Bigg Boss 16 | विकास मानकतला याच्या समर्थनार्थ पत्नी गुंजन मैदानामध्ये
कारण घरात दाखल झाल्यानंतर लगेचच विकास हा अर्चनाची काॅपी करताना दिसला होता.
मुंबई : बिग बाॅसच्या घरात गेल्या दोन दिवसांपासून मोठा हंगामा होताना दिसत आहे. जरी बिग बाॅसच्या घरामधील वातावरण तापलेले असले तरीही प्रेक्षकांचे जबरदस्त मनोरंजन होताना दिसत आहे. अर्चना गाैतम आणि विकास मानकतला यांच्यामध्ये जोरदार भांडणे सुरू आहेत. गॅसवर चहा करताना या भांडणाला सुरूवात झालीये. मुळात म्हणजे बिग बाॅसच्या घरात सहभागी झाल्यापासून विकास मानकतलाच्या निशाण्यावर अर्चना गाैतम आहे. कारण घरात दाखल झाल्यानंतर लगेचच विकास हा अर्चनाची काॅपी करताना दिसला होता.
बिग बाॅसच्या घरात विकास मानकतला याने वाइल्डकार्ड प्रवेश घेतला आहे. यामुळे विकास याने बिग बाॅस 16 बघितले आहे. कोणाला टार्गेट करायचे आणि कोण कसा गेम खेळत आहे हे सर्व विकास याला अगोदरच माहिती आहे.
Vikkas aur Archana ke beech ho rahi argument ne le liya hai ek gambhir mod. ?
Dekhiye #BiggBoss16 Mon-Fri raat 10 baje aur Sat-Sun raat 9 baje, sirf #Colors par. Anytime on @justvoot.#BB16 #BiggBoss@BeingSalmanKhan pic.twitter.com/QW9uZIkFRn
— ColorsTV (@ColorsTV) December 28, 2022
अर्चना गाैतम ही बिग बाॅसच्या घरातील वादग्रस्त खेळाडू आहे. कारण एका छोट्या भांडणामध्ये अर्चना गाैतम हिने थेट शिव ठाकरे याचा गळा पकडला होता. विषय छोटा जरी असला तरीही अर्चना तो मोठा करते.
बिग बाॅसच्या घराबाहेर देखील एक वेगळेच बिग बाॅस सुरू आहे. घराच्यामध्ये जे काही घडते, यावर बिग बाॅसच्या घरातील सदस्यांचे फॅमिलीवाले काहीतरी भाष्य कायमच करतात.
आता विकास मानकतला याच्या पत्नीने अर्चनाविषयी मोठे विधान केले आहे. विकास मानकतला याची पत्नी गुंजन ही नवऱ्याचे समर्थन करण्यासाठी मैदानामध्ये उतरली आहे.
Aakhir kyun iss kadar beqaabu huye Shalin??
Dekhiye #BiggBoss16 Mon-Fri raat 10 baje aur Sat-Sun raat 9 baje, sirf #Colors par. Anytime on @justvoot#BB16 #BiggBoss@beingsalmankhan@tresemmeindia @chingssecret @myglamm pic.twitter.com/JbgDuMdzQc
— ColorsTV (@ColorsTV) December 28, 2022
गुंजन म्हणाली की, बिग बाॅसच्या घरातील किचन हे सर्वांसाठी आहे. विकास याने खाली असलेल्या गॅसवर चहा बनवण्याचा प्रयत्न केला होता. अर्चना ओरडत असताना विकास शांत होता. हे सर्व असताना तिने चहाचे पाणी फेकून दिले.
अर्चनामुळे विकासला मार देखील लागू शकला असता, असे गुंजन म्हणाली आहे. काही दिवसांपूर्वी टीना दत्ताची आई आणि सुंबुलचे वडील देखील बिग बाॅसच्या घरात घडलेल्या घटनांनंतर व्हिडीओ तयार करून सोशल मीडियावर शेअर करत होते.