AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss 16 | टीव्हीवर साजिद खानला पाहून ‘ही’ गायिका भडकली, म्हणाली की…

साजिद खानच्या बिग बॉसमधील सहभागानंतर अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत. इतकेच नाही तर अनेकजण आता सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपला राग व्यक्त करतायत.

Bigg Boss 16 | टीव्हीवर साजिद खानला पाहून 'ही' गायिका भडकली, म्हणाली की...
| Updated on: Oct 04, 2022 | 7:31 AM
Share

मुंबई : रिअॅलिटी शो बिग बॉस 16 (Bigg Boss 16) ची धडाक्यात सुरूवात झालीये. सुरूवातीपासूनच बिग बॉस 16 ची चर्चा होती. शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा देखील बिग बॉस 16 मध्ये सहभागी होणार असे सांगितले जात होते. मात्र, बाॅलिवूडमधील (Bollywood) वादग्रस्त असलेले नाव साजिद खान बिग बॉस 16 मध्ये सहभागी झालंय. साजिद खानच्या बिग बॉसमधील सहभागानंतर अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत. इतकेच नाही तर अनेकजण आता सोशल मीडियावर (Social media) पोस्ट शेअर करत आपला राग व्यक्त करतायत.

साजिद खान गेल्या 5 वर्षांपासून लाइमलाइटपासून दूर आहे. साजिद खानच्या बिग बॉस 16 मधील सहभागानंतर अनेकांनी थेट चॅनलवर निशाना साधलाय. सोना महापात्राने तर सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चॅनलचा चांगलाच समाचार घेतलाय. सोना महापात्राने पोस्ट शेअर करत म्हटले की, हा साजिद खान आहे…जो एका रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झालाय.

पुढे सोना महापात्राने लिहिले की, कैलाश खेर देखील आता टीव्ही सेलिब्रिटी बनलाय. इतकेच नाही तर अनु मलिक देखील रिअॅलिटी शोमध्ये जज म्हणून काम करतोय…विशेष म्हणजे या तीन जणांवर देखील अनेक महिलांनी MeToo चे आरोप केले आहेत. खरोखरच चॅनलच्या या सर्व प्रकारांमुळे धक्काच बसतोय. साजिद खानवर अनेक आरोप आहेत, त्यापैकी मुख्य म्हणजे अनेकदा साजिदवर MeToo चे आरोप झाले आहेत.

बिग बॉस 16 मध्ये सहभागी झालेले साजिद खान नेमके काय खुलासे करतात. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण सुरूवातीपासूनच साजिद खान आणि वाद हे समीकरण राहिलेलेच आहे. सोना महापात्राच्या या पोस्टनंतर आता चर्चांना उधाण आलंय. साजिद खान बिग बॉसमध्ये सहभागी होणार हे कोणालाच माहिती नव्हते. बिग बॉसच्या घरात साजिद खानला पाहून अनेकांना मोठा धक्काच बसलाय.

नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.