Bigg Boss Marathi Season 3 Winner LIVE | … आणि ‘बिग बॉस मराठी 3’चा विजेता ठरला विशाल निकम! जय दुधाणेच्या गळ्यात उपविजेतेपदाची माळ!

| Updated on: Dec 27, 2021 | 6:15 AM

Bigg Boss 3 Marathi Grand Finale Live Updates: ‘बिग बॉस मराठी 3’चा (Bigg Boss Marathi 3) हा मनोरंजक प्रवास संपायला आता अवघी काही मिनिटं उरली आहेत. 100 दिवसांच्या या खेळात मनोरंजन विश्वातील 15 कलाकारांनी सहभाग घेतला होता. ‘बिग बॉस मराठी सीझन 3’ आता त्याच्या ग्रँड फिनालेसाठी सज्ज आहे.

Bigg Boss Marathi Season 3 Winner LIVE |  ... आणि 'बिग बॉस मराठी 3'चा विजेता ठरला विशाल निकम! जय दुधाणेच्या गळ्यात उपविजेतेपदाची माळ!
Vishal Nikam

मुंबई : ‘बिग बॉस मराठी 3’चा (Bigg Boss Marathi 3) हा मनोरंजक प्रवास संपायला आता अवघी काही मिनिटं उरली आहेत. 100 दिवसांच्या या खेळात मनोरंजन विश्वातील 15 कलाकारांनी सहभाग घेतला होता. ‘बिग बॉस मराठी सीझन 3’ आता त्याच्या ग्रँड फिनालेसाठी सज्ज आहे. आता या स्पर्धेत केवळ 5 स्पर्धक उरले आहेत.

‘बिग बॉस मराठी 3’चा (Bigg Boss Marathi 3) आज ग्रँड फिनाले आहे. टॉप 5 स्पर्धकांमध्ये (Bigg Boss Marathi 3 Grand Finale) विशाल निकम (Vishal Nikam), मीनल शाह (Meenal Shah), विकास पाटील (Vikas Patil), उत्कर्ष शिंदे (Utkarsh Shinde) आणि जय दुधाणे (Jay Dudhane) यांनी स्थान मिळवलं आहे. आता विजेतेपदाचा मान कोणाला मिळणार, कोणते दोन स्पर्धक बिग बॉसच्या घराचे दिवे बंद करुन अलविदा करणार, याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 26 Dec 2021 11:12 PM (IST)

    … आणि ‘बिग बॉस मराठी 3’चा विजेता ठरला विशाल निकम!

    ‘बिग बॉस मराठी 3’ या पर्वाचा विजेता विशाल निकम ठरला आहे. ट्रॉफी आणि 20 लाखांचं बक्षीस मिळवत त्याने चाहत्यांची मने जिंकली आहेत. ‘सात जलमाच्या गाठी’ या मालिकेतून मनोरंजन विश्वात पाऊल ठेवणाऱ्या विशालने ‘दक्खनचा राजा जोतिबा’, ‘जय भवानी जय शिवाजी’ या सारख्या मालिकांमध्ये काम केले आहे.

  • 26 Dec 2021 11:09 PM (IST)

    ‘बिग बॉस’चा शेवटचा आदेश!

    ‘बिग बॉस मराठी 3’चा शेवट आता अवघ्या काही मिनिटांवर आला आहे. यावेळी बिग बॉसने विशाल निकम आणि जय दुधाणे यांना शेवटचा आदेश दिला. या दोन्ही स्पर्धकांनी घरातील दिवे विझवून बाहेर येण्याचा आदेश दिला.

  • 26 Dec 2021 10:49 PM (IST)

    विकास पाटीलसाठी ‘बिग बॉस मराठी 3’चं दार बंद!

    ‘टॉप 3’ मधून आता विकास पाटील देखील घराबाहेर झाला आहे. दाराच्या टास्कमध्ये विकासचे परत जाण्याचे दार मात्र उघडलेच नाही. अर्थात यानंतर त्याला मुख्य दरवाज्यातून थेट बाहेर पडावे लागले. आता ट्रॉफीसाठी विशाल आणि जयमध्ये चुरस रंगली आहे.

  • 26 Dec 2021 10:24 PM (IST)

    मीराच्या ‘अप्सरा’ अदांनी ‘बिग बॉस मराठी 3’चा मंच झळाळला!

    या स्पर्धेत शेवटच्या आठवड्यात घराबाहेर पडलेल्या मीरा जगन्नाथने ‘अप्सरा आली’ या गाण्यावर नृत्य सादर करत, या सोहळ्याला एक वेगळीच झळाळी दिली.

  • 26 Dec 2021 09:53 PM (IST)

    सगळे स्पर्धक दिसले पण शिवलीला कुठेय?

    ‘बिग बॉस मराठी 3’च्या महाअंतिम सोहळ्यात या पर्वातील सगळ्या स्पर्धकांनी हजेरी लावली. मात्र, यामध्ये शिवलीला कुठेही दिसली नाही. या शो मधून अचानक माघार आणि नंतर टीका यामुळे शिवलीला उपस्थित राहिली नसल्याची चर्चा रंगली आहे.

  • 26 Dec 2021 09:30 PM (IST)

    महेश मांजरेकरांच्या नव्या चित्रपटाची घोषणा, जय दिसणार मुख्य भूमिकेत!

    ‘बिग बॉस मराठी 3’च्या मंचावर नुकतीच महेश मांजरेकर यांनी त्यांच्या आगामी नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटात ते चक्क जय दुधाणे याला मुख्य भूमिका देणार असल्याचे घोषित केले आहे. ‘शनिवार वाडा’ असे या चित्रपटाचे नाव असणार आहे.

  • 26 Dec 2021 09:14 PM (IST)

    उत्कर्ष शिंदे अखेर घराबाहेर!

    महाअंतिम सोहळ्यात आता आणखी एक स्पर्धक बाहेर गेला आहे. ‘माईंड गेमर’ अशी ओळख मिळवलेला उत्कर्ष शिंदे घराबाहेर गेला आहे.

  • 26 Dec 2021 09:08 PM (IST)

    आपल्या दिलखेच अदांनी स्नेहा करतेय सर्वांना घायाळ!

  • 26 Dec 2021 08:53 PM (IST)

    घरातील बॉईजचा डान्स बघा की जरा!

  • 26 Dec 2021 08:15 PM (IST)

    महाअंतिम सोहळ्यातलं पहिलं एलिमिनेशन! मीनल शहा घराबाहेर!

    ‘बिग बॉस मराठी 3’च्या महाअंतिम सोहळ्यात आता केवळ पाच स्पर्धक शिल्लक राहिले होते. त्यातील एक बाहेर जाण्याची प्रक्रिया सुरु झाली. यासाठी घरात ‘बिग बॉस मराठी 2’चा विजेता शिव ठाकरे याने एन्ट्री केली.  यावेळी त्याच्या हातात 5 लाखांची ब्रीफकेस होती. यावेळी सर्व स्पर्धकांना ते पैसे घेऊन बाहेर पडण्याची संधी देण्यात आली होती. मात्र, सर्वानीच ती नाकारली. मात्र, यावेळी एक स्पर्धक घर बाहेर जाणं ठरलेलं होतं. कमी मतं मिळाल्याने यावेळी मीनल शहा घराबाहेर गेली आहे.

  • 26 Dec 2021 08:05 PM (IST)

    अक्षय वाघमारे, सोनाली पाटील आणि निथा शेट्टीच्या डान्सने सोहळ्याला रंगत!

  • 26 Dec 2021 07:47 PM (IST)

    ‘आई मायेचं कवच’च्या निमित्ताने भार्गवी चिरमुलेची खास उपस्थिती!

    कलर्स मराठीवर लवकरच ‘आई मायेचं कवच’ या नावाची एक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याच निमित्ताने या मालिकेच्या मुख्यकलाकारांनी उपस्थिती दर्शवली. यावेळी त्यांनी घरातील स्पर्धकांशी संवाद देखील साधला.

  • 26 Dec 2021 07:40 PM (IST)

    ‘कुसू कुसू’वर थरकली मीनल शहा!

  • 26 Dec 2021 07:38 PM (IST)

    स्पर्धकांचे धमाकेदार परफॉरमन्स!

    या सोहळ्याची सुरुवात स्पर्धकांच्या धमाकेदार परफॉरमन्सने झाली आहे. विशाल-जय, उत्कर्ष-विकास आणि मीनल यांनी धमाल गाण्यावर नृत्य सादर केले आहे.

  • 26 Dec 2021 07:34 PM (IST)

    टॉप 5 स्पर्धकांबद्दल काय म्हणाल्या सुरेखा कुडची?

    ‘बिग बॉस मराठी 3’च्या स्पर्धकांपैकी एक असणाऱ्या सुरेखा कुडची यांनी मीनल शहाला आपला पाठींबा दिला आहे. त्याच बरोबर मी देखील हीच नावं घेतली होती असं त्या म्हणाल्या.

  • 26 Dec 2021 07:11 PM (IST)

    स्पर्धकांचे धमाकेदार परफॉरमन्स!

    या सोहळ्याची सुरुवात स्पर्धकांच्या धमाकेदार परफॉरमन्सने झाली आहे. विशाल-जय, उत्कर्ष-विकास आणि मीनल यांनी धमाल गाण्यावर नृत्य सादर केले आहे.

  • 26 Dec 2021 07:07 PM (IST)

    महाअंतिम सोहळ्याच्या सुत्रसंचालनाची धुरा महेश मांजरेकरांच्याच हाती!

    ‘बिग बॉस मराठी 3’च्या महाअंतिम सोहळ्याला सुरुवात झाली आहे. महाअंतिम सोहळ्याच्या सुत्रसंचालनाची धुरा महेश मांजरेकरांच्याच हातीच आहे. या सोहळ्याला या पर्वातील एलिमिनेटेड स्पर्धक देखील हजर आहेत!

  • 26 Dec 2021 07:04 PM (IST)

    सुरु झालाय ‘महासंग्राम’, ‘टॉप 5’मध्ये रंगणार चुरस!

    टॉप 5 स्पर्धकांमध्ये (Bigg Boss Marathi 3 Grand Finale) विशाल निकम, मीनल शाह, विकास पाटील, उत्कर्ष शिंदे आणि जय दुधाणे यांनी स्थान मिळवलं आहे. आता विजेतेपदाचा मान कोणाला मिळणार, कोणते दोन स्पर्धक बिग बॉसच्या घराचे दिवे बंद करुन अलविदा करणार, याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. सोशल मीडियावर असलेल्या विविध ट्रेण्ड्सच्या आधारे आम्ही ‘बिग बॉस मराठी 3’ चा संभाव्य विजेता कोण असेल, कुठल्या क्रमाने स्पर्धक बाद होतील, याचा एक ढोबळ अंदाज वर्तवला आहे.

  • 26 Dec 2021 06:17 PM (IST)

    कोण मारणार बाजी? सोशल मीडियावरील पोल्सचा अंदाज काय सांगतो?

    विशाल निकम – 28 टक्के मतांचा अंदाज जय दुधाणे – 25 टक्के मतांचा अंदाज विकास पाटील – 23 टक्के मतांचा अंदाज मीनल शाह – 17 टक्के मतांचा अंदाज उत्कर्ष शिंदे – 7 टक्के मतांचा अंदाज

  • 26 Dec 2021 06:15 PM (IST)

    कधी आणि कुठे पाहाल सोहळा?

    ‘बिग बॉस मराठी 3’चा ग्रँड फिनाले रविवारी अर्थात 26 डिसेंबर रोजी संध्याकाळी 7 वाजता सुरू होणार आहे आणि या सोहळ्याच्या शेवटी ‘बिग बॉस मराठी 3’ सीझनच्या विजेत्याला ट्रॉफी आणि बक्षीस देण्यात येणार आहे. हा सोहळा ‘कलर्स मराठी’ वाहिनी आणि ‘वूट’वर पाहता येणार आहे.

Published On - Dec 26,2021 6:10 PM

Follow us
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.