Bigg Boss 16 | बिग बाॅसच्या घरात अब्दु रोजिकसोबत घडलेल्या या घटनेनंतर संतापाची लाट
निम्रत अब्दूला त्रास होईल म्हणून बॉयफ्रेंड असल्याचे सांगत नाही. परंतू शिव ठाकरे याने अब्दूला अगोदरच सांगितले होते.
मुंबई : बिग बाॅसच्या घरामध्ये एक मोठी घटना घडलीये. निम्रत काैरच्या वाढदिवसाच्या दिवशी निम्रतला वाढदिवसाचे गिफ्ट देण्यासाठी अब्दू हा शर्ट काढतो आणि शरीरावर हॅप्पी बर्थेडे निमि असे लिहिलो. तो पाठिवर I Love You Nimrit लिहिण्यास सांगतो, परंतू तसे न लिहिता अब्दूच्या पाठिवर I Love Tatti असे लिहिले जाते. अब्दूला हे वाचता आले नाही. यानंतर घरातील सर्वच सदस्य हे अब्दूला चिडवताना दिसले. आता यावरून मोठा वाद सुरू झाला आहे. काही दिवसांपूर्वीच साजिद खानने निम्रतला सांगितले होते की, तू अब्दूला खरे सांगून दे की तुझा बाहेर बॉयफ्रेंड आहे.
निम्रत अब्दूला त्रास होईल म्हणून बॉयफ्रेंड असल्याचे सांगत नाही. परंतू शिव ठाकरे याने अब्दूला अगोदरच सांगितले होते. कारण अब्दू हा निम्रतला प्रपोज करण्याच्या तयारीमध्ये होता. आता साजिद खान निम्रतला सांगतो की, जे काही आहे ते तू स्पष्ट अब्दूला बोलून घे…
बिग बाॅस 16 च्या व्हायरल होणाऱ्या प्रोमोमध्ये स्पष्ट दिसत आहे की, सलमान खान हा साजिद खानला म्हणतो की, अगोदर स्वत: च अब्दूला असे करण्याच्या आयडिया द्यायच्या आणि नंतर हे चुकीचे जात असल्याचे बोलायचे.
अब्दूला त्याच्या पाठीवर लिहिलेल्या मेसेजचा अर्थ माहिती नसावा. परंतू आता अब्दूच्या मॅनेजमेंट टीमने त्या मेसेजवर आक्षेप घेतला आहे. यामुळे आता हा वाद वाढण्याची शक्यता आहे.
नुकताच शोमध्ये अब्दूला ज्याप्रकारे वागणूक दिली गेली आणि त्यांच्यावर करण्यात आलेल्या गोष्टींवर अब्दूच्या टीमने तीव्र आक्षेप घेतला आहे. आता विकेंडच्या वारमध्ये सलमान खान हा या सर्व गोष्टींवर बोलणार आहे.
बिग बाॅसच्या घरामध्ये देखील मोठा हंगामा होताना दिसत आहे. इतकेच नाहीतर घरामध्ये दररोजच अर्चना गाैतम आणि प्रियंका या जोरदार भांडणे करताना देखील दिसत आहेत.