Bigg Boss Marathi | कुणी बनलंय युट्युबर तर, कुणी करतंय प्रेक्षकांचं मनोरंजन! पाहा ‘बिग बॉस मराठी’चे स्पर्धक सध्या काय करतात…
सिनेमा असो किंवा दूरदर्शन, आजकाल प्रादेशिक भाषेची मागणी खूप वाढते आहे. बिग बॉस मराठी या रिअॅलिटी शोची लोकप्रियता हेच सिद्ध करते की, लोकांना आपल्या भाषेत कार्यक्रम पाहायला किती आवडतात... हेच कारण आहे की, बिग बॉस मराठी आतापर्यंत सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या मराठी रिअॅलिटी शोपैकी एक आहे.
मुंबई : सिनेमा असो किंवा दूरदर्शन, आजकाल प्रादेशिक भाषेची मागणी खूप वाढते आहे. बिग बॉस मराठी या रिअॅलिटी शोची लोकप्रियता हेच सिद्ध करते की, लोकांना आपल्या भाषेत कार्यक्रम पाहायला किती आवडतात… हेच कारण आहे की, बिग बॉस मराठी आतापर्यंत सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या मराठी रिअॅलिटी शोपैकी एक आहे. त्याच्या शेवटच्या सीझनमधील यशानंतर आता प्रेक्षकांना तिसऱ्या सीझनची वाट बघत आहेत. या शोमध्ये दिसणाऱ्या स्पर्धकांनी या माध्यमातून प्रचंड प्रसिद्धी मिळवली आहे. चला तर, जाणून घेऊया ‘बिग बॉस मराठी’च्या आधीच्या सीझनमधील टॉप स्पर्धक आता काय करत आहेत…
मेघा धाडे
‘बिग बॉस मराठी’मध्ये सहभागी झालेली मेघा धाडे ‘बिग बॉस मराठी’च्या सीझन 1ची विजेतीही बनली होती. मेघा अलीकडेच विजय पवार, गौरव राजे अभिनीत ‘प्लीज चेंज द सॉंग’ नावाच्या शॉर्ट फिल्ममध्ये दिसली होती. ‘बिग बॉस मराठी’मुळे, मेघा मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय आणि व्यस्त सेलिब्रिटी बनली आहे.
पुष्कर जोग
अभिनेता पुष्कर जोग हा ‘बिग बॉस मराठी’मध्ये सामील होण्यापूर्वीपासूनच हिंदी आणि मराठी टीव्ही आणि चित्रपट विश्वातीलतील एक सुप्रसिद्ध नाव आहे. अभिनेता असण्याबरोबरच तो निर्माता देखील आहे. बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वातील प्रथम उपविजेता पुष्करने अलीकडेच स्वतःचे यूट्यूब चॅनेल सुरू केले आहे.
स्मिता गोंदकर
अभिनेत्री आणि मॉडेल स्मिता गोंदकर हिंदी आणि मराठी चित्रपट आणि टेलिव्हिजनमधील कामांसाठी ओळखली जाते. बिग बॉस मराठीच्या सीझन एकमध्ये दिसलेली स्मिता एक प्रोफेशनल स्टंट बायकर आहे. स्मिता गोंदकर शेवट मोठ्या पडद्यावर हेमंत ढोमेचा मराठी चित्रपट ‘ये रे ये रे पैसा 2’मध्ये (2019) दिसली होती. या व्यतिरिक्त, ती ‘त्या रात्री काय घडलं’ या मालिकेतही झळकली होती.
आस्ताद काळे
अभिनेता आस्ताद काळे हा मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय टीव्ही कलाकारांपैकी एक आहे. तो शेवट ‘स्वराज्य जननी जिजामाता’ या मालिकेत दिसला होता. याशिवाय, आस्ताद काळे यांनी रूपल नंद आणि यशोमन आपटे यांच्यासोबत टीव्ही मालिका ‘आनंदी ही जग सारे’मध्येही काम केले होते.
किशोरी शहाणे
ज्येष्ठ अभिनेत्री किशोरी शहाणे सध्या हिंदी टीव्ही कार्यक्रमांमध्ये सक्रिय आहेत. संपूर्ण लॉकडाऊनमध्ये किशोर त्यांच्या फिटनेस टिप्स शेअर करून चाहत्यांचे मनोरंजन करत होत्या.
शिवानी सुर्वे
अभिनेत्री शिवानी सुर्वे मराठी प्रेक्षकांसाठी एक परिचित चेहरा आहे. बिग बॉसनंतर ती ‘सातारचा सलमान’ आणि ‘ट्रिपल सीट’ सारख्या चित्रपटांमध्येही दिसली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ती तिच्या पुढील चित्रपटात स्वप्नील जोशीसोबत झळकणार आहे.
सई लोकूर
अभिनेत्री सई लोकूरने चित्रपट ‘किस किस प्यार प्यार करू’मध्ये विनोदी अभिनेता कपिल शर्मासोबत काम करत प्रसिद्धी मिळवली. कोरोना लॉकडाऊन दरम्यान, तिने पाककृती आणि स्किनकेअर टिप्सद्वारे लोकांचे भरपूर मनोरंजन केले.
शर्मिष्ठा राऊत
अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत बिग बॉसच्या घरात प्रवेश करण्यापूर्वीपासून खूप लोकप्रिय होती. या शोमध्ये दिसल्यानंतर तो अनेक प्रोजेक्टमध्येही झळकली. सध्या ती ‘जिजामाता’ मालिकेमध्ये ‘बडी बेगम’ची भूमिका साकारत आहे.
नेहा शितोळे
‘सेक्रेड गेम्स’ फेम अभिनेत्री नेहा शितोळे, जिला ‘धाकड गर्ल’ म्हणूनही ओळखले जाते, तिने बिग बॉस मराठीत प्रवेश करताच प्रसिद्धी मिळवली होती. अभिनेत्रीने हॉरर-थ्रिलर वेब सीरीजमध्येही काम केले आहे.
शिव ठाकरे
रोडीज या रिअॅलिटी शोद्वारे प्रसिद्धी मिळवणारा अभिनेते शिव ठाकरे यांनी ‘बिग बॉस मराठी 2’मधील आपल्या सादरीकरणाने प्रेक्षकांची मने जिंकली. त्यानंतर अभिनेता त्याची मैत्रीण वीणा जगतापसोबत एका म्युझिक व्हिडीओमध्ये दिसला.