एण्ट्रीबदद्ल सांगताना अदिती म्हणाली, “मराठीत लक्ष्य आणि नवे लक्ष्य या मालिकेने नेहमीच पोलिसांची प्रतिमा जपण्याचा प्रयत्न केला आहे. सलोनी देशमुख या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम मिळालं होतं. इतक्या वर्षांनंतर तीच भूमिका पुन्हा साकारायला मिळणं ही आनंददायी गोष्ट आहे. माझ्यातल्या एनर्जीचा कस लागतोय. पोलिसांची वर्दी परिधान केल्यानंतर एक वेगळीच ऊर्जा संचारते. त्या वर्दीचा एक आब आहे. सलोनी हे पात्र माझ्या खूप जवळचं आहे. सेटवर गेल्यानंतर पडद्यामागच्या त्याच सर्व टीमला भेटून खूप आनंद झाला. सोहम प्रोडक्शनने नेहमीच माणसं जपली आहेत. त्यामुळे स्टार प्रवाहच्या या परिवारात पुन्हा सामील होताना खूप आनंद होतोय.”
पहा मालिकेचा प्रोमो-
View this post on Instagram
तर श्वेता शिंदेसाठी देखिल रेणुका राठोड हे पात्रं खूप जवळचं आहे. “पुन्हा एकदा रेणुका राठोड साकारणं हे आव्हानात्मक आहे कारण यावेळेस मी कथानकात आई होणार आहे,” असं तिने सांगितलं. त्यामुळे आईपणाची जबाबदारी पार पाडताना ती तिचं पोलिसी कर्तव्य कसं पार पाडते हे प्रेक्षकांना पाहायला मिळेल. ‘नवे लक्ष्य’चे उत्कंठावर्धक भाग दर रविवारी रात्री 10 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर पहायला मिळेल.
हेही वाचा:
Dasvi: ‘दसवी’च्या रिव्ह्यूवर भडकली यामी गौतम; म्हणाली, “यापुढे माझ्या कामाचं..”
Mulgi Zali Ho: ‘मुलगी झाली हो’ मालिका बंद होणार का? वाहिनीने सांगितलं सत्य