“माझ्या आयुष्यातील प्रेयसीची जागा भाऊ कदमने घेतलीय”, कुशल बद्रिकेची पोस्ट चर्चेत

चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा अभिनेता कुशल बद्रिके याची इन्स्टाग्राम पोस्ट सध्या चर्चेत आहेत. त्याने भाऊ कदमसोबतचा एक व्हीडिओ शेअर केला आहे. या व्हीडिओची आणि त्याच्या कॅप्शनची सध्या जोरदार चर्चा आहे.

माझ्या आयुष्यातील प्रेयसीची जागा भाऊ कदमने घेतलीय, कुशल बद्रिकेची पोस्ट चर्चेत
भाऊ कदम आणि कुशल बद्रिके
Follow us
| Updated on: Mar 04, 2022 | 3:42 PM

आयेशा सय्यद, मुंबई : चला हवा येऊ द्या (Chala Hava Yeu Dya) या कार्यक्रमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा अभिनेता कुशल बद्रिके (Kushal Badrike) याची इन्स्टाग्राम पोस्ट सध्या चर्चेत आहेत. त्याने भाऊ कदमसोबतचा (Bhau Kadam) एक व्हीडिओ शेअर केला आहे. या व्हीडिओची आणि त्याच्या कॅप्शनची सध्या जोरदार चर्चा आहे. भाऊचा आज वाढदिवस आहे त्यानिमित्त कुशलने एक व्हीडिओ पोस्ट केला आहे. यात त्याने भाऊ कदमचा संबंध थेट प्रेयसीशी जोडला आहे. तसंच अभिनेत्री श्रेया बुगडेनेही (Shreya Bugade) भाऊला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. “भाऊ तुम्ही फिलॉसॉफर आहात”, असं श्रेया म्हणाली आहे. तसंच डॉ. निलेश साबळेनेही (Dr. Nilesh Sabale) भाऊ कदम सोबतचा एक फोटो शेअर केला आहे आणि भाऊला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

कुशलची इन्स्टाग्राम पोस्ट

अभिनेता कुशल बद्रिके याची इन्स्टाग्राम पोस्ट सध्या चर्चेत आहेत. त्याने भाऊ कदमसोबतचा एक व्हीडिओ शेअर केला आहे. या व्हीडिओची आणि त्याच्या कॅप्शनची सध्या जोरदार चर्चा आहे. आज वाढदिवस आहे त्यानिमित्त कुशलने एक व्हीडिओ पोस्ट केला आहे. यात भाऊ आणि कुशल शेजारी-शेजारी झोपले आहेत आणि भाऊ मोठमोठ्याने घोरत आहे. त्यामुळे कुशलने भाऊ कदमचा संबंध थेट प्रेयसीशी जोडला आहे. “माझ्या आयुष्यातली प्रेयसीची जागा घेणारा एकमेव माणुस म्हणजे ‘भाऊ कदम, प्रेयसी कशी आपली झोप उडवते, तशीच माझी झोप उडवणार्‍या माझ्या मित्रा, तुला वाढदिवसाच्या घन’घोर’ शुभेच्छा!”, असं कुशने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.

श्रेयाची इन्साग्राम पोस्ट

अभिनेत्री श्रेया बुगडेनेही भाऊला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. “भाऊ अगदी खरं सांगू तर तुम्ही एक खूप मोठे philosopher आहात, तुम्ही तुमच्या सहज वागण्यातन खूप गोष्टी शिकवता जसं की, कितीही टेन्शन असलं तरी माणसाकडे एक डुलकी काढण्या इतका वेळ असतोच… आपण वयाने कितीही मोठे झालो तरी आपल्यातलं लहान मूल मोठं होऊ द्यायचं नाही… आणि आयुष्य म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद वेचणे भाऊ तुम्ही कमाल आहात तुम्हाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा”, असं श्रेया म्हणाली आहे.

निलेश साबळेची इन्स्टाग्राम पोस्ट

डॉ. निलेश साबळेनेही भाऊ कदम सोबतचा एक फोटो शेअर केला आहे. “हा वेडा माणूस जोपर्यंत आपल्याबरोबर आहे, तोपर्यंत आपण टेंशन विरोधातलं प्रत्येक युद्ध जिंकू…! Happy Birthday भाऊ …! तुम जियो हजारो साल…”, असं निलेशने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.

संबंधित बातम्या

“म्हणून मी बॉलिवूडपासून 10 वर्ष लांब होते”, सुष्मिता सेनने सांगितलं कारण…

Video: ‘कच्चा बदाम नाही, शिवरायांच्या महाराष्ट्राची लेक’; ‘पावनखिंड’च्या गाण्यावर चिमुकलीचा डान्स

‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतून परीने का घेतला ब्रेक? अखेर कारण आलं समोर

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.