Chiku Ki Mummy Dur Kei : ‘चीकू की मम्मी दूर की’ या शोच्या प्रोमोमध्ये झळकणार बॉलिवुडचे डान्सिंग लेजेंड!
स्टार प्लस आपल्या आगामी 'चीकू की मम्मी दूर की' या शोच्या आगामी प्रोमोमध्ये प्रतिष्ठित डिस्को डांसर 'मिथुन दा किंवा एटरनल सुपरस्टार गोविंदा' यांना सहभागी करण्याचा विचार करणार आहेत. (Bollywood's dancing legend to appear in the promo of 'Chiku Ki Mummy Dur Kei'!)
मुंबई : स्टार प्लसचा (Star Plus) आगामी शो ‘चीकू की मम्मी दूर की’ (Chiku Ki Mummy Dur Kei) आपल्या आकर्षक प्रोमोजसोबत आई मुलाच्या नात्याची सुंदर कहाणी सादर करून दर्शकांचं खूप मनोरंजन करत आहे. परिधी शर्मा आणि वैष्णवी प्रजापती यांच्या या शोमध्ये आई मुलाची सुंदर कहाणी दाखवण्यात आली आहे, जे एक-दूसऱ्यापासून वेगळे होतात आणि आपल्यामधल्या नृत्याच्या सामायिक धाग्याने जवळ येतात. आता चाहते आतुरतेनं या शोची वाट पाहात आहेत, स्टार प्लस आपल्या चाहतांसाठी एक मोठं सरप्राइज घेऊन सज्ज आहे.
होय!! आपल्या नवीनतम कल्पनांनी दर्शकांचं मनोरंजन करण्यामध्ये कोणतीच कसर न सोडण्याची दक्षता घेणारे, स्टार प्लस नेहमीच बॉलीवुडच्या दिग्गजांसोबत आपल्या यशस्वी संकल्पना राबवत असते. यावेळी हे लोकप्रिय जीईसी चॅनल आणखी एका दिग्गजासोबत जोडून घेण्यासाठी सज्ज झाले असून यावेळी ते अधिक आकर्षक असणार आहे. हाती आलेल्या नव्या बातमीनुसार, स्टार प्लस आपल्या आगामी ‘चीकू की मम्मी दूर की’ या शोच्या आगामी प्रोमोमध्ये प्रतिष्ठित डिस्को डांसर ‘मिथुन दा किंवा एटरनल सुपरस्टार गोविंदा’ यांना सहभागी करण्याचा विचार करत आहे.
इंडस्ट्रीतील एका पक्क्या सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, “मिथुन दा आणि गोविंदा यांना बॉलीवुडचे डान्सिंग लेजेंड मानलं जातं आणि या शोमध्ये नृत्य एक महत्वपूर्ण बाजू आहे, यासाठी निर्मात्यांच्या मनात या शोच्या नव्या प्रोमोसाठी डान्सिंग सुपरस्टारपेक्षा वेगळा विचार नाही आहे. मिथुन दा आणि गोविंदा यांना पडद्यावर आपल्या अनोख्या प्रतिभेसाठी ओळखले जाते आणि आम्हाला विश्वास आहे कि हे एकदम मोठं काहीतरी असेल निर्माते अजूनही या दोघांच्या नावावर विचार करत आहेत मात्र, या दोघांपैकी कोणालाही ऑन-स्क्रीन पाहणं निश्चितपणे एक उत्तम मनोरंजनाची ट्रीट असेल.”
संबंधित बातम्या
Mouni Roy : मौनी रॉयची मालदीव सफर, सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटो शेअर
Birthday Special : स्वरा भास्करला डेट करायचा हिमांशू शर्मा, आज कनिका ढिल्लनसोबत जगतोय आनंदी जीवन