Abhijit Bichukle Accident | अभिजीत बिचुकले याचा पुण्यात अपघात, डोक्याला दुखापत, डाॅक्टरांनी दिला हा सल्ला
अभिजीत बिचुकले हे चर्चेत राहणारे नाव आहे. अभिजीत बिचुकले (Abhijit Bichukle) याचा पुण्यामध्ये अपघात झालाय.
मुंबई : अभिजीत बिचुकले याने मराठी आणि हिंदी अशा दोन्ही बिग बाॅसमध्ये सहभागी होत चाहत्यांवर एक खास छाप सोडली आहे. अभिजीत बिचुकले हे चर्चेत राहणारे नाव आहे. अभिजीत बिचुकले (Abhijit Bichukle) याचा पुण्यामध्ये अपघात झालाय. या अपघातामध्ये त्यांच्या डोक्याला दुखापत झाल्याची माहिती मिळत आहे. अभिजीत बचुकलेचा अपघात (Accident) नेमका कसा झाला याची पूर्ण माहिती अजून मिळू शकली नाहीये. अभिजीत बिचुकलेवर पुण्यातील खासगी रूग्णालयामध्ये उपचार झाले असून डाॅक्टरांनी बिचुकले याला आराम करण्याच्या सुचना दिल्या आहेत.
अभिजीत बिचुकले त्याच्या विधानामुळे चर्चेत येतो. बिग बाॅस 15 मध्ये बिचुकले सहभागी झाला होता. यावेळी शिल्पा शेट्टीची बहीण शमिता शेट्टी हिच्यासोबत अभिजीत बिचुकले याने थेट पंगा घेतला होता.
अभिजीत बिचुकले याचा अपघात झाल्यानंतर खाजगी रुग्णालया नेण्यात आले. डाॅक्टरांनी बिचुकलेवर उपचार करत विश्रांती घेण्याची सूचना देखील दिलीये. ज्यावेळी अपघात झाला त्यावेळी अभिजीत बिचकुले एकटाच नव्हता तर सोबत चार मित्र देखील होते.
काही दिवसांपूर्वी अभिजीत बिचुकले याने मोठा दावा करत म्हटले होते की, शाहरुख खान याने माझी केसांची स्टाईल पठाण चित्रपटामध्ये फॉलो केली आहे. बिचुकलेच्या या दाव्यानंतर त्याला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल व्हावे लागले होते.
बिग बाॅस 15 मध्ये सहभागी झाल्यानंतर अनेकदा सलमान खान याने अभिजीत बिचुकलेचा क्लास लावला होता. मात्र, यावेळी आपल्या सडेतोड शैलीमध्ये सलमान खान याला देखील थेट उत्तर देताना बिचुकले दिसला होता.