AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss 16 | बिग बॉसने पहिल्याच दिवशी केला ‘हा’ मोठा बदल, वाचा काय घडले?

पहिल्याच दिवशी बिग बॉसच्या घरात हंगामा झालाय. बिग बॉसचे 16 वे सीजन खतरनाक होण्याची दाट शक्यता असून सर्व स्पर्धक बिग बॉसच्या घरात दाखल झालेत.

Bigg Boss 16 | बिग बॉसने पहिल्याच दिवशी केला 'हा' मोठा बदल, वाचा काय घडले?
| Updated on: Oct 02, 2022 | 10:39 AM
Share

मुंबई : बिग बॉसच्या 16 (Bigg Boss 16) व्या सीजनला खास बनवण्यासाठी निर्माते अजिबात कसर सोडताना दिसत नाहीयेत. बिग बॉस 16 कशाप्रकारे अधिक खास बनवता येईल, यासाठी निर्माते नवनवीन आयडीया शोधत आहेत. बिग बॉस 15 टीआरपीमध्ये (TRP) काही खास कमाल शेवटपर्यंत करून न शकल्याने बिग बॉस 16 साठी निर्मात्यांनी पहिल्या दिवसापासूनच कंबर कसलीये. पंधरा वर्षांपासून चालत आलेली प्रथा आज बिग बॉसच्या घरात बंद करण्यात आलीये. यामुळे बिग बॉसच्या (Bigg Boss) घरात सहभागी असलेल्या स्पर्धकांना मोठा धक्काच बसलाय.

इथे पाहा बिग बाॅसच्या घरातील व्हिडीओ

बिग बॉसच्या 16 व्या सीजनला सुरूवात झालीये. निम्रत कौरच्या गळ्यात बिग बॉस 16 च्या कॅप्टनची माळ पडलीये. आता निम्रत कौरच्या तालावर बिग बॉसच्या घरातील सदस्यांना नाचावे लागणार हे नक्की…पहिल्याच दिवशी बिग बॉसच्या घरात हंगामा झालाय. बिग बॉसचे 16 वे सीजन खतरनाक होण्याची दाट शक्यता असून सर्व स्पर्धक बिग बॉसच्या घरात दाखल झालेत.

बिग बॉसने पहिल्याच दिवशी अत्यंत मोठा निर्णय घेत पंधरा वर्षांची परंपरा बंद पाडलीये. बिग बॉसच्या घरातील सकाळ ही गाणे वाजून केली जाते. स्पर्धकांना गाणे वाजून उठवले जाते आणि या गाण्यावर स्पर्धकांना डान्स करावा लागतो. त्यानंतर लाईट बंद होऊपर्यंत बिग बॉसच्या घरातील सदस्यांना झोपता येत नाही. मात्र, यानंतर आता बिग बॉस 16 मध्ये गाणे वाजणार नसल्याचे बिग बॉसने जाहिर केलंय.

बिग बॉस 16 च्या घरातील सदस्यांची सुरूवात गाण्याने झाली. विशेष म्हणजे बिग बॉस 16 च्या घरातील सदस्यांनी गाण्यावर डान्स करत मस्त धमाल केली. मात्र, त्यानंतर लगेचच बिग बॉसने जाहिर केले की, हे या सीजनमधील शेवटचे गाणे असून यानंतर बिग बॉसच्या घरात सकाळी गाणे लावले जाणार नाही. हे ऐकून घरातील स्पर्धकांना मोठा धक्काच बसलाय.

तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण
तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण.
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद.
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान.
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर.
तयारीत राहा...राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, निवडणुकांच्या तयारीला वेग
तयारीत राहा...राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, निवडणुकांच्या तयारीला वेग.
अ‍ॅनाकोंडा ते गांडुळाची औलाद...ठाकरेंची पुन्हा शाहांसह शिंदेंवर टीका
अ‍ॅनाकोंडा ते गांडुळाची औलाद...ठाकरेंची पुन्हा शाहांसह शिंदेंवर टीका.
पालिका निवडणुकीपूर्वी तेजस्वी घोसाळकरंचा ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र!
पालिका निवडणुकीपूर्वी तेजस्वी घोसाळकरंचा ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र!.
ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या कारवर बीडमध्ये हल्ला, विधानसभेत पडसाद
ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या कारवर बीडमध्ये हल्ला, विधानसभेत पडसाद.
शालेय पोषण आहारात 1800 कोटीचा घोटाळा? ठाकरेगटाच्या आमदाराचा गंभीर आरोप
शालेय पोषण आहारात 1800 कोटीचा घोटाळा? ठाकरेगटाच्या आमदाराचा गंभीर आरोप.
नागपूर अधिवेशनात अजित दादांच्या NCP ची संघाच्या बौद्धिकाकडे यंदाही पाठ
नागपूर अधिवेशनात अजित दादांच्या NCP ची संघाच्या बौद्धिकाकडे यंदाही पाठ.