AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mulgi Jhali Ho: अजय पूरकर यांनी ‘मुलगी झाली हो’ मालिकेचा घेतला निरोप

प्रसिद्ध मराठी अभिनेते अजय पूरकर (Ajay Purkar) यांनी स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील 'मुलगी झाली हो' (Mulgi Jhali Ho) या मालिकेचा निरोप घेतला. या मालिकेत ते राजन सरदेशमुख ही व्यक्तीरेखा साकारत होते.

Mulgi Jhali Ho: अजय पूरकर यांनी 'मुलगी झाली हो' मालिकेचा घेतला निरोप
Ajay PurkarImage Credit source: Facebook
| Updated on: Apr 12, 2022 | 3:47 PM
Share

प्रसिद्ध मराठी अभिनेते अजय पूरकर (Ajay Purkar) यांनी स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ (Mulgi Jhali Ho) या मालिकेचा निरोप घेतला. या मालिकेत ते राजन सरदेशमुख ही व्यक्तीरेखा साकारत होते. मालिकेचा निरोप घेतल्यानंतर अजय यांनी फेसबुकवर पोस्ट लिहिली. मालिकेतील कलाकारांसोबतचे फोटो त्यांनी यावेळी पोस्ट केले. त्याचप्रमाणे संपूर्ण टीमचे त्यांनी आभार मानले. भविष्यातील इतर प्रोजेक्ट्सना वेळ देण्यासाठी त्यांनी ही मालिका सोडल्याचं कळतंय. फेसबुकवरील पोस्टमध्ये मालिकेच्या टीममधील अनेकांचा उल्लेख करत त्यांनी आभार मानले. अजय पूरकर लवकरच ‘शेर शिवराज’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ‘पावनखिंड’ या चित्रपटात त्यांनी बाजीप्रभू देशपांडेंची भूमिका साकारली होती. त्यांनी साकारलेल्या या भूमिकेला प्रेक्षकांकडून भरपूर प्रेम मिळालं.

अजय पूरकर यांची पोस्ट-

‘नमस्कार, मुलगी झाली हो या मालिकेतून मी तुमच्या सगळ्यांचा निरोप घेत आहे. खूप मजा आली काम करताना. अनेक अनुभव आले नव्यानी. सचिन देव सर, उत्तम दिग्दर्शक आणि टीम सांभाळून काम करणारे. सुशांत पोळ, असोसिएट डायरेक्टर उत्तम असलाच पाहिजे हे तू सिद्ध केलंस. विक्रम, सत्या, विनोद, जीतू, महादेव, राकेश, किती जणांची नावे घ्यायची? योगेश, पुन्हा एकदा आपण एकत्र काम केलं आणि खूप धम्माल पण.. तसंच प्रज्ञा.. एक छान सहकलाकार आणि उत्तम व्यक्ती. रश्मी.. खूप प्रेम, छान कर काम. विशेष आभार लता श्रीधर, शादाब शेख, संजय कोलवणकर, सर्व कॅमेरा टीम, नेपाळ गँग, पॅनोरमा प्रॉडक्शन्स खूप खूप धन्यवाद. रोहिणी निनावे खूप खूप धन्यवाद. कायम सगळे लक्षात राहणार. पुन्हा लवकरच भेटू, नवीन प्रोजेक्ट घेऊन. तोपर्यंत हर हर महादेव,’ अशा शब्दांत अजय पूरकर व्यक्त झाले.

अभिनेता किरण माने यांना तडकाफडकी मालिकेतून काढल्यानंतर ‘मुलगी झाली हो’ ही मालिका चर्चेत आली. या वादावर विविध प्रतिक्रिया उमटल्या होत्या. तर मालिका सोडल्यानंतर तीन महिन्यांतच त्याचा टीआरपी घसरला आणि प्राइम टाइममधून मालिकेला काढण्यात आल्याची पोस्ट किरण माने यांनी फेसबुकवर लिहिली. ही मालिका आता दुपारच्या वेळेत प्रेक्षकांच्या भेटीला येते.

हेही वाचा:

‘तुझ्या माझ्या संसाराला..’मध्ये रेवाच्या एण्ट्रीमुळे सिड-अदितीमध्ये रंगणार चुरस

Ranbir Alia Wedding: रणबीर-आलियाच्या लग्नाची तारीख पुढे ढकलली; कारण आलं समोर

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.