Bigg Boss 16 | ‘अर्चना गाैतम’चे बिग बाॅसच्या घरातील वागणे पाहून नेटकऱ्यांचा संताप
घरात कॅप्टन कोणीही असो अर्चनाला काम करायचे नसते. अर्चनाचे खास प्रेम हे बिग बाॅसच्या किचनवर आहे.
मुंबई : बिग बॉसला आता एक नवीन ड्रामा क्वीन मिळाली आहे. अर्चना गाैतम घरातमध्ये तूफान राडा करते. घरातील एकही असा सदस्य नाही ज्याच्यासोबत अर्चनाने पंगा घेतला नाही. अर्चनाला काही मुद्दा भेटत नाही अशावेळी ती घरातील सदस्यांसोबत कारण नसताना देखील भांडते. घरात कॅप्टन कोणीही असो अर्चनाला काम करायचे नसते. अर्चनाचे खास प्रेम हे बिग बाॅसच्या किचनवर आहे. अर्चना कायमच किचमच्या विषयावरून सर्वांसोबत भांडण करते.
बिग बाॅसच्या घराचा कॅप्टन साजिद खान आहे. साजिद खानने घरातील सर्व सदस्यांना काम वाटून दिले आहे. मात्र, किचनच्या कामाशिवाय अर्चनाला कोणतेच इतर काम करायचे नसते.
साजिद खान अर्चनाला किचनच्या कामावरून काढतो. साजिद खानने सांगितलेले दुसरे काम अर्चना करत नाही. मग साजिद खानचा पारा चांगलाच चढतो.
Makers themselves made blunder mistake by bringing criminal ( archana ) back even after violation of rules for Physical assault!
Then why other contestants will follow the Rules?
WE STAND BY STAN WE STAND BY SHIV THAKARE#ShivThakare #ShivKiSena#BiggBoss16 #BiggBoss #BB16 pic.twitter.com/2PoYc2BQp0
— ???? ???? ? ???????? ?? ? (@iamteamshiv) November 17, 2022
यावादानंतर अर्चना घरातील कोणतेच काम करत नाही आणि फक्त झोपून राहते. त्यानंतर बिग बाॅस घरातील सर्व सदस्यांना एक खास टाॅस्क देतात.
बिग बाॅसने दिलेल्या टाॅस्कमध्ये घरातील सदस्यांना लाईट सुरू होण्याच्या अगोदर जाऊन राशन आणायचे आहे. मात्र, यामध्ये साजिद खानच्या हातामध्ये आहे की, कोणाला किती वेळ द्यायचा.
साजिद खानवर आरोप करत अर्चना म्हणते की, आमच्या रूमच्या सदस्यांना साजिद खानने कमी वेळ दिला. शिव ठाकरेला जास्त वेळ दिला आहे. यावरून ती साजिद खानकडे जाऊन वाद घालते.
This cracked me up so baddd ??? Nation wants to know, itne saare papita kisne uthaye the? ???#BiggBoss16 #BB16 #ArchanaGautam pic.twitter.com/3yj3EBrQRp
— shubbu ✨ (@shubbutweets) November 16, 2022
अर्चना, प्रियंका, निम्रत आणि शिव ठाकरे यांच्यामध्ये यावेळी जोरदार वाद होताना दिसतो. सध्या अर्चना घरामध्ये काहीच काम करत नसून फक्त आणि फक्त झोपूनच राहत आहे.
शिव ठाकरेचा गळा पकडल्यानंतरही बिग बाॅसने अर्चनाला घरात आणले आहे. मात्र, घरातील प्रत्येक सदस्यासोबत अर्चना भांडणे करताना दिसत आहे. आता विकेंडच्या वारमध्ये सलमान खान अर्चनाला काय बोलतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे.
शिव ठाकरेचा गळा पकडल्यापासून अर्चना गाैतमच्या विरोधात संपाताची लाट आहे. त्यामध्ये सध्या बिग बाॅसच्या घरात अर्चना ज्यापध्दतीने वागत आहे, हे पाहून नेटकरी सलमान खानला टार्गेट करत असून हे सर्व पाहूनही सलमान अर्चनाला घरात ठेवणार का हा प्रश्न विचारत आहेत.