Deepesh Bhan Death | ‘भाभीजी घर पर हैं’ फेम मलखान यांचा क्रिकेट खेळताना मृत्यू, छोट्या पडद्यावर शोककळा
शुक्रवारी क्रिकेट खेळत असताना दीपेश भान अचानक कोसळले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. यामुळे दीपेश भान यांच्या चाहत्यांना देखील मोठा धक्काच बसलायं. 41 वर्षाचे दीपेश यांचे 3 वर्षांपूर्वी लग्न झाले असून त्याला एक मुलगा आहे.
मुंबई : ‘भाभीजी घर पर हैं’ या टीव्ही मालिकेतील अभिनेते दीपेश भान (Deepesh Bhan) यांचे निधन झाले आहे. या शोमध्ये तो मलखानची भूमिका साकारत होते. क्रिकेट खेळताना त्यांचा मृत्यू (Death) झाल्याची माहिती मिळते आहे. मृत्यूचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. भाभीजी घर पर हैं टीमने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, आमचे लाडके दीपेश भान यांच्या आकस्मिक निधनाने खूप दु:ख आणि धक्का बसला आहे. भाभीजी घर पर है (Bhabhiji Ghar Par Hai) मधील सर्वात समर्पित अभिनेत्यांपैकी एक होता आणि आमच्या कुटुंबासारखा होता, त्याच्या असे अचानक जाण्याने आम्ही सर्वचजण दुखात आहोत.
इथे पाहा भाभीजी घर पर है टीमने एक निवेदन
हे सुद्धा वाचाView this post on Instagram
क्रिकेट खेळत असताना दीपेश भान अचानक पडले
शुक्रवारी क्रिकेट खेळत असताना दीपेश भान अचानक कोसळले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. यामुळे दीपेश भान यांच्या चाहत्यांना देखील मोठा धक्काच बसलायं. 41 वर्षाचे दीपेश यांचे 3 वर्षांपूर्वी लग्न झाले असून त्याला एक मुलगा आहे. त्याच्यासोबत काम करणाऱ्या कलाकारांना मोठा धक्का बसला आहे. एकत्र काम करणाऱ्या चारू मलिकने इंस्टाग्रामवर लिहिले की, RIP यार, तू गेलास हे स्वीकारणे कठीण आहे. तू आमच्या नजरेतून गेलास, पण मनातून कधीच जाणार नाहीस.
मालिकेत काम करणाऱ्या कलाकारांना मोठा धक्का बसला
कविता कौशिक यांनी लिहिले की काल वयाच्या 41 व्या वर्षी दीपेश भान यांच्या निधनाने मला धक्का बसला आहे. दीपेशेच्या मृत्यूची बातमी कळल्यानंतर मी खूप जास्त दुखी आहे. एफआयआरमधील प्रमुख अभिनेत्यांपैकी एक फिट माणूस होताय ज्याने कधीही मद्यपान केले नाही, धूम्रपान केले नाही किंवा त्याच्या आरोग्यास हानी पोहोचेल असे काहीही केले नाही. त्यांच्या पश्चात पत्नी, एक वर्षाची मुले, आई-वडील आहेत. खरोखरच दीपेशच्या जाण्याने धक्का बसलायं.