Avika Gor | लग्नाविनाच ‘बालिका वधू’ 18 वर्षांनी मोठ्या सहकलाकाराच्या बाळाची आई?

कहर म्हणजे मी लपूनछपून अभिनेता मनिष रायसिंघनच्या मुलाची आई झाले, अशा पुड्या सोडण्यापर्यंत प्रेक्षकांची मजल गेली होती, असं बालिका वधू फेम अभिनेत्री अविका गौरने एका मुलाखतीत सांगितलं.

Avika Gor | लग्नाविनाच 'बालिका वधू' 18 वर्षांनी मोठ्या सहकलाकाराच्या बाळाची आई?
Avika Gor and Manish Raisinghan
Follow us
| Updated on: Jun 21, 2021 | 3:09 PM

मुंबई : ‘बालिका वधू’ (Balika Vadhu) मालिकेतून लहान वयात लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेली अभिनेत्री अविका गौर (Avika Gor) आणि तिचा सहकलाकार मनिष रायसिंघन (Manish Raisinghan) यांच्यातील कथित अफेअरच्या चर्चा नवीन नाहीत. आपण मनिष रायसिंघन यांच्या मुलाची आई होणार होतो, अशाही अफवा उडाल्या होत्या, असा खळबळजनक गौप्यस्फोट नुकताच अविकाने एका मुलाखतीदरम्यान केला. (Balika Vadhu Fame Anandi Actress Avika Gor reacts on rumours of having secret child with Actor Manish Raisinghan)

“मनिषच्या मुलाची आई झाल्याच्या अफवा”

ससुराल सिमर का (Sasural Simar Ka) मालिकेतील सहकलाकार मनिष रायसिंघन यांच्यासोबत अफेअर असल्याच्या चर्चांचा आपल्याला प्रचंड मनस्ताप होत होता. आम्ही अखेर एकमेकांपासून अंतर राखून राहण्याचा निर्णय घेतला. इतकंच काय दोन आठवडे आम्ही एकमेकांशी साधं बोलतही नव्हतो, असं अविकाने सांगितलं. कहर म्हणजे मी लपूनछपून मनिषच्या मुलाची आई झाले, अशा पुड्या सोडण्यापर्यंत प्रेक्षकांची मजल गेली होती, असं अविकाने एका मुलाखतीत सांगितलं.

“मनिष माझ्यासाठी कायमच स्पेशल”

“एका लेखात छापून आलं होतं की आम्ही बाळ लपवून ठेवलं आहे. अशक्य आहे हे. आम्ही एकमेकांच्या खूप जवळ आहोत. अजूनही. माझ्या आयुष्यात त्यांच्यासाठी कायमच महत्त्वाची जागा असेल. वयाच्या 13 व्या वर्षापासून आतापर्यंत माझ्या प्रवासात ते माझे सर्वात जवळचे मित्र राहिले आहेत.” असं अविकाने सांगितलं.

“माझ्या वडिलांच्या वयाचा”

“मी त्यांच्याकडून खूप काही शिकले आहे. ते माझ्यापेक्षा 18 वर्षांनी मोठे आहेत. त्यांनी स्वतःमधलं लहान मूल कसं जपलंय, हे पाहून मी खूप अचंबित झाले. अजूनही काही जण मला विचारतात, तुमच्यामध्ये काही सुरु आहे का. अरे यार, ते माझ्या वडिलांपेक्षा काही वर्षांनीच लहान आहेत.” असं अविका म्हणते.

“सुरुवातीला या चर्चांचा आम्हाला खूप त्रास झाला. अनेक दिवस आम्ही एकमेकांशी बोललोही नाही. मात्र नंतर आम्हाला कळून चुकलं, की अंतर राखून वागण्यात काहीच हशील नाही. आता जेव्हा आम्ही मागे वळून पाहतो, तेव्हा आमच्या डेटिंगबद्दलच्या अफवा वाचून आम्हालाच हसू येतं” असंही अविकाने सांगितलं.

मनिषच्या पत्नीचाही गैरसमज

अभिनेता मनिष रायसिंघन यानेही काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत सांगितलं होतं, की “आपली पत्नी संगीता जेव्हा पहिल्यांदा भेटली, तेव्हा तिलाही वाटलं होतं, की मी आणि अविका कपल आहोत. मी तिला स्पष्ट करुन सांगितलं की आम्ही फक्त चांगले मित्र आहोत. आमची केमिस्ट्री पाहून कोणालाही आम्ही रिलेशनशीपमध्ये आहोत, असं वाटेल, असं ती म्हणाली होती. मात्र मैत्रीपलिकडे आमच्यात काही नाही, असं मी संगीताला सांगितलं होतं.” असं मनिषने त्यावेळी मुलाखतीत म्हटलं होतं.

‘फॅट टू फिट’

‘बालिका वधू’ मालिकेत अविका गौर हिने लहानग्या आनंदीची भूमिका साकारली होती. त्यानंतर ‘ससुराल सिमर का’ या मालिकेतही ती सहाय्यक भूमिकेत झळकली. याशिवाय, तिने काही तेलुगू आणि कन्नड चित्रपटांतही काम केलं आहे. मात्र करिअरमध्ये अविकाला वाढत्या वजनामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत होतं. अखेर, ‘फॅट टू फिट’ चॅलेंज स्वीकारत अविकाने आपलं ट्रान्सफॉर्मेशन करुन घेतलं. त्यानंतर अविकाचा सडसडीत बांधा पाहून सगळेच चकित झाले होते.

संबंधित बातम्या

Avika Gor | ‘बालिका वधू’चा ग्लॅमरस अंदाज, 13 किलो वजन घटवलं, अविका गौर ओळखूही येईना

(Balika Vadhu Fame Anandi Actress Avika Gor reacts on rumours of having secret child with Actor Manish Raisinghan)

भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.