Munmun Dutta | ‘तारक मेहता…’च्या ‘बबिता’ला सुप्रीमकोर्टाकडून दिलासा, जातीवाचक अपशब्द वापरल्याने दाखल झाले होते FIR  

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka ooltah Chashmah) मधील ‘बबिता’ अर्थात अभिनेत्री मुनमुन दत्ता (Munmun Dutta) हिला सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. अलीकडेच मुनमुन दत्ताने जातीचे शब्द वापरल्याच्या प्रकरणाला वादाचे वळण आले होते.

Munmun Dutta | ‘तारक मेहता...’च्या ‘बबिता’ला सुप्रीमकोर्टाकडून दिलासा, जातीवाचक अपशब्द वापरल्याने दाखल झाले होते FIR  
मुनमुन दत्ता
Follow us
| Updated on: Jun 18, 2021 | 12:52 PM

मुंबई : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka ooltah Chashmah) मधील ‘बबिता’ अर्थात अभिनेत्री मुनमुन दत्ता (Munmun Dutta) हिला सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. अलीकडेच मुनमुन दत्ताने जातीचे शब्द वापरल्याच्या प्रकरणाला वादाचे वळण आले होते. त्यानंतर राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रात अभिनेत्रीविरूद्ध एफआयआर दाखल करण्यात आले होते (Babita AKA Munmun Dutta get relief from supreme court over controversial video).

या प्रकरणाची सुनावणी आज म्हणजेच शुक्रवारी (18 जून) सर्वोच्च न्यायालयात झाली. सुनावणी दरम्यान मुनमुन दत्ताला दिलासा देताना सर्वोच्च न्यायालयाने तिच्यावरील फौजदारी कारवाईला स्थगिती दिली आहे.

काय होते प्रकरण?

मुनमुनने काही दिवसांपूर्वी एक मेकअप ट्यूटोरियल व्हिडीओ सामायिक केला होता. या व्हिडीओमध्ये ती म्हणाली होती की, मी लवकरच यूट्यूबवर पदार्पण करेन आणि यासाठी मला चांगले दिसायचे आहे. या दरम्यान मुनमुनने जातीवाचक अपशब्दाचा वापर केला होता. मुनमुनचा हा व्हिडीओ खूप व्हायरल झाला आणि तिला सोशल मीडियावर ट्रोल केले जात होते. त्यानंतर बर्‍याच सोशल मीडिया वापरकर्त्यांनी या अभिनेत्रीविरोधात संताप व्यक्त करत, तिला अटक करण्याची मागणी केली होती. मुनमुनविरोधात ज्या कलमांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, ते सर्व कलम अजामीनपात्र आहेत आणि या कलमांमध्ये अटकपूर्व जामिनाची देखील तरतूद नाही.

अभिनेत्रीने मागितली माफी

आपली चूक लक्षात येताच मुनमुन दत्ताने सोशल मीडियावर सर्वांची माफी मागितली आणि हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. मुनमुनने आपल्या निवेदनात लिहिले आहे की, ‘हे मी काल पोस्ट केलेल्या व्हिडीओच्या संदर्भात आहे. जिथे मी वापरलेल्या शब्दाचा चुकीचा अर्थ लावला गेला आहे. माझा कधीच एखाद्याच्या भावना दुखावणे, धमकावणे किंवा इतर कोणता असा हेतू नव्हता. मर्यादित भाषेच्या ज्ञानामुळे, मी त्या शब्दाचा अर्थ माहित नसतान देखील वापरला.’

दुखावलेल्या प्रत्येक व्यक्तीची मागितली माफी

त्यांच्या पोस्टमध्ये मुनमुन पुढे म्हणाली, ‘नंतर मला त्याचा अर्थ कळला आणि मी लगेच तो भाग काढून टाकला. मला प्रत्येक जाती, वंशाच्या किंवा लिंगातील प्रत्येक व्यक्तीबद्दल अत्यंत आदर आहे आणि मी आपल्या समाजात किंवा राष्ट्रासाठी त्यांच्या अपार योगदानाची कबुली देतो. या शब्दाच्या वापरामुळे अनवधानाने दुखावले गेलेल्या प्रत्येक व्यक्तीची मला मनापासून मागायची आहे आणि त्याबद्दल मला खूप वाईट वाटले आहे.’

(Babita AKA Munmun Dutta get relief from supreme court over controversial video)

हेही वाचा :

India Idol 12 | असं काय झालं की, अरुणिता पवनदीपवर रागावली! जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?

निहार पांड्या-नीति मोहनच्या लेकाची पहिली झलक सोशल मीडियावर चर्चेत! पाहा ‘नाव’ काय ठेवलं?

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.