AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘सुशांतचा मृत्यू ही आमच्या नात्याची खरी अग्निपरीक्षा’, अंकिताच्या नवऱ्याने त्याच्या मनातलं सांगितलं

अंकिताने (Ankita Lokhande) 'पवित्र रिश्ता' या मालिकेत सुशांतसोबत (Sushant Singh Rajput) काम केलं होतं. या मालिकेच्या शूटिंगदरम्यान अंकिता आणि सुशांत एकमेकांच्या प्रेमात पडले. 2010 ते 2016 पर्यंत हे दोघं रिलेशनशिपमध्ये होते.

'सुशांतचा मृत्यू ही आमच्या नात्याची खरी अग्निपरीक्षा', अंकिताच्या नवऱ्याने त्याच्या मनातलं सांगितलं
Sushant Singh Rajput, Ankita Lokhande-Vicky JainImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 01, 2022 | 2:22 PM
Share

कलाविश्वात चर्चेत असलेली जोडी अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि विकी जैन (Vicky Jain) यांनी नुकतीच एका टीव्ही शोमध्ये हजेरी लावली. स्टार प्लस वाहिनीवरील ‘स्मार्ट जोडी’च्या दुसऱ्या एपिसोडमध्ये अंकिता-विकी त्यांच्या नात्याबद्दल मनमोकळेपणाने व्यक्त झाले. 2020 मध्ये अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) मृत्यूनंतर आमच्या नात्यासमोर नवं आव्हान उभं राहिल्याचं विकीने यावेळी सांगितलं. सुशांतच्या मृत्यूमुळे नात्यात आलेल्या चढउतारांविषयी हे दोघं व्यक्त झाले. अंकिताने ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत सुशांतसोबत काम केलं होतं. या मालिकेच्या शूटिंगदरम्यान अंकिता आणि सुशांत एकमेकांच्या प्रेमात पडले. 2010 ते 2016 पर्यंत हे दोघं रिलेशनशिपमध्ये होते. ‘स्मार्ट जोडी’ हा नवीन रिअॅलिटी शो आहे, ज्यामध्ये विविध सेलिब्रिटी कपल्स सहभागी होतात. या सेलिब्रिटी कपलला शोमध्ये विविध टास्क दिले जातात.

14 जून 2020 रोजी सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर, अंकिताने त्याच्या कुटुंबीयांना भेट दिली आणि त्याच्याबद्दल बोलण्यासाठी ती मीडियासमोर अनेकदा हजर झाली होती. स्मार्ट जोडी या शोमध्ये याबद्दल बोलताना ती म्हणाली, “मी माझा भूतकाळ विसरले आहे. पण त्या क्षणी माझी तिकडे गरज होती. याबद्दल मी विकीला सांगू शकले नव्हते. पण काहीही न सांगताही त्याने मला समजून घेतलं.” तो काळ त्यांच्या नात्यासाठी एक कठीण परीक्षा असल्याचं विकीने सांगितलं. “अचानक त्यावेळी जे घडलं त्यापेक्षा कठीण परीक्षा एखाद्या नातेसंबंधासाठी असू शकत नाही. त्या घटनेमुळे फक्त आम्हालाच नाही तर संपूर्ण देशाला मोठा धक्का बसला होता. अशा गोष्टीसाठी कोणीही तयार असू शकत नाही,” असं तो म्हणाला.

सुशांतच्या मृत्यूनंतर अंकिता अनेकदा सुशांतच्या कुटुंबीयांसोबत दिसत होती. त्यावेळी अनेकांनी सोशल मीडियावर विकीला ट्रोल केलं आणि काहींनी अंकिताच्या हेतूवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या सर्व गोष्टींवर विकी पुढे म्हणाला, ” बऱ्याच लोकांच्या मनात त्या गोष्टींबद्दल चुकीच्या कल्पना होत्या. मी ते सर्व समजू शकलो नाही. मला या गोष्टीचा अभिमान आहे की अंकिता त्या सर्व गोष्टींना धैर्यानं सामोरं गेली. तिने सर्व जबाबदाऱ्या पूर्ण केल्या. तिच्या प्रामाणिकपणासाठी मी नेहमीच तिला पाठिंबा दिला.”

अंकिता आणि विकी 2019 पासून एकमेकांना डेट करू लागले. गेल्या वर्षी १४ डिसेंबर रोजी या दोघांनी लग्नगाठ बांधली. लग्नानंतर पहिल्यांदाच ही जोडी छोट्या पडद्यावर एकत्र सर्वांसमोर आली.

संबंधित बातम्या: सुशांतशी नातं तुटल्यानंतर विकीने अंकिताला सावरलं, अशी होती दोघांची लव्हस्टोरी…

संबंधित बातम्या: करोडोंच्या संपत्तीची मालकीण आहे अंकिता लोखंडे; जाणून घ्या, तिची संपत्ती

संबंधित बातम्या: ‘न्यायासाठीचा लढा विसरलीस का?’, सुशांतच्या चाहत्यांकडून अंकिता लोखंडे ट्रोल

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.