Bigg Boss Marathi 3 | ‘बिग बॉस मराठी’चं शेवटचं एलिमिनेशन, खुन्नस गेली, गट-तट संपले, निरोपाला सहाही जण ढसाढसा रडले
सरप्राईज बॉक्सचा चौकोन या खेळातून बिग बॉसनी एलिमिनेशन प्रक्रिया पार पडली. तिकीट टू फिनाले मिळालेला अभिनेता विशाल निकम सेफ होता. तर मीनल शाह, विकास पाटील, उत्कर्ष शिंदे, मीरा जगन्नाथ आणि जय दुधाणे या पाच स्पर्धकांवर एलिमिनेशनची टांगती तलवार होती.
मुंबई : ‘बिग बॉस मराठी 3’ चा (Bigg Boss Marathi 3) ग्रँड फिनाले अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या इतिहासात पहिल्यांदा मिड-वीक एलिमिनेशन झाले. यावेळी अभिनेत्री मीरा जगन्नाथ (Mira Jagannath) हिला ‘बिग बॉस’च्या घराबाहेर जावे लागले. त्यामुळे ‘बिग बॉस मराठी 3’च्या टॉप 5 स्पर्धकांमध्ये (Bigg Boss Marathi 3 Grand Finale) विशाल निकम, मीनल शाह, विकास पाटील, उत्कर्ष शिंदे आणि जय दुधाणे यांनी नंबर लावला आहे.
‘बिग बॉस मराठी’च्या इतिहासात पहिल्यांदा मिड-वीक एलिमिनेशन पार पडले. ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिकेतील मोमोच्या भूमिकेमुळे लोकप्रिय झालेली अभिनेत्री मीरा जगन्नाथ ‘बिग बॉस मराठी’मुळे खऱ्या अर्थाने घराघरात पोहोचली. मात्र 95 दिवसांनंतर मीराचा बिग बॉसमधील प्रवास संपला आहे.
सरप्राईज बॉक्सचा चौकोन
सरप्राईज बॉक्सचा चौकोन या खेळातून बिग बॉसनी एलिमिनेशन प्रक्रिया पार पडली. तिकीट टू फिनाले मिळालेला अभिनेता विशाल निकम सेफ होता. तर मीनल शाह, विकास पाटील, उत्कर्ष शिंदे, मीरा जगन्नाथ आणि जय दुधाणे या पाच स्पर्धकांवर एलिमिनेशनची टांगती तलवार होती. महाअंतिम फेरीत सहा जणांना स्थान मिळेल, असा सर्वांचाच समज होता, मात्र रविवारी सोनाली पाटीलला निरोप दिल्यानंतर सूत्रसंचालक महेश मांजरेकर (Mahesh Manjarekar) यांनी एक धक्कादायक घोषणा केली. त्यानंतर व्होटिंग लाईन्स सुरु झाल्या. आणि पाचच जण ग्रँड फिनालेत पोहोचणार असल्यावर शिक्कामोर्तब झालं.
जय-विकास आधी सेफ
सरप्राईज बॉक्सचा चौकोन या खेळात पाचही जणांसाठी वेगवेगळ्या चौकोनात काही संदेश लिहिलेली पत्रं होती. बिग बॉसच्या सूचनेनुसार प्रत्येक जण एक-एक चौकोन पुढे-मागे जात त्या सूचना वाचत होतं. जय दुधाणे सर्वात आधी सेफ होऊन ग्रँड फिनालेमध्ये पोहोचला. त्यानंतर विकास पाटील सुरक्षित असल्याची घोषणा झाली. त्यानंतर अचानक महेश मांजरेकर यांनी एण्ट्री घेतली. उत्कर्ष, मीनल आणि मीरा यांची उत्कंठा शिगेला पोहोचली होती.
मांजरेकरांनी उत्कर्ष सेफ असल्याचं सांगत एका मुलीला घराबाहेर जावं लागणार असल्याचं जाहीर केलं. मीरा आणि मीनल एकमेकींचा हात घट्ट धरुन उभ्या होत्या. अखेर, मीरा जगन्नाथ एलिमिनेट झाल्याचं मांजरेकरांनी सांगितलं. त्यानंतर मीरासह सहाही जणांच्या अश्रूचा बांध फुटला.
मीराच्या आई-वडिलांचा व्हिडीओ
मीराला निरोप देताना मांजरेकरांनी एक व्हिडीओ दाखवला. यामध्ये मीराशी अनेक वर्ष संपर्क न ठेवलेल्या तिच्या आई-वडिलांनी तिचा अभिमान वाटत असल्याचं सांगितलं. हा व्हिडीओ पाहताना सगळेच जण ढसाढसा रडले. बिग बॉसच्या घरातील खुन्नस, दोन गट विरघळून गेल्याचं चित्र यावेळी पाहायला मिळालं.
View this post on Instagram