Bigg Boss Marathi 3 Promo | ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वाची उत्सुकता संपली, मांजरेकरांनी शेअर केला प्रोमो

"त्याच्यासोबत मी परत येतोय… तुम्ही तयार राहा… #BiggBossMarathi3 लवकरच #ColorsMarathi वर" असं लिहित महेश मांजरेकर यांनी प्रोमो शेअर केला आहे.

Bigg Boss Marathi 3 Promo | 'बिग बॉस मराठी'च्या तिसऱ्या पर्वाची उत्सुकता संपली, मांजरेकरांनी शेअर केला प्रोमो
Bigg Boss Marathi 3
Follow us
| Updated on: Jun 21, 2021 | 3:33 PM

मुंबई : बहुचर्चित ‘बिग बॉस मराठी’च्या (Bigg Boss Marathi) तिसऱ्या पर्वाला अखेर मुहूर्त मिळणार आहे. दिग्गज अभिनेते-निर्माते महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांनीच इन्स्टाग्रामवरुन ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सिझनची घोषणा केली आहे. बिग बॉसच्या आगमनाची चाहूल लागल्याने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. (Bigg Boss Marathi Season 3 to begin soon Mahesh Manjrekar announces)

“त्याच्यासोबत मी परत येतोय… तुम्ही तयार राहा… #BiggBossMarathi3 लवकरच #ColorsMarathi वर” असं लिहित महेश मांजरेकर यांनी प्रोमो शेअर केला आहे. यामध्ये केवळ बिग बॉसच्या नव्या सिझनच्या लोगोचं दर्शन घडतं.

दोन वर्षांनंतर नवा सिझन

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चित्रपट-मालिका यांची शूटिंग गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून चार महिने बंद होती. जुलै महिन्यात चित्रीकरणाला परवानगी मिळाल्यानंतर गाडी हळूहळू रुळावर आली. मात्र चित्रीकरण करताना कोरोनाविषयक नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. त्यामुळे गेल्या वर्षी ‘बिग बॉस मराठी’चा नवा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आलाच नाही. एकीकडे सलमान खानचा हिंदी बिग बॉस (Bigg Boss 14) सर्व नियम पाळून पार पडला. त्यामुळे प्रेक्षकांना मराठी पर्वाचीही उत्सुकता लागली होती. मात्र ही उत्सुकता दोन वर्षांच्या कालावधीनंतर शमणार आहे.

बिग बॉसच्या घरात जवळपास 15 स्पर्धक रात्रंदिवस एकत्र राहतात. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्पर्धक आणि निर्मात्यांना अधिक खबरदारी घ्यावी लागणार आहे. मास्क, सोशल डिस्टन्सिंग अशा नियमांचे पालन कसे होणार, याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. बिग बॉसच्या घरातील टास्कमध्येही कोरोनाशी निगडीत क्रिएटिव्ह खेळ पाहायला मिळू शकतात.

मांजरेकरांकडेच पुन्हा सूत्रसंचालन

दिग्गज अभिनेते-निर्माते महेश मांजरेकर ‘बिग बॉस मराठी’चे सूत्रसंचालन करतात. मांजरेकरांच्या स्टाईलचे अनेक चाहते आहेत. त्यामुळे पुढील सिझनची सूत्रंही मांजरेकरांच्याच हाती सोपवली जाणार आहेत. दोन वर्षापासून ‘बिग बॉस’चा मराठमोळा आवाज नव्याने ऐकण्यासाठी प्रेक्षकांने कान आसुसले आहेत.

‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वात अभिनेत्री मेघा धाडे विजेती ठरली होती. तर दुसऱ्या पर्वाच्या विजेतेपदाच्या ट्रॉफीवर शिव ठाकरेने आपले नाव कोरले होते. आता या सीझनमध्ये कोण सहभागी होणार याची उत्सुकता वाढली आहे.

पाहा प्रोमो

संबंधित बातम्या :

सवाई भट्टवर प्रेक्षक नाराज? कमी मतं मिळाल्याने ‘इंडियन आयडॉल 12’मधून बाहेर!  

Avika Gor | लग्नाविनाच ‘बालिका वधू’ 18 वर्षांनी मोठ्या सहकलाकाराच्या बाळाची आई?

(Bigg Boss Marathi Season 3 to begin soon Mahesh Manjrekar announces)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.